नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Showing posts with label ब्लॉग. Show all posts
Showing posts with label ब्लॉग. Show all posts

Friday, 29 December 2017

December 29, 2017

महाराष्ट्र - एक नवी सांस्कृतिक ओळख

महाराष्ट्र म्हणजे संस्कृति आणि परंपरा यांनी नटलेल राज्य. ५० वर्षापुर्वीचा आणि आताच्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत, जसे समुद्रात खूप सारे प्रवाह येऊन एकत्र होतात तसेच काहीसे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे हि आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवाह इतके   वेगळे पण एकमेकाना जोडणारे आहेत आणि प्रत्येक प्रवाहाचे एक  वेगळे वैशिष्ठ्य आहे; त्यामुळे ह्या प्रत्येक प्रवाह मुळे महाराष्ट्राची एक नवीन ओळख बनते आहे. महाराष्ट्र ही भूमी ही देवांची , संताची अन भक्तांची, वीरांची, लोककलांची, साहित्याची आहे. हा प्रत्येक प्रवाह महाराष्ट्राची एक वेगळी ओळख सांगतो. ह्याच प्रवाहंची ही फ़क्त तोंड ओळख. ( कदाचित काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या तर क्षमस्व:   )

देवांचा, संतांचा , भक्तांचा महाराष्ट्र : महाराष्ट्रातील  देवस्थाने  आपल्या  सगळ्याना  माहित  असतीलच.  अष्टविनायक, मुंबई चे  सिद्धिविनायक,  पंढरपुर,  साईं बाबां  सारखा  अवतार  पण  देवाने  महाराष्ट्रातच  धारण  केला  ते  पवित्र  स्थान शिर्डी, गणपति पुळे,  ५१  शक्ती  पीठे  संपूर्ण  देशभरात  आहेत;  त्यातली  साडेतीन शक्ती पीठे हि महाराष्ट्रात आहेत आणि  ती म्हणजे तुळजाभवानी,  महालक्ष्मी, रेणुका  माता, आणि  सप्तशृंगी हे अर्धे पीठ मानले जाते. १२ ज्योतिर्लिंगापैकी  चार आपल्या महाराष्ट्रात  आहेत  ती  म्हणजे  भीमाशंकर,  नागेश्वर,  त्र्यंबकेश्वर,  घ्रिनेश्वर.  घरापुरी  येथील  लेणी  मधे  तर  ब्रम्हा,  विष्णु आणि  महेश  (शंकर)  ह्यांची  दुर्मिळ  मूर्ति  कोरलेली  आहे. अजुनही  बरीचशी  देवस्थाने आहेत.
संताची तर  महान  परंपरा  ह्या  महाराष्ट्राला  लाभली  आहे.  संताच्या  बाबतीत  म्हणतात  की,  " संतकृपा  झाली  ।  इमारत  फळा  आली  ॥ १ ॥ ज्ञानदेवें  रचिला  पाया  ।  उभारिलें  देवालया  ॥ २ ॥ नामा  तयाचा  किंकर । तेणें  केलासे   विस्तार ॥ ३ ॥ जनार्दन   एकनाथें   । ध्वज  उभारिला  भागवत  ॥ ४ ॥  तुका  झाला  तेथें  कळस । भजन  करावें  सावकाश  ॥ ५ ॥"  संत गाडगे  बाबा , संत  जनाबाई, संता  सावता  माळी,  अशी   फार   मोठी   परंपरा   लाभली   आहे.   भक्तांची   तर   वारी  कधी  चुकतच   नाही.  असा  आहे देवा- धर्माचा  आदर करणारा महाराष्ट्र.
विरांचा महाराष्ट्र : देवा - धर्माचा आदर  करणारा  महाराष्ट्र  संकटकाळात  तितक्याच  कणखर  पणे  संकटांचा  सामना  करतो. "गोब्राम्हणप्रतिपालक  क्षत्रिय  कुलावांतास सिंहासनाधीश्वर  छत्रपती  शिवाजी  महाराज  कि  जय "  म्हटलं  कि,  अंगात  वीरश्री  संचारली  नाही;  असा  माणूस  महाराष्ट्रात  औषधालाही  सापडणार  नाही.  शिवाजी  महाराजांच्या  महान पराक्रमानंतर  पेशाव्यानी  लावलेले  अटकेपार  झेंडे,  मोघलंशी  केलेले  युद्ध, " स्वराज्य  हा  माझा  जन्म  सिद्ध  हक्क  आहे आणि  तो   मी  मिळवणारच. "  अशी  सिंह  गर्जना  करणारे  लोकमान्य  टिळक ," मेरी  झांसी  नाही  दुंगी  " हे  ठणकावून सांगणारी  राणी  लक्ष्मीबाई  हिचा  जन्म  हि  महाराष्ट्रातच  झाला.  आपल्या  मातृभूमीला  भेटण्यासाठी  आतुर  होऊन  समुद्र पार  करून  येणारे  विनायक  सावरकर  पण  ह्याच  मातीतले , ब्रिटिश  सरकार  ची वागणूक  बघून  पेटून  उठानारे वासुदेव  फडके हे ही ह्याच मातीने दिले. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जीवनदान दिलेले १०६ हुतात्मे,  स्वातंत्र्यानंतर ही देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान असोत वा अलीकडेच मुंबई वर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर, हेमंत करकरे , अशोक कामटे असो (अजुनही बरीच नावे ह्या यादीत येतील )  हे सगळे वीर म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याची गाथाच आहे.

कलाकारांचा महाराष्ट्र : पूर्वीच्या काळात पंढरीची वारी आणि बारी अश्या दोनच गोष्टी इकडच्या जनतेला माहित. यातूनच सुरवात झाली महाराष्ट्राच्या लोकगीतांची आणि संगीताची ह्या गीताचा उगम बघायला गेला कि प्रथम आठवतं ते "जातं" . प्रश्न पडला ना "जात्याच " अन गाण्याचा काय संबंध तर पूर्वी पहाटे उठून बायका जात्यावर दळण दळत असत त्या वेळी त्यातून येणाऱ्या घराघरीच्या तालात आपले सूर मिसळून ओव्या म्हणत हाच खरा वाद्यांचा उगम होय. रहाटाने विहिरीतून पाणी काढताना होणारा आवाज, बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ह्या तालावर गाणे बोलणारा शेतकरी राजा, मग पुढे भर पडली ती वासुदेवाच्या चिपळ्यांची. पहाटे ची कामे उरकून दारात सडा- सारवण करून सुंदरशी रांगोळी घालीत असतांना, आगमन व्हायचे ते वासुदेवाचे डोक्यावर मोरपिसाची टोपी हातात चिपळ्या आणि तंबोरा  अन अंगात बाराबंदी घातलेला हा वासुदेव ओव्या, पुराणातील कथा  ह्या गाण्यात गुंफून सांगत असे व माय - लेकी कडे भिक्षेची मागणी करत आणि त्याही दान करत. जसा जसा दिवस सरकत जाई तसे मग मंडळी कामात गुंतत अन रात्री देवळात भजन - कीर्तनाच्या कार्यक्रमाला जमत. पूर्वीच्या काळी रात्री सुरु होणारी हि भजने कधी - कधी पहाटे पर्यंत चालायची (तेव्हा आत्ता सारखे पोलिस दादा येत नव्हते ना! ये १० वाजले बंद करा ! ) तर मग टाळ-मृदुंग ह्यांच्या गजरात लोक मंत्रमुग्ध होत. इकडून मग वाद्यात भर पडली ती टाळ - मृदुंग,  तंबोरा.

 धनगर गीत (गाजा)
 आपली गुरे (गाई , शेळ्या मेंढ्या) चरायला नेताना त्याच्या गळ्यात वाजणाऱ्या घंट्याचा आवाज व सोबत असणारी बसारी ह्यांच्या तालावर गायली जात.

 कोळी गीत
कोळी गीत म्हटले कि प्रथम आठवते ती वेसावची पारू नाही का? पावसाळ्या नंतर मासे पकडायला जाताना आपल्या लाडक्या दर्याची पूजा करून " सण आयलाय गो नारळी पुनवेचा"  असा म्हणत आपल्या होड्या पाण्यात सोडतात. कोळी गीतं कोण विसरू शकेल का ?

 शौर्यगीत किंवा  पोवाडा
मैदानावर शौर्य गाजवून आल्यावर,  मैदानावर गजवालेल्या शौर्याची गाथा ही सामान्य जनतेला कळावी आणि त्याच इतिहासाने नवीन तयार होणारी पिढी हि धाडसी तयार व्हावी म्हणून शब्दात गुंफून आणि रंगवून सांगितली जायची. (आठवला ना मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधला पोवाडा! )

 लावणी
महाराष्ट्राच्या संस्कृती मधला सर्वात लावण्य प्राप्त दागिना म्हणजे लावणी. उत्तरेकडच्या राजांच्या कारामुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या मुजाऱ्याला आतिशय लावण्याकरी भाषेत दिलेलं उत्तर म्हणजे लावणी होय. उत्तरे कडे मुजरा चालतो आणि महाराष्ट्र हि कलेमध्ये मागे नाही हे दाखवण्यासाठी चालू झालेली हि लावणी पुढे महाराष्ट्राची परंपरा बनली ( नटरंग मधल्या अप्सरेने हट्ट धरला ना मला जाऊ द्याना घरी चा ??)

 तमाशा
तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची लोककला मानली जाते . तमाशा हा फारशी शब्द असला तरी त्याचा अर्थ मनोरंजन असा होतो ह्या प्रकार मध्ये ढोलकी, तुणतुणे , झांझ, डफ, हलगी (छोटा डफ ), कडे - लेझीम, हार्मोनियम, घुंगरू ह्या वाद्यांचा वापार केला जातो, तमाशा हि कला प्रामुख्याने महाराष्ट्रातील २ समुदायात अधिक प्रमाणात दिसून येतो ते म्हणजे कोल्हाटी व महार. हि कला प्रामुख्याने गावाच्या जत्रेत अधिक प्रमाणात सादर केली जाते.

दिंडी
हि एक महाराष्ट्रातील महान परंपरा आहे, मुख्यत: आषाढी व कार्तिकी महिन्यातील एकादशीला च्या वेळी विठ्ठल भक्त जी विठ्ठलाची गाणी गात मिरवणूक काढतात त्याला दिंडी म्हणतात.
 ह्या सगळ्यात हळूचपणे महाराष्ट्राची संगीत परंपरा घडत गेली. सुरवातीला संतानी सांगितलेली प्रवचने, देवळात होणारी भजने, नंतर घराघरात जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, वासुदेवाचे सकाळच्या वेळातले प्रसन्न करणारे आगमन, ह्याच परंपरेत मग भर पडत गेली. प्रथमत: कवितांना चाली लावणे व त्या सुरात गाणे ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे भावगीते ( भावगीते म्हटली कि कानात स्वर गुंजू लागतात ते "मेंदीच्या पानावर" मधले ) अशी हि घराघरातून सुरु झालेली संगीत परंपरेला आज खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या संगीत प्रवाह बरोबर वाद्यात हि बदल होत गेले. जात्याच्या घरघरी पासून, सुरु झालेल्या ह्या प्रवासात बैलाच्या घळ्यातल्या घंटा, टाळ, मृदुंग, तंबोरा, सतार, हार्मोनियम, तबला, वीणा, बासरी, पियानो, गिटार, ड्रम, ई. वाद्यांची भर पडतच गेली.

 बदलत्या काळाबरोबर जनजीवन आणि काम्रानुकीचे साधना पण बदलत गेली, पूर्वी घराघरात बायका गायाच्या, पंढरीची वारी आणि बारी, त्या नंतर चित्रपट आले ते पण जत्रेतचं बघायला मिळायचे. मग शोध लागला तो ग्रामोफोनचा मग सुरवातीला काही ठराविक लोकांकडे असलेले हे ग्रामोफोन सगळ्यांच्या घरात स्थानापन्न झाले. १९२७ साली All India radio ची स्थापना झाली व १९५७ साली त्याची आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले आणि सुरु झाली एक नवी "मंगलप्रभात " ( मंगलप्रभात हा आकाशवाणी वर सकाळी प्रसारित होणार्या कार्यक्रमाचे नाव आहे ). १९५९ साली  अचानक एका पाहुण्याचे आगमन झाले आणि तो आपल्याच घरातील सदस्य बनला त्या बद्दल लिहायचे झाले तर " तबकड्या मध्ये तेवती निरांजने अन वाती नव्या Television ची कहाणी सांगते तुझी न माझी प्रीती " त्याचा नाव आहे आपल्या सगळ्यांचा लाडका tv  . मग १९९० ते १९९१ च्या काळात cable TV ची सुरुवात झाली. मग गेल्या २ ते ३ वर्षात DTH पण आले. त्याच बरोबर mobile phones , computer चे पण आगमन झाले.  पण आपल्या लाडक्या TV चे महत्व  कमी झाले नाही उलट तो संगणकाचा  वापर करून कसा बघू शकतो हा शोध लावला गेला आत्ता तर mobile मध्ये पण TV बघायची सोय केली आहे. ( काही माहिती द्य्वयाची राहिली असल्यास क्षमस्व: )

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर अजय - अतुल ह्यांनी संगीत बद्ध केलेले हे गीत अगदी योग्य ठरते

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची  (2)
हा आमचा आहे बाणा, हि आमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || धृ ||
राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा
प्रणाम माझ्या घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा, वरदा, कृष्ण - कोयना, भद्रा, गोदावरी
एक पणाचे भारती पाणी मातीच्या घागरी
योग्यांची अन संतांची, भक्तांची , माळक-याची 
हि देव, देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची
योद्धयांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची
देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची
हि भूमी सप्त सुरांची, रंगांची, अष्टकलांची. काव्याची,
शास्त्र - विनोदाची, हि भूमी साहित्याची.
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || १||


जय महाराष्ट्र !!!!!!!!!!!!!!!!!!!!

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

भारतातील सुर्यमंदिरे

    वेदांमध्ये सुर्याला आद्य शक्ति म्हणून मानले आहे. सूर्यदेवाला "सूर्य" किंवा "आदित्य" आशा अनेक नवानी संबोधतात. वेदांमध्ये सुर्याला मुख्य स्थान दिले आहे.
           पुराणात सुद्धा सुर्याला मुख्य स्थान दिले आहे. रामाला सुद्धा सुर्याची आराधना करण्यास सांगितले होते. इराण मधल्या काही मुख्य धर्माच्या ग्रंथामध्ये सुद्धा सुर्याला प्रथम स्थान दिले आहे. पुढे पारसी समाजाने सुद्धा "अग्न"  हे त्यांचे आराध्य स्थान मानले आहे. सारांश इतकाच की बहुतेक सर्व धर्माच्या व्यक्ति व् ग्रंथामध्ये  सुर्याला प्रमुख स्थान दिले आहे.अश्या या सूर्य देवाची देवाले जगभर पहावयास मिळतात. ७ व्या शतकात मुलतान ( पकिस्तान ) येथे पहिले सूर्यमंदिर बांधले होते. पण भारतात ७ प्रमुख सूर्य मंदिरे पहायला मिळतात.
 दक्षिनारका मंदिर :-
                                   बिहार राज्यात गया येथे हे सूर्यमंदिर आहे. देवळासमोर कुंड असून भाविक सूर्याला पाणी कुंडामध्ये सोडतात. याच परिसरात सूर्याची अनेक लहान - मोठी मंदिरे पहायला मिळतात. मगद राजाच्या  वेळी ही देवळे बांधण्यात आली असावी. येथील देवळाच्या सूर्य मूर्तीवर इराणी देवांची छाप पाहायला मिळते. या देवळात सूर्य रथावर आरूढ झाले असून त्यांनी जाकेट, मनगटात कढे व उंच बूट घातले आहेत. हे देवूळ १३ व्या शतकात दक्षिणेचा राजा प्रतापरुद्रा याने बांधले होते. याचे राज्य आंध्र प्रदेशातील वरंगळ येथे होते. या देवळाचे मुख्य प्रवेशव्दार पश्चिमेकडे असून या देवळाजवळ विष्णूचे प्रसिध्द "विष्णूपाद मंदिर " आहे. मंदिर साधे बांधले असून वरती घुमत आहे. या देवळाचा सभामंडप भव्य आहे व पुर्वीकडे सूर्यकुंड आहे. या मंदिरात अनेक कोरलेले खांब आहेत. या खांबांवर शिव, बुध्द, विष्णू, सूर्य, दुर्गा व गणपतीच्या अनेक मूर्ती कोरलेल्या दिसतात.
   ब्रम्हणया देव मंदिर :- 
                           ब्रम्हणया देव  (बरामजू) मंदिर मध्य प्रदेशातल्या झांसी जवळ उन्हो येथे आहे. येथील सूर्य देवाची मूर्ती दगडाची बनवली असून काळ्या दगडावर उभी आहे. देवळावर २१ त्रिकोण कोरलेले आहेत. मूर्तीवर तांब्याचे कवच बसवले आहे. रविवारी भाविकांची गर्दी असते. हे देवूळ पेशव्यांनी  बांधले असून त्यानानातर जवळच्या गावातल्या दाडिया यांनी पूर्ण केले आहे. येथील स्थानिक रहिवाशांची ह्या मंदिरावर खूप श्रद्धा आहे. देवाच्या दर्शनामुळे अंधत्व व कुष्टरोग नाहीसा होतो अशी श्रद्धा भाविकांमध्ये आहे.
  सूर्य पहार मंदिर:-
                     आसामच्या गोलपारा येथे सूर्य पहार डोंगरावर हे देवस्थान आहे. या देवळाच्या पायावर सूर्य देवाचे वडील कश्यप  यांची मूर्ती कोरलेली आहे. व दोन्ही बाजूना सहा अश्या बारा सूर्याच्या वेगवेगळ्या मूर्ती कोरलेल्या दिसतात. हे मंदिर हल्लीच बांधलेले असून या डोंगराच्या पायथ्याशी शंकराची अनेक लिंगे दगडात कोरलेली आढळंतात.  
 सुर्यनारायण मंदिर:-
                              तामिळनाडू येथील कुंभकोनम येथे हे मंदिर पाहायला मिळते. कुंभकोनम येथे अनेक देवळे बांधली आहेत. यात सूर्य, काशी - विश्वेश्वर, विसललक्ष्मी, चंद्र, अंगालकन, उदान, बृहस्पती, सुकर्ण, शनीश्वर, राहू व केतू. भाविकांना आधी गणपतीच्या देवळात प्रवेश करून मग बाकीच्या देवांचे दर्शन घेता येते. येथील भाविक या सर्व देवळात ९ वेळा प्रदक्षिणा घालतात. हे देऊळ ८०० वर्षापूर्वी बांधलेले असून त्यावर द्रविड संस्कृतीची छाप आहे. हे देऊळ चोला राजाने बांधलेले असावे. या देवळाच्या शेजारी कंजमुख १२०० वर्षापूर्वी बांधलेले तिरूमंगलकुडी हे देवस्थान आहे. काही वर्षात ह्या मंदिरांनी पर्यटक आकर्षित केले असून तामिळनाडू सरकारकडून " नवग्रह स्थळ यात्रा " हि खास तीर्थयात्रा सुरु केली आहे. 

 सुर्यनारायणस्वामी मंदिर:
                                       आंध्र प्रदेशातील अरासावली येथे ७ व्या शतकात कलिंगा राजाने बांधलेले पुरातन मंदिर पाहायला मिळते. हे एवढे जुने असून सुद्धा देवळाचा परिसर व देऊळ चांगल्या स्थितीत ठेवले आहे. सूर्य देवाची मूर्ती काळ्या ग्रानाइट दगडामाधली असून दोन्ही हातात कमळ धरलेली आहेत. येथे सूर्याला पद्मपाणी असेही संबोधतात. हे देऊळ श्रीकाकुलम गावाजवळ आहे.

 मोधीराचे सूर्यमंदिर :
                                  गुजरात येथील मोधीश येथे हे सूर्यमंदिर बांधलेले आहे. हे साधारण १०२६ साली बांधले आसवे. या मुर्तीनेसुद्धा गया मंदिराप्रमाणे बूट व बेल्ट घातलेले दिसतात. या मंदिराचे मुख्य प्रवेशव्दार पूर्वेकडे असून सूर्याचे किरण मूर्तीवर पडतात. या देवळाला शिखर नसून भिंतीवर मोधीरा नृत्य  करताना महिला कोरलेल्या आहेत. सभागृहात  तोरण कोरलेले असून पूर्वेकडील प्रवेशव्दाराकडे सूर्यकुंड आहे. या देवळावर मगद घराण्याची छाप दिसून येते. 

 कोनार्क मंदिर :-
                         सर्वात प्रसिद्ध ओरिसातील १३ व्या शतकात बांधलेले सुंदर कोरीव काम केलेले मंदिर आहे. पूर्वीपासून उत्तर- पूर्वेकडे २० मैलावर कोनार्क मंदिर आहे. कोनार्क म्हणजे " कोपऱ्यातला  सूर्य ". संपूर्ण काळ्या दगडात हे मंदिर बांधले असून मंदिराच्या पायावर ७ घोडे कोरलेले आहेत व २४ रथचक्र कोरलेली दिसतात. हे मंदिर गंगा घराण्यातील नृहसिंह  देवा यांनी बांधले आहे. त्यावेळची स्वयंभू मूर्ती ज्यावर सूर्याचे पहिले किरण पडत ती पोर्तुगीजांनी चोरली, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या देवळात एक मोठा सभामंडप व नटमंदिर आहे. 

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

माझे वडील

Friends "HAPPY FATHER'S DAY ".   "वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे" हे title बघून थोडं आश्चर्य वाटले ना कि वडील आणि गोड गऱ्या सारखे? वडील तर किती खडूस असतात. ओरडतात , अभ्यास नाही केलं म्हणून मारतात पण अजिबात काळजी करत नाही. आई काशी चांगल - चांगलं खाऊ देते. प्रेमाने समजावते. आई म्हणजे ज्योत जी घराला प्रकाश देते; पण त्या ज्योतीला आधार देणाऱ्या समईला आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रत्यक्षात समईवरच जास्त ताण पडतो. हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ आहे. पहिलटकरणीचे कौतुक होते; पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे वडील कोण बघतच नाही.

आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा phone करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी  त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि ," बघ गं काय झालाय ते"  असे बाबा . खाऊ देणारी आई दिसते पण तोच खाऊ कामावरून सुटल्यावर आठवणीने आणून आईकडे देणारे व सगळ्यांना सारखा दे म्हणून सांगणारे बाबा दिसतच नाहीत." पप्पा, मला नवीन बूट हवेत ! " असा हट्ट केला कि " ठीक आहे. बघू " बोलणारे आणि आपल्या नकळत आईकडे पैसे देताना बजावून सांगणारे कि " त्याला हवे ते बूट घेऊ दे . उगाच ओरडू नको मी माझ्यासाठी घेईन नंतर. " आपले बाबाच असतात.दिवाळीला नवीन कपडे घेताना " मी आत्ताच नवीन घेतलेत तेव्हा मुलांना नवीन कपडे घेऊया" म्हणून स्वत: जुने कपडे वापरून मुलांसाठी नवे कपडे, फटाके घेणारे आपलेच बाबा असतात ना. स्वत: काही न बोलता मुलांचा शिक्षणाचा खर्च, pocketmoney , कपडे, ई. सगळे कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारे आपलेच बाबा असतात.  

कुठे पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठ्या अपघातातून वाचलो कि " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते. आई रडते म्हणून तिचं दुख: दिसत पण बाबा रडत नाहीत तर संयमाने वागून पूर्ण परिस्थिती सावरतात दुख: त्यांना पण होत असतं पण ते दाखवत नाहीत.

माझे दादा पण अशेच आहेत. दादा म्हणजे माझे वडील मी त्यांना दादा म्हणते. खरं तर ते घरात सगळ्यात मोठे त्यामुळे सगळे त्यांना दादा हाक मारत त्यामुळे आम्ही पण दादा हाक मारायला शिकलो. आज मी हा ब्लोग लिहिती आहे ना तो पण त्यांच्या मुळे, त्यांनी मला ब्लोग लिहायला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले आहे ( अप्रत्यक्षपणे कारण त्यांना माहित पण नाही मी हा ब्लोग लिहिते पण माझी लेखनकला हि त्यांची देणगी आहे.) असा म्हटलं जाता कि आई हि प्रथम गुरु असते पण मी गर्वाने सांगते कि माझे दादा माझे  प्रथम गुरु आहेत. त्यांच्या मुळे मी एक वक्ती होऊ शकली. आज पर्यंत खूप वक्तृत्व स्पर्धा केल्या काहींमध्ये बक्षिसे पण मिळाली. वयाच्या ३ वर्ष्या पासून ह्या स्पर्धा करते आहे. ह्याचा श्रेय माझ्या दादांना जातं. त्यांच्या मुळे मला लेखन करण्याची पण सवय लागली. माझे दादा म्हणजे एक अजब रसायन totally unpredictable पण तरीही मनाने श्रीमंत दारात शत्रू जरी उभं राहिला तरी त्यःच्या स्वागताला धावून जाणारे.  हेच संस्कार आमच्यातही उतरवले आणि आम्हाला कळलं पण नाही.

माझ्या लहान पाणी मी आई- दादांसोबत झोपायची तेव्हा light कोण घालवणार म्हणून माझ्याशी खोटं- खोटं भांडणारे दादा आजही आठवतात पण आत्ता भांडायला मिळत नाही ( कारण बेडरूम वेगळी केली ना) आता मोठी झाली ना! पण आजही त्यांच्या सोबत "TOM & JERRY" बघताना केलेली "TOM & JERRY" सारखी केलेली मस्ती लहानपणाची आठवण करून देते. आम्ही दोन्ही भावंड म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघे पण दादांजवळ जास्त असतो काही काम असले तरी दादा. आई तर सांगते कि generally लहानपणी मुलं आईच्या नावाने रडतात. मी तर तशी पण खूप कमी रडायची ती पण दादांच्या नावाने.


"HAPPY FATHER'S DAY "
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

वारली चित्रकला




महाराष्ट्र हे अनेक गुणांनी समृद्ध असे राज्य आहे. इथे महाभारतातील पुरातन वस्तूपासून ते तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर माउली, छत्रपती शिवाजी महाराज, ब्रिटीशांचे राज्य यांच्या गाथा, कथा योग्य जपून ठेवल्या आहेत. तसेच सांस्कृतिक व कलाक्षेत्रातसुद्धा महाराष्ट्र मागे नाही. अभंग, पोवाडा, भारुड, नमन, गोंधळ असे अनेक वेगवेगळ्या लोककला अजूनही प्रसिद्ध व जपून ठेवल्या आहेत. गुजरात व महाराष्ट्र यांच्या सीमेवर ठाणे जिल्हा आहे. येथे "वारली" म्हणून आदिवासी राहतात. त्यांच्याकडे चित्रकलेची एक वेगळी परंपरा त्यांनी अजूनही जपून ठेवली आहे. आज मुंबई व सुरात हि दोन प्रगत शहरे जवळ असल्यामुळे व या दोन शहरांच्या "cosmopolitan" होण्याने "वारली paintings " ना पुन्हा चांगले दिवस आले आहेत.


 चित्रकलेचा इतिहास 
                                   वारली चित्रकला हि साधारण १० व्या शतकात सुरु झाली असावी. त्यावेळी अक्षर नसल्यामुळे चित्रांद्वारे आपले विचार त्यावेळची लोक मांडत असावी. पण नंतरच्या  काळात हि कला लुप्त होऊन पुन्हा १७ व्या शतकात सुरु झाली. पण अशीच चित्रे मध्य प्रदेशातील भीमबेटका गुफांमध्ये पाहायला मिळतात. या गुफांमधली चित्रे मनसे व जनावरांच्या चित्रांनी रंगवली आहेत. हि चित्रे "इड्स civilization " पासून सुरु झाली असावीत. पण काही तज्ञांच्या मते हि चित्रकला २५०० ते ३००० वर्षापूर्वी  सुरु झाली असावी. या चित्रकलेद्वारे रोजच्या दिनक्रमाची व संस्कुतीची चित्रे रेखाटली जात असत. साधारण १९७० सालापासून वारली चित्रकलेला लग्नाच्या मंडपात, बंगल्यामध्ये सुशोभित करण्यासाठी वापरली जात आहे.  
 वारली चित्रकला सेंटर 
                                     वारली हि जमात साधे व असलेल्या उत्पादनात सुखात व समाधानी राहतात. त्यांना आपल्या फावल्या वेळात चित्र रंगवायला आवडतात. चित्र रंगवायला पहिली पूर्ण भिंत शेणाने सरावली जाते. नंतर त्यावर गेरू (लाल रंगाची माती) ने सारवली जाते. ती संपूर्ण सुकल्यावर त्यावर तांदळाचे बारीक पीठ पाण्यात भिजवून त्याने चित्रे काढली जातात. वारली जमातीमध्ये २ चित्रे अत्यंत महत्वाची आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी त्यांचे "तारपा नृत्य" महत्वाच्या दिवशी करण्यात येते. याचे हे चित्र प्रत्येक भिंतीवर रेखाटली जातात. 'तारपा' हा मध्यभागी उभा राहून वाद्य वाजवत असतो व त्याच्याभोवती सर्व स्त्री - पुरुष नृत्य करीत असतात. नृत्य करताना नर्तक त्याच्याकडे पाठ करत नाहीत. या संपूर्ण नृत्याचे हुबेहूब  चित्र प्रत्येक झोपडीवर रेखाटलेले असते. या चित्राचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये सरळ रेषा कधी वापरली जात नाही. त्रिकोण, गोल, फुले, पाने, झाडे, तीपके, एवढेच वापरून चित्रे काढण्यात येतात.


 स्वयंपाकघराच्या भिंतीवर चित्र 
                                                    दुसरे महत्वाचे चित्र म्हणजे लग्नाच्या आधी स्वयंपाकघराच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर "देवी पालघट" चे चित्र काढण्यात येते. हे चित्र काढण्यासाठी दोन विवाहित सुहासिनिना मध्याबघी चोकोन काढून त्यामध्ये  "देवी पालघट" हिचे चित्र रेखाटले जाते. हि देवी म्हणजे  शेतीची, धनाची व लग्नाची संमती देणारी देवी तिची पूजा व स्थापना या चित्राद्वारे दोन्ही लग्नघरी रेखाटून तिची संमती मिळवली जाते. त्या दोन सुवासिनींनी काढलेल्या देवीच्या चित्राभोवती गावातील अनेक सुवासिनी चित्र पूर्ण करण्यासाठी एकत्र जमतात व झाड, फुले. माणसे, हरण, मोर अशी विविध चित्रे काढून ते चित्र पूर्ण करण्यात येते. देवीच्या एका बाजूला पाच डोके असलेल्या घोड्यावर बसलेल्या व्यक्तीचे चित्र काढण्यात येते. त्याच्या पाठीमागे चंद्र, सूर्य, केळीची झाडे आदी चित्रे काढण्यात येतात. वारली जमातीमध्ये स्वयंपाकघर म्हणजे घरातील सर्वात पूज्य व आदरणीय स्थान  मानले जाते. हे चित्र पूर्ण करायला गावातल्या सौभाग्यवती महिला अतिशय उत्सुक असतात. या चित्राचा अर्थ दोन व्यक्तींचे मिलन नसून संपूर्ण जातीचा एकत्रित सहभाग होय.
                                                 वारली चित्रकलेवर निसर्गाची मोठी पकड दिसून येते. सफेद रंग म्हणजे तांदळाच्या पीठाने बनवलेला रंग, शेणाने व गेरूने सारवलेली भिंत व चित्रांमध्ये दाट झाडी. फुले,  पणे, जनावरे, सूर्य, चंद्र हे प्रामुख्याने दिसून येते. या चित्रामध्ये त्यांचे साधे राहणीमान व स्वभाव हेही दिसून येते.
                                                साधारण १४ ते १६ व्या  शतकामध्ये पर्शियन  व मोघल कलाकृती प्रसिद्ध झाल्या. यात राजस्थानातील चित्रकलाही भारतात पसरली. बाकीच्या चित्रकलेत महागडी व कलाकुसर असलेली चित्रे आपल्याला पाहायला मिळतात. पण वारली चित्रकलेत आपल्याला साधी, स्वस्त, सोपी व आकर्षक चित्रकला पाहायला मिळते महाराष्ट्राची अस्मिता असलेली हि चित्रकला जगभर आपले नाव गाजवतेय.  


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा
  मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||

असे म्हणत कोळी लोकांचा जमाव, सजवलेला नारळ घेऊन हसत खेळत समुद्राच्या रोखाने जात असतो आणि समुद्राची पूजा करून तो नारळ त्याला अर्पण केला जातो ती दिवस म्हणजे श्रावण शु. पोर्णिमा यालाच नारळी पोर्णिमा म्हणतात. आषाढ महिन्यात व श्रावणाच्या पूर्व भागात पावसाचा जोर फार असतो. पावसाचा देव ' वरुण' याला शांत करण्यासाठी सागराला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. कोळी लोकांचे जीवन समुद्रावर अवलंबून असते त्यामुळे ते दर्याराजा शांत होण्याची ते वाट बघत असतात. श्रावण पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण करून त्या नंतर कोळी लोक मासेमारीसाठी दर्यात जहाज हाकारतात.

                          प्राचीन काळी भारतीय लोक व्यापार आणि धर्मप्रसार या साठी जलमार्गाने परदेशी जात असत. त्यांचे सुयश आणि जीवन या रत्नाकरावर अवलंबून असे म्हणून समुद्राचे पूजन व श्रीफळ दान विधी करून समुद्र शांत होण्यासाठी ते प्रार्थना करीत. तो सामुदाईक समारंभ याच श्रावण शुद्ध पौर्णिमेस करण्याची प्रथा पडली. याच दिवसापासून पाऊस संकटांचा जोर कमी होऊन त्या लोकांचा समुद्र प्रवास सुखकर होई. 

                           नारळी पोर्णिमा हा सण कोळी लोकांत फारच उत्साहाने साजरा करतात. तसेच इतर सर्व जातीतील लोकहि साजरा करतात. घरोघर गोड पदार्थांचे जेवण असते. विशेषत: नारळी भात करण्याची प्रथा आहे. सायंकाळी लहानथोर सर्वजण छान- छान नवीन कपडे घालून मुलाबाळांसह समुद्रावर जातात आणि पाण्यात नारळ टाकतात.

                           प्राचीन काळी आश्रमीय विद्यार्थी श्रावण शुद्ध पौर्णिमेस श्रावणी नावाचा विधी करत. श्रावणी करणे म्हणजे शुचिर्भूत होने. काया, वाचा, मान यापासून कळत- नकळत झालेल्या पापांचा उच्चार करून परमेश्वराजवळ  क्षमा मागणे व पुनश्च असा प्रकार न घडण्याबद्दल निश्चय करणे. अजूनही बरेच  लोक या दिवशी पंचगव्य प्रश्न करतात. होम-हवन ई. विधी प्रसिद्ध आहे.

                       हा दिवस 'रक्षाबंधन' या नावाने पण प्रसिद्ध आहे. उत्तर भारतात हा सण उत्साहाने व थाटाने साजरा केला जातो. पूर्वी राजपूत स्त्रिया शत्रूच्या  गोटात  शिरून विरुद्ध बाजूच्या वीर जवानांच्या हातात राखी बांधीत व त्यामुळे युद्ध प्रसंग टळत , अशी वर्णने राजपुतांच्या इतिहासात आढळतात.
राक्षबंधानाशी संबंधित उद्बोधक कथा अशी :,

मेवाडच्या राजावर बहादुरशाहने हल्ला केला तेव्हा राणी कर्णावतीने दिल्लीपती हुमायूनला राखी पाठवली व भाव - बहिणीचे नाते जोडले. हुमायून मेवाडच्या रक्षणासाठी आला. पण त्या आधीच बहादुरशाहने  मेवाडचा पराभव केला होता. व राणी कार्णावातीने जोहार केला होता. ती ज्या ठिकाणी जळून मेली त्या ठिकाणी फक्त राखेचा ढीग उरला होता. त्या पवित्र ढिगाजवळ   हुमायून गुढगे टेकून बसला व म्हणाला, " तुझ्या पवित्र राखीमुळे हा बहु तुझे रक्षण करण्यास बांधला होता. पण मी ते करू शकलो नाही म्हणून मला क्षमा कर."
अशा प्रकारच्या कथा इतिहासात आहेत. पण रामायण - महाभारत यात याचा उल्लेख नाही. त्यामुळे केवळ रूढीमुळे हा सण प्रसिद्ध आहे. आजूनही रक्षाबंधनाचा दिवस सर्वत्र साजरा केला जातो  व बहिण भावाच्या हातात आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राखी बांधते.

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !!

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

" Birth Control" ची "aai" - Margaret Sanger

कुटुंबनियोजन, Birth Control हि आज आम बात झाली आहे. सुखी संसारासाठी लहान कुटुंब म्हणजेच एक किंवा दोन पेक्षा जास्त मुलं नको असणं, हे सगळ्यांना पटलं आहे; पण थोड्या दशकापूर्वी केवळ आपल्याकडेच नाही तर सुधारलेल्या देशात देखील ' मुल नको' असा म्हणत नसत. परदेशातही वारंवार होणाऱ्या बाळतपणामुळे शेकडो माता आणि बालके मृत्युमुखी पडत. याविरुद्ध जगात सर्वप्रथम आवाज कोणी उठविला माहित आहे? जगात सर्वप्रथम कुटुंबनियोजन आणले कोणी माहित आहे? मैत्रिणीसाठी " Birth Control " बद्दल माहिती शोधताना हि interesting माहिती मिळाली. Birth Control चा जन्म " Margaret Sanger" मुळे झाला

१९१३ मध्ये एका truck Driver ची २८ वर्षाची बायको " Sandie " मृत्युपंथाला लागली होती. तिला ३ लहान मुळे होती व चौथं पोटात होतं. तिने गर्भपात केला होता आणि त्यामुळे ती मृत्यूच्या दाराशी होती. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नामुळे ती वाचली होती; पण ती ओरडली कि "पाचव्या मुलाच्या वेळी माझा मृत्यू अटळ आहे." डॉक्टरांना हा रोजचा अनुभव होता. पण ह्या प्रकाराने हेलावून गेली ती एक नर्स. तिचं नाव होतं Margaret Sanger . गर्भपात व त्यामुळे महिलांचे होणारे मृत्यू टाळण्यासाठी तिने निर्धार केला. १९१४ मध्ये तिने " The Women Rebel" नावाचं नियतकालिक सुरु केलं त्यातून " Birth Control " हा शब्द अस्तित्वात आला. या नियात्कालीकामुळे अमेरिकन महिला खडबडून जाग्या झाल्या. सरकारने त्यावर बंदी घातली. मार्गारेटने " Family Limitations" म्हणजेच "परिवार नियोजन" नावाचं पुस्तक लिहिलं रातोरात एक लाख प्रती गुपचूप छापण्यात आल्या आणि वाटण्यात आल्या. या कळत Margaret ने England,France आणि Holland च्या विशेषज्ञांशी संपर्क ठेवला. England चे प्रसिद्ध Gynecologist Dr. Heavlock Ealis यांच्याकडून तिने या संदर्भातील ज्ञान मिळविले. त्यासाठी ती १९१५ ला Hollond ला असलेल्या १८७८ साली उघडलेल्या जगातील पहिल्या 'Birth Control Clinic" ला भेट देवून आली. Nieuw Malthusian schen Bond (the Dutch Malthusian League) ने जगातील पहिले क्लिनिक उघडले असले तरी त्याचा फारसा प्रसार केला नव्हता. Dr. de Rooy (१८८१ ) आणि Dr. Aletta Jacobs (१८८२ ) हि संस्था जॉईन केली. Dr. Aletta Jacobs १८८३ साली आठवड्यातून दोनदा हे clinic भरवत आणि कामकाजी महिलांना "Birth Control" चा सल्ला देत. पण त्यांचे कार्य हे Holland व कामकाजी महिलांपुर्ता मर्यादित होतं. म्हणूनच १६ ऑक्टोबर १९१६ रोजी Margaret Sanger ने Brooklyn येथे उघडले "Birth Control Clinic" हे जगातील पहिले क्लिनिक मानले जाते व Margaret Sanger तळागाळापर्यंत पोहोचली व जगभर तिने हे ज्ञान फोचावण्याचा प्रयत्न केला म्हणून ती " Birth Control" ची "aai" मानली जाते. तिल्च्या क्लिनिक मध्ये पहिल्याच दिवशी १५० महिला आल्या पण १० व्या दिवशी पोलिसांनी ते क्लिनिक बंड पाडलं. मार्गारेटला हडळ, भ्रष्ट , जातीद्रोही, अजन्म अर्भकांची हत्यारी म्हटले गेले. तिला आणि तिच्या बहिणीला पकडण्यात आले.

८ जानेवारी १९१७ रोजी त्यांना ३० दिवसाच्या कारावासाची शिक्षा झाली;पण सर्व महिलांनी व सुज्ञ व्यक्तींनी ह्याचा निषेध केला. फेब्रुवारी १९१७ ला तिने "Birth Control Review" नामक नवी पत्रिका सुरु केली. त्यःचा सर्व जगात प्रभाव पडला. १९२१ मध्ये " American Public Health Association" ने New York मध्ये रात्रीया जन्म नियंत्रण संमेलन आयोजित केले. त्यात मार्गारेट ला " जन्म नियंत्रण नैतिक आहे का ? " हा विषय देण्यात आला होता. पण Roman Catholic Church च्या Arch Bishop च्या आदेशानुसार त्यावर बंदी घालण्यात आली.यामुळे उलट मार्गारेटचे महत्व वाढले.१९२२ मध्ये जपानच्या क्युबो नामक संघटनेने तिला व्याख्यानासाठी आमंत्रित केला;परंतु तिला आता वारंवार अटक करण्यात येऊ लागली. पुढे सरकारचे कायदे ढिले पडू लागले. लोकांचा आणि महिलांचा उठाव जोरात वाढू लागला. तिला सर्वत्र सन्मान मिळू लाल्ग्ला.वाढती लोकसंख्या आणि दारिद्र्य लक्षात घेऊन ती १९२३ मध्ये ती भारतात येणार होती. परंतु ब्रिटीश सरकारने तिच्या कार्यात अडथळे आणले.

पण  त्यापूर्वीच  भारतात  १९२१  साली "Birth Control Clinic" रघुनाथ  धोंडो  कर्वे  यांनी  उघडले होते.त्याचवेळी London मध्ये हि Marie Carmichael Stopes हिने हि "Birth Control Clinic" उघडले होते. रघुनाथ (जानेवारी १४, १८८२ - ऑक्टोबर १४, १९५३) हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वेयांचे पुत्र होय. त्यांच्या जन्माच्याच वेळी त्यांच्या मातोश्रींचा बाळंतपणातच देहांत झाल्यामुळे गरोदरपणा संदर्भात व्यवस्थित शिक्षण आणि माहिती व्हावी असा त्यांचा आग्रह होता.स्वत:चे जीवनप्रयोजन म्हणून जवळपास पंचाहत्तर वर्षापूर्वी लैंगिक शिक्षणाचा आग्रह रघुनाथ धोंडो कर्वे यांनी धरला होता.लैंगिक शिक्षणाबद्दल जनजागृती करण्याचा त्यांनी ध्यास घेतला होता. संभोग हा केवळ संतती उत्पादनासाठी नसून सुखासाठीदेखील असतो, असा त्यांचा विचार होता.पण संतती नियमनाची पुरेशी साधन/शास्त्रीय माहिती व मुख्य म्हणजे सामाजिक जाणीव नसल्यामुळे भारंभार पोरे होत.त्यामुळे स्त्री-आरोग्यावरगंभीर परिणाम व्हायचे.कौटुंबिक आर्थिक परिस्थिती खालावायची.खूप मुले झाल्यामुळे शारीरिक सुखाची भीती वाटायला लागायची,अशा भीतीमुळे मानसिक विकृती निर्माण व्हायची, त्यातून बलात्कार, वेश्यागमन अशा गोष्टी घडत. ह्या वेश्यागमनातून बर्‍याच व्याधी निरोगी घरांमध्ये प्रवेश करायच्या. ह्या सर्व समस्यांमध्ये र. धों. कर्व्यांना त्यांच्या कट्टर शास्त्रीय दृष्टिकोनाचा खूप उपयोग झाला.एक सोपा उपाय त्यांना सापडला. संततिनियमन.संततीनियमनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन र.धों.कर्वे यांनी १५ जुलै १९२७ ला ‘समाजस्वास्थ्य’ या मासिकाची सुरुवात केली. १९५३ प्रथमच Margaret Sanger भारतात आली; परंतु दुर्दैवाने तिची आणि रघुनाथ धोंडो कर्वे यांची दुर्दैवाने भेट होऊ शकली नाही. कारण रघुनाथ धोंडो कर्वे यांचा मृत्यू १९५३ ला झाला. या नंतर १९५९ साली पण Margaret Sanger भारतामध्ये आली. १९ फेब्रुवारी १९५९ रोजी तिने अंतरराष्ट्रीय परिवार नियोजन संमेलनाच्या सहाव्या अधिवेशनात कुटुंब नियोजनाचे महत्व प्रतिपादित केले. तेव्हाचे पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी तिच्या अनमोल कार्याचा गौरव केला. जवळ-जवळ ५० वर्षे माता, बालके, परिवार नियोजन, समजा कल्याणाचे कार्य करणारी " Birth Control" ची "aai" Margaret Sanger ने वयाच्या ८३ व्या वर्षी ६ सप्टेंबर १९६६ मध्ये या जगाचा निरोप घेतला.

●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

दहशतवाद

तिरंगा ज्याना स्वार्थाहुनहि
सदैव उंच वाटला
त्या तिथेच नेमका आज
हिरवा-भगवा पेटला
जेथे जन्मून गांधिजीनी 
जगतास शिकवीली आहिंसा
त्या तिथेच नेमकी आज
ढळढळीत जळते हिंसा
सीमेवरती जवान होते
परतविण्यास हल्ला
त्या तिथेच नेमका आज
आतिरेक्यांचा डल्ला

दहशतवाद म्हणजे हिंसेच्या किंवा दहशतीच्या मार्गाने आपले इप्सित साध्य करुन घेणे.तस बघितल तर गेल्या काही वर्षात जागतिकीकरणाचे वारे सर्वच क्षेत्रात वाहू लागले आहेत, त्याचा कमी- अधिक प्रभाव राजकीय व सामाजिक परिस्थितीवर पडलेला दिसून येत आहे.मात्र त्याचा परिणाम दहशतवादी करवायांवर होइल असे वाटले नव्हते. दोन दशका पूर्वी काही विशिष्ठ कारणामुळे निर्माण झालेला दहशतवाद आता सर्वच क्षेत्रात पसरू लागला आहे.आणि भारतासारख्या देशात तर तो एक गंभीर प्रश्न बनला आहे.२६ - ११ -  २००८ ला मुंबई वर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला आज २ वर्षे पूर्ण झाली. तरीही सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.

इतिहास बघितला तर अमृतसरच्या सुवर्ण मंदिरावर हल्ला करुन हा दहशतवाद जगासमोर आला पण इंदिरा गांधीनि शीख मत बँकेचा विचार न करता सुवर्ण मंदिरावर करवाई करुन अतिरेक्याना चोख प्रतिउत्तर दिले त्या करवाईसाठी त्याना आपल्या प्राणाची आहुति द्यावी लागली त्यानंतर १९९९ साली दहशतवाद भारतव्याप्त कश्मीर मधील कारगिल भागावर हल्ला करुन पुन्हा एकदा डोके वर काढण्याचा प्रयत्न केला ह्या वेळी ही भारताने त्यांचे डोके ठेचून काढले,ह्या नंतर मात्र ११ September  २००१ रोजी अमेरिकेवर हल्ला आणि १३ डिसेंबर २००१ रोजी भारतीय संसदेवर हल्ला करुन आपली ताकद सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. या नंतर जुलै २००५ च्या महिन्यात जगभर पुन्हा एकदा दहशतवादाने मुसुंडी मारली. जुलै महिन्याच्या सुरुवातीस लंडन, कराची, इंडोनेशिया मधील बाली येथे bomb स्पोट झाले.आणि ५ जुलै २००५ रोजी आयोधेच्या वादग्रस्त परिसरात  घुसनारया लष्कर-ऐ- तोयबाच्या आतिरेक्यना भारतीय सुरक्षा दलाच्या जवानानी चोख प्रतिउत्तर देऊन ६ आतिरेकी ठार केले. परंतू या बाबत जवानाचे कौतुक करण्या ऐवजी  भारतीय जनता पक्षाने ह्याचे राजकीय भांडवल केले.व तत्कालीन केन्द्रीय गृहमंत्री शिवराज पाटिल आणि उत्तर प्रदेश चे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्या राजिनाम्याची मागणी केली. आणि २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबई वर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा राजीनामा मगन्याचे नाट्य रंगले. पण राजीनामे घेउन किंवा देऊन हे प्रश्न सुट्नारे नाहित. त्या बाबतीत कटू निर्णय घ्यावे लागतात आज २ वर्षे पूर्ण होऊनही कसाब जिवंत आहे. त्याच्याकडून काही माहिती मिळेल ह्या उद्देशाने त्याला जिवंत पकडण्यात आले होते. माहिती मिळणे  तर दूरच पण आत्ता त्याला पोसायची जबाबदारी आली. प्रत्यक्षात त्याचा तिथेच encounter करायला हवा होता.

आज भारतात सर्वात शांत राज्य कोणतं असेल तर ते म्हणजे पंजाब. परंतु हेच पंजाब ८० च्या दशकात दहशतवादाच्या आगीत होरपळून निघाले होते. त्यावेळी इंदिरा गांधीनी आपल्या सत्तेचा, vote bank चा, आपल्या प्राणाचा विचार न करता हा दहशतवाद मोडून काढला; परिणामी आज पंजाब मध्ये शांतता नांदत आहे. त्यानंतर BJP व इतर पक्ष यांचे राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारच्या करकिर्दीकडे पाहिल्यास १९९९ ते २००४ या काळात दहशतवाद शिगेला पोहोचला. १९९९ ला कारगिल, त्यानंतर मुफ्ती मोहम्मद सैद यांची कन्या रुबिया सैदच्या सुटकेसाठी अतिरेक्यांना सोडले गेले. २००० साली काश्मीर मधून अजहर मसूद सह काही दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी विमानाचे अपहरण करण्यात आले व त्यातील प्रवाशांच्या सुटकेसाठी भाराताने आपली मान झुकवली; तत्कालीन परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग अतिरेक्यांना घेऊन थेट कंदाहारला गेले. पण ह्या ऐवजी जर विना विलंब कारवाई केली असती तर त्या व त्या नंतर झालेल्या अनेक घटनांची भारताला किमत मोजावी लागली नसती. अनेक कर दात्यांचा पैसा कसाब ला पोसण्याऐवजी भारतीय प्रगतीसाठी, सीमेवर लढणार्यांसाठी वापरता आला असता. पण राजकारण्यांना दिसत होती फक्त vote बँक.



"नवी विटी नवे राज
राजकारण्यांचा आहे जुनाच बाज
अजूनही एकमेकांना संपविण्याची भाषा
निवडणुकांचा खेळ खेळण्याची आशा
याद केली कुर्बानी संसदेच्या हल्ल्याची फक्त १५ खासदारांनी
अफजल गुरुचिया फाशी मात्र लाबविली सगळ्यांनी
हवशे - नवशे- गवशे करतात श्रद्धांजलीचे समारंभ
दहशतवाद विरोधी लढाईला अजूनही होत नाही आरंभ"



दहशतवाद आज सर्वच क्षेत्रात वादाह्त असलं तरी त्याचा उगम कसं होतो किंवा झाला हे शोधणे गरजेचे आहे. त्याशिवाय तो समूळ नसता करणे शक्य नाही. हाय दहशतवादाच्या उगमाची प्रामुख्याने ४ करणे आहेत.

    ऐतिहासिक करणे - जी काश्मीर किंवा palestine सारख्या भागात इतिहासातून निर्माण होतात.
    आर्थिक कारणे -   ब्रिटीशांच्या राजवटीपासून जमीनदारी हा प्रकार जोरात फोफावला, त्यातून स्थानिक जनतेच्या जमिनी बळकावण्याचे प्रकार वाढले त्यामुळे स्थानिक जनतेतून नक्षलवादासारखे दहशतवादी प्रकार वाढले उदा. महराष्ट्रातील गडचिरोली
    सामाजिक कारणे   - बिहार उत्तर प्रदेश सारख्या राज्यात सवर्ण विरुद्ध दलित अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पण दहशतवाद वाढीस लागतो.
    धार्मिक कारणे - जगात विविध धर्म असले तरी एखादा धर्म स्वताला उच्च समजतो किंवा तसे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो या प्रचारासाठी हिंसेचा वापर केला जातो किंवा एखाद्या धर्मावर अन्याय केल्यास त्यातून हा दहशतवाद जन्माला येतो. उदा. जिहाद.


जिहाद च्या नावाखाली आज संपूर्ण जग दहशतवादाच्या काळ्या छायेखाली आहे. पण जिहाद म्हणजे नक्की काय ? " जिहाद" हा एका अरेबिक शब्द "जाहादा" वरुन घेण्यात आला आहे. जॉन एस्पोसितो ह्यांनी जिहाद वर बोलताना म्हटले आहे कि "Jihad requires Muslims to "struggle in the way of God" or "to struggle to improve one's self and/or society." Jihad is directed against Satan's inducements, aspects of one's own self, or against a visible enemy.The four major categories of jihad that are recognized are Jihad against one's own self (Jihad al-Nafs), Jihad of the tongue (Jihad al-lisan), Jihad of the hand (Jihad al-yad), and Jihad of the sword (Jihad as-sayf).Islamic jurisprudence focuses on regulating the conditions and practice of Jihad as-sayf, the only form of warfare permissible under Islamic law, and thus the term Jihad is usually used in fiqh manuals in reference to military combat."   हझरत मिर्झा  ताहीर  अहमद ह्यांनी आपले पुस्तक " Murder in the Name of Allah" मध्ये लिह्हून ठेवले आहे कि "As far as Islam is concerned, it categorically rejects and condemns every form of terrorism. It does not provide any cover or justification for any act of violence, be it committed by an individual, a group or a government..... I most strongly condemn all acts and forms of terrorism because it is my deeply rooted belief that not only Islam but also no true religion, whatever its name, can sanction violence and bloodshed of innocent men, women and children in the name of God."  पण प्रत्यक्षात जिहाद च्या नावाखाली विकृतपणा चालवला  जातोय.



आत्ता पर्यंतच्या हल्ल्याची यादी बघितली तर

१२ मार्च १९९३ - मुंबई बॉम्ब ब्लास्ट
१४ फेब १९९८ - Coimbatore
१९९९  - कारगिल हल्ला
१३ डिसेंबर २००१ -  भारतीय संसद
१० oct २००१ - J & K 
२५ sept २००२ - अक्षरधाम मंदिरावरील हल्ला
६ डिसेंबर २००२ -  मुंबई
२७ jan २००३ - मुंबई
१४ मार्च २००३ - मुंबई
२८ जुलै २००३ - मुंबई
२५ ऑगस्ट २००३ - मुंबई
१४ मे २००३ - J & K
१५ ऑगस्ट २००४ - आसाम
२९ ऑक्टोबर २००५ - दिल्ली
१८ september २००५ - आसाम & मणिपूर
२० september २००५ - मणिपूर
२८  डिसेंबर २००५ - कर्नाटक
११ जुलै २००६ - मुंबई
७ मार्च २००६ - वाराणसी
८ september २००६ - मालेगाव
२५ ऑगस्ट २००७ - आंध्र प्रदेश
१८ मे २००७ - आंध्र प्रदेश
२६ नोव्हेंबर २००८ - मुंबई
२५ जुलै २००८ कर्नाटक
१३ feb २०१० - पुणे




आज जगात सर्वच देशावर अतिरेक्यांचे हल्ले होत आहेत वरील सर्व घटनांचा जर गांभीर्याने विचार केला तर त्यांची काही ठराविक तंत्रे दिसून येतील.

    अपहरण - एखाद्या किंवा अनेक व्यक्तींचे अपहरण , जहाजाचे किंवा विमानाचे अपहरण करून शासन किंवा संबधित गटाकडून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या जातात. ९० च्या दशकात तत्कालीन गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सैद यांच्या कन्येला ओलीस ठेवून ५ अतिरेक्यांची सुटका करून घेतली होती.
    बॉम्ब ब्लास्ट - दूरवर थांबून नियंत्रणाद्वारे अथवा वेळेनुसार फुटणारे बॉम्ब यांची योजना करून दहशत पसरवली जाते. ११ जुलै २००६ अंधेरी rly स्टेशन
    स्वैर गोळीबार - बाजारपेठ , मंदिरे, हॉटेल्स ई. ठिकाणी स्वैर गोळीबार करून दहशत पसरवणे.
    जातीय व धार्मिक दंगल - धर्माच्या नावावर लोकांना चिथावून दंगल घडवणे.

आज २६/११ ला २ वर्षे पूर्ण होतात. तो अजमल कसाब अजूनही जिवंत आहे. आमचे मंत्री जाऊन त्याची चौकशी करतात "कोई तकलीफ तो नाही है |" कवी इक्बाल यांनी म्हटले आहे कि " सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा" त्यावर मला बोलावसं वाटत कि;


"सारे जहा से अच्छा हिंदोस्ता हमारा
इथे प्रत्येकजण भांडतोय
ये हमारा, वो तुम्हारा
पाण्यात  बुडून स्फोटात उडून
माणूस भयाने खंगतो
T .V . च्या channels वर "सबसे तेज" TRP चा खेळ रंगतो."


~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

हुरहूर..............................

Disclaimer: हि  कथा  निव्वळ  एक  मनोरंजन  म्हणून  वाचावी . सत्याशी ह्या कथेचा   काहीही  संबंध  नाही  !!!!


रात्रीचे १०:०० वाजत आले होते तो रूम मध्ये आली आणि पहिला त्याला call लावला.तो जेवत
होता पण तिचा call आणि तोही रात्री म्हणून त्याने headphone लाऊन तिचाcall pick केला.
ती: hello !
तो: hi बोल ! 
ती: जेवलास का?
तो: जेवतोय बोल ना !!
ती: तू जेवून घे. मग आपण बोलू !
तो: बोल ग! मी headphone लावलाय , तू बोल
ती: अरे actually एक  bad news आहे!
तो: का? काय झाले? आपण........ (त्याचे बोलणे अर्ध्यावर तोडत ती म्हणाली)
ती: (उदासपणे) आपण उद्या नाही भेटू शकत!!
तो: वाटलाच होता मला, इतक्या रात्री तुझा call आला म्हणजे ....... काय झालं?
ती: sorry रे! मी तुला म्हटलं होतं ना कि, मी sunday ला family बरोबर जाणार
होते ना त्या ऐवजी उद्या चाललोय रे
तो: उद्या अचानक! sunday ला जाणार होतात ना.
ती: हो रे पण दादा आला ना माझा फोफळी वरुन आणि त्याला तिकडे परत पण जायचे आहे.job ला  असतो तो  तिकडे.(तिला मनातून वाटत होतं त्याने तिला सांगावं जाऊ नको नाकाहीतरी कारण काढून मला भेट ना)
तो: ठीक आहे जा तू. आपण नंतर भेटू ..(त्याला मनातून वाटत होते कि ती बोलावे family  चालली आहे ना जाऊ दे मी नाही जात तुला भेटायला येते.)
call वर ३-४ सेकंद शांतता होती कोणीच काही बोलले नाही. तिच्या नी त्याच्या ओठी शब्द अडले होते. बोलणार कसं? आपला हक्क आहे का बोलण्याचा हाच प्रश्न दोघांना पण पडला होतं शेवटी ह्या शांततेचा भंग करीत तीच बोलली.
ती: तू जेवून घे आपण नंतर बोलू.
तो: bye GN SD TC
ती: bye GN SD TC

call cut करून mobile तिने charging ला लावला. व laptop चालू  करून  ती  gtalk वर  online आली.  तिला  एक - दोन  मित्रांनी  पिंग  केला  पण  तिचं  कशातच  लक्ष  लागत  नव्हत  शेवटी  signout केला  आणि  laptop बंद  करून  झोपायला  आली  पण  त्याच्या  आठवणी  तिला  झोपू  देत  नव्हत्या . तिला  सारखा  वाटायला  लागला  कि  तो  नाही  बोलला  म्हणून  काय   झाले  आपण  बोलायला  हवे  होते  कि  मी  येते  भेटायला  जात  नाही  family   बरोबर , लगेच  मनात  विचार  डोकावला  मीच  का  बोलू  तो  का  नाही  बोलला;  तो  बोलला  असता  तर  काही  फरक  नसता  पडला  पण   नाही  बोलला;  जाऊ  दे!  असं  म्हणून   ती  ह्या  कुशीवरून  त्या  कुशीवर  वळली  तसं  तिला  त्याच्या  आठवणी  आणखीनच  घेरू  लागल्या . त्याच्या  सोबतच  buzz  वरील  पहिला  भांडण  आणि  नंतर  अचानक  1 month   ने  तिच्या  blog   वरील guest chat apps वापरून  तिला  केलेलं   ping  आणि  मग   त्याच्या  बरोबर  वाढत  गेलेल्या  गप्पा  सगळंच  तिला  टप्प्याटप्प्याने  आठवू  लागले.

त्याचं  ते  रोज  ping करण  आणि  GM केल्याशिवाय  कामाला  सुरवात  ना  करणं, तिचं  सकाळी  लवकर  online  येऊन  त्याच्या  येण्याची  वाट  बघणं, त्याला wish केल्यावरच  दिवसाची  सुरवात  करणं. तिच्या  ओठी  अलगद  हसू  फुलवून  गेलं; असाच  त्याने  ping केलं.  
तो: hi सोना
ती: hey तुला  माझा  nick name कसं  कळलं?
तो: कळलं  मला.  आपल्या  आवडत्या  माणसाची  बातमी  ठेवावी  लागते.
ती: जा  बाबा  तू  सांगत  नाही  ना  मला  मी  नाही  बोलणार  तुझ्याशी.
तो: बरं  तू   चिडू  नको  मी  सांगतो  अगं  तू  माझ्या  blog   ला  follow करते   आहेस ना  तिकडे  तुझा  सोना  display होतंय  म्हणून  मला  कळलं
ती:
तो: बरं  ते  जाऊ  दे  मी  एक  कविता  post केली  आहे  buzz वर  ती  check कर  आणि comment दे
ती: बरं
काय  सुंदर  लिहिली  आहे  कविता  ह्या  वेड्याने  पण माझी commet का  जात  नाही.    त्याला  विचारले  पाहिजे. इतक्यात  त्यानेच  ping केले.
तो: सोना   comment नाही  दिली 
ती: वेड्या  मी  comment नाही  देऊ  शकत  रे
तो : की  झाले
ती: अरे  i dont have permission to post comment
तो: wait मी  check करतो  काय  झाले  ते.
ती: k
तो:  sorry तू  block झाली  होतीस  ग  रागावू  नको  मला  नाही  माहित  कशी  काय . i m sorry plz
ती: ok रे  sorry नको  म्हणू  मला  माहित  आहे  मी  block  का  होती.
तो: i m sorry मी  नाही  केलं  ते  मला  खरच  माहित  नाही  गं.
ती: अरे  वेड्या  माझं  ऐकून  घे  आधी  मला  माहित  आहे  मी  block का  होती  . अरे  1month पूर्वी  आपला  buzz वर  भांडण  झालं  होतं  म्हणून  तू  रागाने  मला  block   केलं  होतास  कळलं का?
तो : ok म्हणजे  ती  तू  होतीस  तर
ती  आता  परत  मला  block करणार  का ?
तो : नाही  ग  sona नाही  block करत 
ह्या  आठवणी  सरशी  तिचं  तिलाच  हसू  आला  आणि  ती  bed वर  उठून  बसली  जवळच  असलेया  बाटलीतून  पाण्याचा  घोट  घेतला  व  घड्याला  कडे  बघितलं  तर  रात्रीचे  १० :४५  वाजले  होते. आणि  तिला  परत  आठवले  कि  आपण  सकाळी  १०:४५  चा  show बघितला होता   पहिल्या  भेटीत.  ती  पुन्हा  bed वर  आडवी  झाली  आणि  ती  अंगावरची  चादर  सरळ  करता - करता त्याच्या आठवणीत  परत  गुरुफटली.  एक  - मेकांशी  बोलता  बोलता  cell no. Exchange झाले. 
मग  कधी  तरी  call वर पण  बोलण  होऊ लागल. मग  असाच  एकमेकांशी  बोलताना  त्याने  तिला  विचारलं  आपण  भेटूया  का ? ती  पण  लगेच  हो  म्हणाली.
तो: कुठे  भेटूया  तू  सांग ?
ती: वाशी  चालेल. 
तो: हो  चालेल  movie बघायला  जाऊया  पण  भेटायचा  कधी ?
ती: तुला  ह्या  येणाऱ्या  saturday  means   6 th ला  सुट्टी  आहे  का  आपण  भेटलो  असतो.
तो: चालेल  कोणता  movie release होतोय. 
ती: action reply आणि  गोलमाल  ३ release होत आहेत
तो: गोलमाल ३  बघायला  जाऊ  या. एक  प्रश्न   विचारू  का  तुला?एका  unknown मुलाला  भेटायची  भीती  नाही  का  वाटत  तुला?
ती: नाही  वाटत  भीती,  dont worry! आणि  तसं  पण  तू  माझ्या  area मध्ये  येत  आहेस.
तो: madam , वाघाला  area नसतो 
ती: ohhhhh really?बरं  ठीक  आहे  सकाळी  १०:३०  ला  भेटू ६ तारखेला  मी  १० :४५  च्या show चे  tickets book करून  ठेवते 
तो : ठीक आहे ok chal bye मी ठेवतो phone
ती : chal bye tc
तो: tc
त्याने call cut केलं  असला  तरी  तिच्या  मनात  त्याच्या   भेटीची  हुरहूर  लागली  होती . काय  होईल ? कसा  असेल  ? असे  सगळे  प्रश्न  तिला  पडले  होते? त्या सर्व  प्रश्नांची  उत्तरे  तिला  फक्त  ६  November ला  मिळणार  होती.

क्रमश:
 
by~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•
December 29, 2017

जॉनी लिवर.....कसा घडला

जॉनी लिवर.....कसा घडला तो.
. जगातील सर्वात मोठी म्हणून गाजलेल्या धारावी झोपडपट्टी मध्ये एक १०-१२ वर्षांचा, काळासावळा व दिसायलाही ओबडधोबड असा 'जॉन प्रकाश ' लहानाचा मोठा झाला.

घरात पाच भावंड होती. तीन बहिणी,दोन भाऊ. त्यात तो सर्वात मोठा. घरची गरीब परिस्थिती. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्याला शाळा सोडावी लागली. २-३ वर्षे तो मुंबईत रस्त्यावर पेन विकायचा.तेव्हा तो वेगवेगळ्या सिनेकलाकारांचे आवाज काढायचा. त्यामुळे पेन खरेदी करण्यासाठी नव्हे तर ते आवाज ऐकण्यासाठी खूप गर्दी जमायची.

त्याचे वडील 'हिंदुस्तान लिवर 'मध्ये मजुरी करायचे.
त्यांनी त्यालाही वयाच्या बाराव्या वर्षी मजूर म्हणून तिथे चिकटवला. लंच टाईममध्ये तो मिमीक्री करून कामगारांची खूप करमणूक करायचा. त्यामुळे तो सर्वांचाच आवडता झाला होता. धारावीमध्ये सगळ्याच गणेशोत्सवात त्याला मिमीक्रीसाठी बोलावलं जाई. पोट धरून हसायला लावणारी त्याची कॉमेडी ऐकून श्रोते त्याच्यावर अक्षरशः फिदा होत.

अनेकांनी त्याला शोसाठी आमंत्रण दिलं. कंपनीमध्येही विशेष समारंभ असला की तो त्याची कला सादर करायचा.कामगारांनी तर त्यांच्या हिंदुस्तान लिवर कंपनीमधील 'लिवर' त्याच्या नावाला जोडून त्याला 'जॉनी लिवर' हे टोपण नाव दिलं. तेव्हा जॉनी लिवर हे नाव देशातील लाखो करोडो जणांना पोट धरून हसायला लावणार आहे व तो शेकडो चित्रपटात अभिनय करणार आहे, असं स्वप्नातही कुणाला वाटलं नसणार.अनेक ठिकाणी मिमीक्रीचे शो केल्यामुळे एक दिवस जॉनी लिवर संगीतकार कल्याणजी आनंदजींच्या नजरेस पडला.त्याच्या मिमीक्रीवर ते इतके फिदा झाले,की त्यांनी त्याला त्यांच्या "कल्याणजी आनंदजी शो " साठी परदेश दौ-यावर नेलं आणि जॉनी लिवर नाव देश विदेशातही गाजू लागलं. आजही जॉनी लिवर त्यांना त्यांचा 'गॉडडफादर ' मानतो. त्यांच्यामुळेच त्याला १९८० मध्ये चित्रपटात भूमिका मिळाली.

पण मिमीक्री कलाकार चांगला कलाकार असू शकत नाही असा ठाम समज असलेल्या बॉलीवूडने त्याला नंतर भूमिका दिल्या नाहीत. तब्बल बारा वर्षे त्याला त्यासाठी अथक संघर्ष करावा लागला.१९९२ मध्ये आलेल्या 'बाजीगर' मधील त्याच्या भूमिकेमुळे अनेक निर्माते त्याचे उंबरठे झिजवू लागले होते. तब्बल १३ वेळा त्याला 'फिल्मफ़ेअर' पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आलं. दोन वेळा त्याला ते मिळालही. तोपर्यंत जॉनी एका चित्रपटासाठी मोजून तीस लाख घेऊ लागला होता. दरवर्षी तो ५-६ चित्रपटात तरी असायचाच.

यशाच्या शिखरावर असतानाही तो धारावीतील त्याच्या गरीब मित्रांना खूप मदत करायचा. कोणाच्याही अडीअडचणीला सढळ हाताने मदत करायचा. तब्बल ३०० चित्रपटांमध्ये त्याने विनोदी भूमिका केल्या. जॉनीचं विमान गगनात भरारी घेतच होतं. पण अकस्मात त्याच्यावर आभाळच कोसळलं. त्याच्या १० वर्षाच्या मुलाला २००० मध्ये कॅन्सर झाला व जॉनी कोसळून पडला. मुलाच्या मानेवरील ट्युमर दिवसेंदिवस वाढू लागला. जॉनीने काम करणच बंद केलं. नानावटी हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी ट्युमर काढला तर मुलाला पैरालिसिस होईल किंवा त्याची वाचा जाऊ शकते,हे सांगितलं.

त्या दिवशी देशातील करोडो लोकांना पोट धरून हसवणारा जॉनी ढसाढसा रडला.
मानेवरचा ट्युमर मुलगा शाळेत जाताना कॉलरमागे लपवायचा तेव्हा जॉनी शोकाकुल व्हायचा. एक दिवस त्याला कोणीतरी अमेरिकेतील डॉक्टर जतिन शाहंचं नाव सांगितलं व जॉनी त्याच्या मुलाला घेऊन अमेरिकेला गेला. त्यांनी ऑपरेशन करायचा निर्णय घेतला पण देवाची प्रार्थना करायला सांगितली.त्या दिवशी जॉनी देवाला अक्षरशः शरण गेला. भरलेल्या डोळ्यांनी त्याने देवाकडे मुलासाठी प्रार्थना केली. खरोखरच जॉनीला देव पावला. ऑपरेशन यशस्वी झालं. त्यानंतर मुलगा बरा झाला. त्या दिवसापासून जॉनीने कधी दारूला स्पर्श केला नाही. सिगारेट कधी हातात धरली नाही. डोक्यात कधी वाईट विचारांना थारा दिला नाही.

मित्रानो, आम्ही कुठल्या परिस्थितीत जन्मलो, यामुळे खरं तर काही फरक पडत नाही. आमच्यातील अंगभूत गुणच आम्हाला यशाकडे घेऊन जात असतात. फक्त त्या गुणांना चांगलं खत पाणी घालून प्रचंड मेहनत घ्यायची एवढच लक्षात ठेवायचं. कठीण परिस्थितीत जॉनी लिवरने जे यश मिळवलं, ते आम्हाला नक्कीच प्रेरणा देत राहील व संकटाचा सामना करताना देवावर विश्वास ठेऊन हिंमत न हारता लढत राहाण्याचं बळ देईल...???
December 29, 2017

मग, आम्ही का नाही

आईचे प्रेम आणि बापाचे छत्र नसलेला 'बराक'
नावाचा पोर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होतो
पेट्रोलपंपा वर काम करणारे 'धीरुभाई' करोड़ोंचे
साम्राज्य उभे करतात...
कॉलेजच्या प्रवेश फी साठी पैसे नाहीत म्हणून
बहिणीचे दागिने गहाण ठेवणारे 'अब्दुल कलाम'
राष्ट्रपती पदापर्यंत जातात
जातीय व्यवस्थेमुळे अपमान सहन करणारे डॉ.
बाबासाहेब आंबेडकर भारताची राज्य घटना लिहितात.
रोजगार हमीच्या कामावर जाणारे आर.आर.पाटील
राज्याचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री होतात.
सत्तावीस वर्ष तुरुंगात काढणारे 'नेल्सन मंडेला'
जगाला प्रेम शिकवतात.
कुठलीही शारीरिक हालचाल न करू शकणारे
'स्टीफन हॉकिंग' जग हलवणारे संशोधन करतात...
"शुन्यातून प्रवास करत माणसे प्रेरणादायी जग
निर्माण करतात..."
मग, आम्ही का नाही???"
माणूस किती किंमतीचे कपडे
वापरतो यावरून त्याची किंमत
होत नसते ,
परंतु , तो इतरांची किती किंमत
करतो यावरून त्याची किंमत
ठरत असते .
पक्षी जेंव्हा जिवंत असतो तेंव्हा तो किड्या मुंग्याना खातो पण जेंव्हा पक्षी मरण पावतो तेंव्हा तेच कीड़े मुंग्या त्या पक्षाला खातात.
वेळ आणि स्थिती केंव्हाही बदलू शकते.
कोणाचा अपमानही करू नका आणि कोणाला कमी लेखु नका.

तुम्ही खुप शक्तिशाली असाल पण वेळ ही तुमच्या पेक्षाही शक्तिशाली आहे

. एका झाडापासून लाखो माचीसच्या काड्या बनवता येतात पण एक माचीसची काडी लाखो झाडे जाळून खाक करू शकते.
कोणी कितीही महान झाला असेल पण निसर्ग कोणाला कधीच महान बनन्याचा क्षण देत नाही.

कंठ दिला कोकीळेला पण रूप काढून घेतले.
रूप दिले मोराला पण ईच्छा काढून घेतली.
ईच्छा दिली मानवाला पण संतोष काढून घेतला.
दिला संतोष संतांना पण संसार काढून घेतला.

हे मानवा.... कधी करू नको अहंकार स्वतःवर तुझ्या माझ्या सारख्या किती जणाना मातीतून घडवल आणि मातीतच घातल.

लग्नाच्या वरातीत लोकं पुढे नाचत असतात, तर अंत्ययात्रेला मागुन चालत असतात.
याचाच अर्थ असा की लोकं सुखात पुढेपुढे नाचत असतात आणि दुःखात मागुन चालत असतात.
लोक त्यांच्या रितीने पुढेमागे होतच असतात. त्यामुळे लोकं आपल्या पुढे असली काय किंवा मागे असली काय, आपलं जीवन आपण आपल्या हिमतीवर व निश्चयानेच जगायच असत.....

थोडस महत्वाचं-


1) अन्य जाती-धर्मांवर टिका
करत वेळ वाया घालवू नका.
जे चांगलं असेल त्या गोष्टी
आत्मसात करा.
2) दंगली- मारामारी करुण आपलं
नाव खराब करुण घेऊ नका.
आता लढाईचा काळ
राहिलेला नाही.
3) उच्च शिक्षण तुम्हाला आणि
तुमच्या पुढच्या पिढीला चांगलं
जीवन देऊ शकतं.
4) राजकीय पक्षांचे झेंडे उचलून
गुलामी करू नका.
5) आजचा तरुण एकमेकांना मदत
करुण प्रगती करू शकतो.
त्यासाठी राजकीय पक्षाची वा
नेत्याची गरज नाही.
6) मंदिरात दान करण्याऐवजी
गरीब आणि गरजू तरुणांना
मदत करा. ते तुम्हालाही कधीतरी
मदत करतीलच.
7) चार दिवस सुट्टी काढून कुटुंबा सोबत देवस्थळी, प्रेक्षनीयस्थळी जरुर फिरा पण त्यातला कही वेळ
समाजाच्या प्रगतीसाठी द्या
समाजही तुम्हाला कधीतरी
मदत नक्कीच करेल.
8) इंग्लिश बोलायला शिका.
हा मराठीचा किंवा हिंदीचा अपमान नाही काळाची गरज आहे.
9) व्यायाम, योग, मैडिटेशन करीता स्वतःसाठी दिवसातून तास भर वेळ द्या.
"जगाला काय आवडतं ते करु नका,
तुम्हाला जे वाटतं ते करा,
कदाचित उदया, तुमच वाटणं जगाची "आवड" बनेल.
December 29, 2017

शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा

शाळेने पत्रक काढलं,'; यंदाच्या वर्षापासून शाळेतल्या सर्वात गरीब मुलाला आर्थिक मदत द्यायचीबी आहे, तेव्हा शिक्षकांनी प्रयत्नपूर्वक अचूक मुलगा निवडावा,ज्यायोगे ही मदत योग्य विद्यार्थ्याला/विद्यार्थिनीला मिळेल !
आता सर्वात गरीब मुलगा शोधणे म्हणजे, खरोखर पंचाईतच होती. ही छोटी मुलंसुद्धा इतकी नीटनेटकी राहतात की,अगदी एक
विजार, एक सदरा असेल,तरी तो रोज धुऊन-वाळवून त्याची इस्त्री केल्यासारखी घडी करून मगच तो घालतात
गरीब मुलगा शोधायचा कसा ? आणि प्रत्येकाला विचारायचं तरी कसं, तुमच्यात कोण गरीब; तेही सर्वात गरीब म्हणून? मोठीच अडचण होती. तीन - चार दिवस नुसता अंदाज बांधण्यात गेले. वयाने मोठ्या माणसांमधे गरीब माणूस शोधणं सोप्पं आहे ;पण लहान मुलांमधे अडचणीचं .शेवटी दोन-चार मुलांना हाताशी घेतलं, जी गाडीने शाळेत यायची
आणि गाडीनेच घरी जायची.

मधल्या सुट्टीत अचानक वर्गात आलो तर ती सफ़रचंद खातांना मला दिसायची. अशा मुलांना विचारलं ," मला एक मदत कराल का? आपल्या वर्गातला सर्वात गरीब.......?"
क्षणाचाही विलंब न करता सर्वानी एकच नाव उच्चारले," सर आपल्या वर्गातला तो मयूर आहे नं, तो सर्वात गरीब आहे."
मुलांनी एका झटक्यात प्रश्न सोडवला होता. "कशावरून म्हणता?"
" सर. त्याचा सदरा दोन- तीन ठिकाणी तरी फ़ाटलाय. त्याने शिवलाय; पण फ़ाटलेला शर्ट घालतो. त्याची खाकी पॅंट तर नीट बघा , मागून दोन ठिगळं लावलेली आहेत. चपला त्याला नाहीतच. मधल्या सुट्टीत आम्ही डबा उघडतो . तो मात्र प्लॅस्टीकच्या पिशवीतून अर्धी भाकरी आणतो.सर,ती भाकरीही कालचीच असते.भाजी कुठली सर? गुळाचा खडा असतो. आम्ही सांगतो,तो सर्वात गरीब आहे. शाळेने त्याच मुलाला मदत द्यायला हवी ."
मुलं एखाद्या खळाळत्या प्रवाहासारखी पुढे बोलतच राहीली . पण मला ते ऐकू येणे शक्य नव्हते. मयूर एवढा गरीब असेल? की सर्वांनी एकमुखाने त्याच्या गरीबीचे दाखले द्यावेत? कारण, मयूर वर्गातील सगळ्यात चपळ मुलगा होता. अक्षर स्वच्छ, मोकळं होतं. त्या अक्षरात त्याच्या नितळ मनाचे दर्शन मला घडे. एकदा तर त्याची वही मी माझ्या घरात पत्नीला दाखवली आणि म्हट्लं, " पाहिलंस ! हे सातवीतल्या मुलाचे अक्षर.असं अक्षर असावं हे माझे स्वप्न होते.उत्तराला सुबक परीच्छेद, समास सोडून योग्य प्रस्तावना आणि अखेर करून लिहिलेली उत्तरे........." चे गठ्ठे आणायला मयूर सर्वात आधी धावत यॆई. माझ्याआधी ते गठ्ठे उचलून वर्गात नेण्याचा उत्साह मला थक्क करून टाकत असे......

असा मयूर परिस्थितीने एवढा खचलेला असेल याची कल्पनासुद्धा मला येऊ नये, या गोष्टीचीच मला खंत वाटली .जी गोष्ट माझ्या इतर विद्यार्थ्यांना उमगते आणि मला त्याचा पत्ताही नसतो......अरेरे!...,
मी खूप कमी पडतोय. मयूर , गेल्या सहलीला आला नव्हता. अवघी पंचवीस रूपये वर्गणी होती; पण त्याचं नाव यादीत नव्हतं. आपण त्याला साधं विचारलंसुद्धा नाही.
असलेल्या मुलांच्या किलबिलाटात न आलेल्या मयूरची मला आठवणही झाली नव्हती. केवळ पंचवीस रूपये नसल्याने त्याचे National Park बघण्याचे राहून गेले. एका छान अनुभवाला मुकला होता तो. हा आनंद मी हिरावला होता.यादीत मयूरचे नाव नाही म्हणून मी त्याला जवळ का बोलावलं नाही? मयूर स्वत:हून सांगणं शक्यच नव्हतं आणि माझ्या व्यग्र दिनक्रमात मयूरसाठी जणू वेळच शिल्लक नव्हता!
शिक्षक म्हणून मी एक पायरी खाली आलो होतो. खरंच आहे, मुलांनी सुचवलेलं नाव. आर्थिक मदत, तीही भरघोस मदत मयूरला मिळायलाच हवी. आता शंकाच नव्हती. त्याची गरीबी बघायला त्याच्या घरी जायचेही काहीच कारण नव्हते. मुलांनी एकमुखाने सुचवलेले नाव आणि मयूरने सहलीला न येणं याची सांगड घालून मी मुख्याध्यापकांना नाव देउन टाकले'; मयूर जाधव, सातवीअ, अनुक्रमांक बेचाळीस';
डोळ्यावरचा चष्मा हातात खेळवीत आदरणीय मुख्याध्यापक म्हणाले, " खात्री केलीये ना सर? कारण थोडीथोडकी रक्कम नाही. या विद्यार्थ्याची वर्षाची फ़ी, त्याचे शालेय शिक्षण साहित्य, गणवेश...इत्यादी सर्व या रकमेत सामावणार आहे."
मुख्याध्यापकांना मोठया आत्मविश्वासाने मी म्हटलं, " सर, त्याची काळजीच करू नका. वर्गातला सर्वात गरीब आणि आदर्शही म्हणा हवं तर-मयूर जाधवच आहे!"
एका योग्य विद्यार्थ्याची निवड केल्याचे समाधान घेऊन मी निघालो. मयूरला मिळणारी मदत, त्यामुळे त्याचे आर्थिकद्रूष्ट्या सुसह्य होणारे शैक्षणिक वर्ष याची कल्पनाचित्रे रंगवतांना दिवस कसा संपला ते कळालेच नाही.
दुस~या दिवशी शाळेत लवकरच गेलो. देखण्या अक्षराच्या कदम सरांनी मोठ्या दिमाखाने फ़ळा सजवला होता.त्यावर 'गरीब असूनही आदर्श ' असं म्हणून मयूरचं नाव होतं. शाळा भरली. मी अध्यापक खोलीत बसलेलो होतो. इतक्यात खोलीच्या दाराशी मयूर उभा दिसला.
त्याच्या चेह~यावरचा भाव समजत नव्हता. राग आवरावा तसा करारी चेहरा... " सर, रागवू नका; पण आधी त्या फ़ळ्यावरचे माझे नाव पुसुन टाका." अरे, काय बोलतोयस तुला समजतय का?" चुकतही असेन मी . वाट्टेल ती शिक्षा करा; पण ते नाव...!!"
त्याच्या आवळलेल्या मुठी, घशातला आवंढा, डोळ्यातलं पाणी......मला कशाचाच काही अर्थ लागेना. मी ज्याचं अभिनंदन करायच्या तयारीत, तो असा.....?
" सर, मला मदत कशासाठी?
गरीब म्हणून? मी तर श्रीमंत आहे."
त्याची रफ़ू केलेली कालर माझ्या नजरेतून सुटत नव्हती.येतानाच त्याचे अनवाणी पाय पाहिले होते. शाळेच्या चौदा वर्षाच्या माझ्या व्यावसायिक कालखंडात अशी पंचाईत प्रथमच आली होती.
"अरे पण....?"

"सर,विश्वास ठेवा.मी श्रीमंत आहे.कदाचित सर्वात श्रीमंत असेन...सर, मी गरीब आहे हे ठरवले कोणी? मी चुकतोय बोलतांना हे कळतंय मला; पण सर ते नाव तसंच राहिले तर मी आजारी पडेन आज."
अचानक तो जवळ आला आणि त्याने माझे पायच धरले. त्याला उठवत मी म्हणालो, " ठीक आहे. तुला नकोय ना ती मदत, नको घेऊस; पण तू श्रीमंत आहेस ते कसे काय?"
" सर, माझ्या अभ्यासाच्या वह्या बघा, कुठल्याही विषयाच्या.... त्या पूर्ण आहेत.पुस्तकं मी Second Hand वापरतोय ...खरयं ! पण मजकूर तर तोच असतो ना? मनात काय उतरवतो ते महत्वाचे नाही का?
सर, माझे पाचवीपासूनचे मार्क बघा, नेहमी पहिल्या तीनात असतो. गेल्या वर्षी स्पोर्टसपासून निबंधापर्यंत सर्व बक्षिसे मलाच आहेत.
सर...सर,सांगा ना, मी गरीब कसा?"
मयूर मलाच विचारत होता आता मघाचचं दु:खाचं पाणी विरून त्यात भविष्याचं स्वप्न थरारत होतं.
"खरयं मयूर. पण तुला या पैशाने मदतच......."
" सर, मदत कसली? माझी श्रम करण्याची वॄत्तीच नाहीशी होइल. शाळाच फ़ी देतीये म्हटल्यावर, मी वडीलांबरोबर रंगाच्या कामाला जाणं बंद करेन! "
"म्हणजे?"
" वडील घरांना रंग द्यायचे काम करतात. Contractor बोलावतो तेव्हाच काम मिळते. तेव्हा ते मला त्यांच्याबरोबर नेतात. चार पैसे मला मिळतात, ते मी साठवतो. सर, संचयिका आहे ना शाळेची, त्यातलं माझं पासबुक बघा. पुढच्याही वर्षाची फ़ी देता येइल एवढी रक्कम आहे त्यात...
मुलांनी तुम्हाला काहीतरीच सांगितलेले दिसते.....
म्हणून तुम्ही मला निवडलेलं दिसतं. पण सर, मीच नाही तर आमचं घरच श्रीमंत आहे. घरातले सगले काम करतात. काम म्हणज कष्ट. रंगाचं काम नसतं तेव्हा बाबा स्टेशनवर हमालीही करतात.आई धुणं-भांडी करते. मोठी बहीण दुसरी-तिसरीच्या शिकवण्या घेते. सर, वेळ कसा जातो,दिवस कसा संपतो ते कळतच नाही....शाळेतल्या वाचनलयातली पुस्तकं मीच सर्वात जास्त वाचली आहेत. तुम्हीच सांगितल्याप्रमाणे लेखकांनाही पत्र पाठवतो मी. सर, माझ्या घरी याच तुम्ही, माझ्याकडे पु.ल. देशपांडे यांच्या स्वाक्षरीचं पत्र आहे. ........सर,आहे ना मी श्रीमंत?"
आता तर तो स्मितरेषांनी मोहरला होता. सर, शेजारच्या काकांकडून मी उरलेल्या वेळात पेटीही शिकलो. रात्री देवळात होण्या~ या भजनात मीच पेटीची साथ देतो. भजनीबुवा किती छान गातात! ऐकताना भान हरपून जातं."
त्याच्या सावळ्या रंगातही निरोगीपणा चमकत होता.अभावितपणे मी विचारलं," व्यायामशाळेतही जातोस?"
"सर, तेवढी फ़ुरसत कुठली? घरातच रोज चोवीस सूर्यनमस्कार आणि पन्नास बैठका काढतो ."
अंगावर एक थरार उमटला... कौतुकाचा.
" मयूर मित्रा, मला तुझा अभिमान वाटतो.तुझ्यासारखा श्रीमंत मुलगा माझ्या वर्गात आहे त्याचा .."
" म्हणूनच म्हणतो सर......!"

" हे नाव ज्या कारणासाठी आहे, त्यात तू नक्कीच बसणार नाहीस. आमची निवड चुकली; पण याचं रूपांतर वेगळ्या शिष्यवॄत्तीत होईल. शाळेतील सर्वात अष्टपैलू बुद्धिमान मुलगा म्हणून, हे पारितोषीक तरी........."
" सर, एवढ्यात नाही. त्याला वर्ष जाउ द्या. मी लिंकनचं, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचलं, हेलन केलरचं महात्मा फुले यांचे चरित्र वाचलं.सर, हे वाचलं की कळतं की ही माणसे केवढे कष्ट करून मोठी झाली. माझ्यासारख्या मुलांना प्रोत्साहन द्या, योग्य वयात ते परखड मार्गदर्शन करा; पण सर, नको त्या वयात असा पैसा पुरवत गेलात तर घडायचं राहूनच जाईल. जे काय करतोय ते पैशासाठी असे हॊऊन जाईल... सर.....प्लीज.....!"
वाचनानं, स्पर्धांतल्या सहभागानं , कलेच्या स्पर्शानं, कष्टानं....... त्याच्या वाणीला प्रगल्भतेची खोली होती, संस्कारामुळे नम्रतेची झालर होती. आता मला माझ्या समोरचा मयूर जाधव स्पष्ट दिसतही नव्हता. त्याच्याबद्दलच्या कौतुकाचे अश्रू माझ्या डोळ्यात दाटले होते.
शाळेतला सर्वात श्रीमंत मुलगा माझ्यासमोर उभा होता. परिस्थिती पचवून, परीश्रमाने स्वत:वर पैलू पाडणारा ! श्रीमंत!
December 29, 2017

"शर्यत अजून संपलेली नाही , कारण मी अजून जिंकलो नाही "

हॉंकॉंगमध्ये एका बँकेवर दारोडा पडला.
‘सगळ्यांनी मुकाट्याने जमिनीवर आडवे पडून
रहा. लक्षात ठेवा पैसा सरकारचा आहे पण जीव
तुमचा आहे.’ दरोडेखारांनी ओरडून सांगताच
सर्वजण मुकाट्याने जमिनीवर आडवे झाले.
याला म्हणतात ‘माईंड चेन्जिंग कन्सेप्ट’ (Mind
Changing Concept) म्हणजेच माणसांच्या
सर्वसाधारण विचारांमधे बदल घडवण्याची किमया.
त्यातील एक महिला ‘सेक्सी’ पद्धतीने आडवी
पडली होती. एक दरोडेखोर तिला ओरडून
म्हणाला, ‘मॅडम! जरा सभ्यपणे वागा. हा
दरोडा आहे, बलात्कार नाही.’
याला म्हणतात व्यावसायीक रहाणे (Being
professional). आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करा.
दरोडा टाकल्यावर दरोडेखोर लूट घेऊन घरी
आले. त्यातला ज्युनिअर दरोडेखोर, जो
एम.बी.ए. होता तो 6 वी पर्यंत शिकलेल्या
सिनियर दरोडेखोराला म्हणाला., ‘चला
आता आपण पैसे मोजायला लागुया!’ त्यावर
सिनिअर दरोडेखोर म्हणाला, ‘वेडा आहेस की
काय? हे पैसे मोजायला कित्येक तास
लागतील. जरा दम धर. रात्री टी. व्ही.
वरच्या बातम्या बघ. तुला आपोआपच कळेल की
आपण किती लाखांचा दरोडा घातला आहे ते.’
याला अनुभव म्हणजेच
‘एक्सपिरिअन्स’ (Experience) असे म्हणतात.
हल्ली कागदी डिगर्यां पेक्षा अनुभव जास्त
महत्वाचा झाला आहे.
दरोडेखोर बँकेतून निघून गेल्यावर बँक मॅनेजर
सुपरवायझरला म्हणाला, ‘ताबडतोब
पोलिसांना फोन कर!’ सुपरवायझर म्हणाला ,
‘थोडे थांबा साहेब! आपण आधीच बँकेच्या 70
लाख डॉलर्सवर डल्ला मारला आहे. त्यात अजून
10 लाख डॉलर्सची भर घालूया व मग
पोलिसांना बोलवूया!’
याला म्हणतात ‘लाटेबरोबर पोहणे’(Swim with the tide). म्हणजेच संकटाचे रुपांतर संधीत करून
स्वतःचा स्वार्थ साधून घेणे.
सुपरवायझर म्हणाला, ‘जर दर महिन्यात असा
दरोडा पडला तर कार मजा येईल!’
याला म्हणतात ‘प्रॉयॉरिटी
बदलणे’ (Changing priority). कारण ‘पर्सनल
हॅपिनेस’ हा तुमच्या ‘जॉब’ पेक्षा जास्त
महत्वाचा असतो.
दुसर्याह दिवशी टी. व्ही. वर बातमी झळकली
की बँकेवर 100 लाख डॉलर्सचा दरोडा पडला.
पण ही बातमी ऐकून दरोडेखोर मात्र हैराण
झाले. कारण त्यांनी आणलेली कॅश परत परत
मोजली. पण ती फक्त 20 लाख डॉलर्सच
निघाली. मग 80 लाख डॉलर्स कुठे गेले? खरी मेख
काय आहे ते सिनियर दरोडेखोराच्या बरोबर
लक्षात आहे. तो वैतागून म्हणाला, ‘आपण
जिवावर उदार होऊन दरोडा टाकला पण
आपल्याला फक्त 20 लाख डॉलर्सच मिळाले. पण
त्या बँक मॅनेजरने मात्र काहिही न करता 80
लाख डॉलर्स लाटले. खरे आहे माणसाने शिकले
पाहीजे. नुसतेच दरोडेखोर न होता ‘सुशिक्षीत
दरोडेखोर’ व्हायला पाहीजे.’
याला म्हणतात ‘ज्ञान’ म्हणजेच
‘नॉलेज’ (Knowledge) ज्याची किंमत
सोन्यापेक्षाही जास्त असते. तुमचे सोने नाणे
लोक पळवून नेऊ शकतात पण तुमचे ‘नॉलेज’ कुणीच
पळवून नेऊ शकत नाही.
December 29, 2017

आयुष्याच्या डायरीतून काही टिप्स

* आपणास नक्की काय करायचे आहे हे ठरवा .
त्या नुसार काही तरी Plan करा . नुसते काही तरी करायचे
म्हणून काही करु नका . नेहमी लक्षात असू द्या
Failing to plan is planning to fail.
* यशस्वी होण्यासाठी फार काही वेगळे करायची गरज नसते
जे काही करता त्यात मात्र वेगळेपणा जपा .
* Adjustment आणि तडजोड हे शब्द नेहमी वापरात आणा.
अट्टाहासापायी अडून बसण्यापेक्षा हळूहळू करत पुढे गेलेले
केव्हाही चांगले
* वेळेचे भान ठेवा . केव्हा कुठे आणि कीती वेळ द्यायचा
याचे नियोजन करा . वेळ वाया घालवायपेक्षा
सत्कारणी लावा
* एक चूक एकदाचं . चुकायला घाबरु नका .चुकतो तोच शिकतो .
चूकले म्हणून हळहळत बसू नका . चूक लक्षात आली की लगेचं सुधारा
* बदल पहायचा आहे मग स्वतःत आधी त्यानुसार बदल करा मग दुसर्याला बदलायला .
* जे काही कराल ते आनंदाने करा त्याची मजा घेत ती गोष्ट करा.
त्याला अनूभवा . ह्या मुळे कामाचा कंटाळा नाही येत व निम्मे अडचणी
आधीचं गायब होतात....
* कसलीही सुरुवात करताना आधी माहीती त्या बद्दल मिळवा ,
मग कामाला लागा . प्रामाणिकपणे मेहनत करा .
योग्य वेळी output नक्कीचं मिळते
मेहनत कधीचं वाया नाही जात .......
* नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका .
असे करुन स्वतःची किंमत कमी होते . एक नेहमी लक्षात असू द्या
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत......
* प्रत्येकास सारे जग बदलायचे आहे थोडे स्वतःच्या
दॄष्टीकोनात आणि स्वतःत थोडा बदल करुन पहा जग बरेचं बदललेले दिसेल....
* आज जो विचार कराल ते लगेचं नाही होणार . पण उद्या काय होणार आहे
हे आज केलेल्या विचारवर अवलंबून आहे . Think Big Do Big ...
* कसलीही सुरुवात करताना नकारात्मक विचार करु नका
सुरुवात नकारात्मक केली तर अर्धी लढाई आपण सुरुवात न करताचं हरतो
* अशक्य हे शक्य असते फक्त त्या कडे कसे पहातो तसे ते दिसते
* जीवनात नेहमी काही तरी अपूर्णचं असते म्हणून परिपूर्ण असयचा प्रयत्न करा
* नेहमी आनंदी असा जीवनाची मजा घ्या , हर एक क्षण जगा .
December 29, 2017

जगात काम करताना

तुम्ही कोण आहात ?
तुम्ही कोण आहात ? गाढव 'अ' कि गाढव 'ब' ?

.... हि आहे दोन गाढवांची गोष्ट !
एका धोब्याकडे दोन गाढवं होती. आपण त्यांना गाढव 'अ' आणि गाढव 'ब' असे म्हणू .... गाढव 'अ' अतिउत्साहि होते. आपण किती काम करतो, किती मेहनती आहोत असा सतत आव आणायचं ! धोब्याने आपल्याकडे सतत लक्ष्य द्यावे, आपल्याच पाठीवर शाबासकीची थाप मारावी म्हणून सतत वेगात चालायचे. जास्तीत जास्त ओझे पाठीवर लादून घ्यायचे. गाढव 'ब' त्या मानाने जरा भोळसटच होते. धोब्याच्या पुढे पुढे करणे त्याला काही जमायचे नाही. तशी गरजहि वाटायची नाही. धोबी आसपास असो नसो ते त्याच्याच वेगात चालायचे. शिस्तीत काम करायचे. हळूहळू या दोन गाढवान मधला फरक धोब्याच्या लक्ष्यात यायला लागला. एक गाढवं वेगाने चालतंय. जास्तीत जास्त ओझे पाठीवर घेतय. दुसरे मात्र त्याच्या तुलनेत मागं पडतंय. धोबी 'अ' गाढवाचं कौतुक करायला लागला . 'ब' गाढवाला मात्र रट्टे बसायला लागले. त्याची सतत 'अ' शी तुलना व्हायला लागली. हि अनाठाई स्पर्धा 'ब' गाढवाला काही कळेना. शेवटी एकदिवस तो 'अ' गाढवाला भेटला. त्याला म्हणाला मित्रा येथे आपण दोघंच आहोत. उगाच कशाला एकमेकांशी स्पर्धा करायची. त्यापेक्ष्या आपण ओझे वाटून घेऊ, उगाच मरमरून धावण्या पेक्ष्या शांतपणे पुढे जाऊ. एकमेकांनाच मागे टाकण्यात कसले आलंय यश?

पण याचा परिणाम उलटाच झाला. 'अ' ला वाटायला लागल, याच्यात काही दम नाही. हा आपल्याला घाबरला. आपण पुढे जातोय म्हणून याच्या पोटात दुखतंय. आता जीरउच याची ! म्हणून 'अ' गाढव जास्त वेगाने चालायला लागले. जास्त ओझे पाठीवर घ्यायचा आटापिटा करायला लागलं. धोबी त्याच्यावर जाम खुश होता. पण 'ब' ची धीमी गती पाहून त्याचा पारा चढायचा. त्याने 'ब' गाढवाला चोपायला सुरवात केली. 'ब' नेही आपला वेग वाढवला. पण त्याची दमछाक होत होती. इकडे 'अ' ला आणखीनच चेव चढला. 'ब' मागे पडतोय. धोबी आपल्याला शाबासकी देतोय या आनंदात ते धावत होते. धावतच होतं. गाढव 'ब' या धावण्यात पुरते खचले आणि एक दिवस कोसळले. 'ब' गाढव मेल.

 'अ' बोजा उचलतोय म्हणून धोबी त्याच्या पाठीवर आता 'ब' च्या वाटेचे ओझेही ठेवायला लागला. आपण कसे थोर, 'ब' कसा पुरता संपला या नादात 'अ' च्या अंगात हत्तीचे बळ संचारले. तो उत्साह पाहून धोब्याच्या त्याच्याकडून अपेक्षाहि प्रचंड वाढल्या. पण हे बळ फार काळ काही टिकल नाही. क्षमतेपेक्षा चौपट ओझे पाठीवर घेउन 'अ' गाढवाच्या पायातले त्राण जायला लागले. प्रयत्न करूनही त्याला आता धोब्याच्या अपेक्षे प्रमाणे काम करणे काही जमेना. धोबी संतापला. कालपर्यंत तुफान काम करणारं गाढव आता मंदावायला लागल्याने धोब्याने त्याला बदडायला सुरवात केली. मात्र जीवापाड प्रयत्न करूनही 'अ' गाढवाला पूर्वीसारखे काम होईना. धोबी जाम वैतागला. संतापला. त्याला मार मारून दमला. शेवटी हे गाढव कामचुकार झालंय असे समजून त्याने 'अ' गाढवाची खाटिकखाण्यात रवानगी केली.
आणि नवीन गाढव विकत घ्यायला बाजारात रवाना झाला.

तात्पर्य :-
१)जगात काम करताना, करियरसाठी जीवाचं रान
करून राब राब राबताना आपल्या सहकार्यांना कमी लेखू नका. ते
त्यांचा कामाचा वाटा उचलत असतात, म्हनुनच तुमच्या वाट्याला तुमच्या
लायकीचे काम येते हे विसरू नका. त्यांना मागे खेचायला जाल तर
तुम्ही खड्यातच पडाल.
२) साहेबाच्या कितीही पुढे पुढे केलंत
तरी शेवटी त्याच्या दृष्टीने
तुम्ही काम काय करता. किती रिझल्ट देता हे
महत्वाचं. सहकार्यांना डिवचण्यासाठी बॉसची ढाल करू नका.
३) तुम्ही 'अ' गाढव आहात का 'ब' गाढव आहात याला बॉसच्या
लेखी काही किमत नाही. त्याचा
लेखी तुम्ही फक्त एक 'गाढव' आहात हे विसरू नका.
४) आणि सगळ्यात महत्वाचे गाढवपणा करत ढोर मेहनत करून अनाठाई कष्ट
करू नका. त्यापेक्ष्या तुमचे काम उत्तम आणि अधिक गुणवत्तेचे कसे होईल, हे बघा.
नेव्हर वर्क हार्ड, वर्क क्लेवरली !
December 29, 2017

नुसते शिवाजी महाराज छातीवर लावून मराठी होत नाही

पोलिसांना एका तरूण मुलाची बुलेट अडवली...
मागच्या नंबर प्लेटवर पोलिसांनी नजर टाकली...!!
एक लेडिज कॉन्सटेबल ती नंबर प्लेट काढण्यासाठी नंबर प्लेट्ला हात लावताच मुलगा गाडीवरुन उतरला आणि म्हणाला,
"नंबर प्लेटला हात लावायच नाही, जो फाईन बसतो तो भरायला तयार आहे"..!!
पोलिस अधिकारी जवळ आला त्यानं सांगितल
५००/- रुपये दंड पडेल...!
मुलाने क्षणात खिशातुन १०००/- रुपयाची कोरीकरकरीत नोट काढली आणि त्या पोलीस
अधिकार्याच्या हातात दिली...
पोलिस अधिकार्याने ५००/- रुपये परत देण्यासाठी खिशाकडे हात नेला...
तेव्हा मुलगा म्हणाला,
"बाकीचे उरलेले ५००/- रुपये पुढच्या वेळेसचा अँडव्हांस दंड म्हणून ठेवा."

असं काय होत त्या नंबर प्लेटवर...?

मित्रांनो,
त्या नंबरप्लेटवर होते
"छत्रपती शिवाजी महाराज"

मुलाने त्या ट्रॉफिक पोलीस आणि लेडि कॉन्सटेबलकडे एक तिरपा कटाक्ष टाकून म्हणाला,
"शिवरायांसाठी कायपण"
अन ऐटीत किक मारली.
घरी गेला...जेवला.. झोपला..
स्वप्नात त्याला साक्षात...
"छत्रपती शिवाजी महाराज" दिसले..

शिवाजी महाराजांनी आपल्या हातातील एक वस्तु त्याला दिली...
तलम व चमचमीत रेशमी कापडातील ती गुंडाळलेली वस्तु पाहुन तो खुश झाला...
त्याला वाटलं महाराजांनी काही भेट वस्तु दिली किंवा आपला पराक्रम पाहुन बक्षीस..! नजराणा दिला.
आनंदाच्या भरात त्याने ती वस्तु तलम कापडातुन बाहेर काढली आणि बघतो तर काय...
त्याच्या गाड़ीची नंबर प्लेट..!

महाराज गरजले..!
"माझ्या राज्यात कायदे मोडणा-यां माझ्याच सरदारांचे मी हात तोडले.. आणि तु माझाच फोटो लावुन कायदा मोडतो..
तंगड़ तोडु का तुझं...?"
सगळ्यांनी माझेच फोटो लावले तर पोलीस गाडी कसे ओळखणार..?
आणि
माझे फोटो लावुन कोणी बँका लुटल्या तर..?
आया बहिणींची छेड काढुन पसार झाले तर...?
तुझा अपघात झाला तर घरच्यांना कसं कळणार...?
लक्षात ठेव अरेरावी..
हुज्जत घालणे ही माझी शिकवण नाही..!
"अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे हिच माझी शिकवण.."
आणि नुसते शिवाजी महाराज छातीवर लावून मराठी होत नाही आधी
कर्तब आणि कर्तव्य करा मग तिच छाती ठोकून सांगा मराठी आहे...
December 29, 2017

विद्वानांशी पंगा नको


मिस्कील स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी काॅलेज, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असतांनाचा किस्सा आहे.
एक 'पिटर' नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तिव्र द्वेष करीत.

एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो पिटर जेवण करीत असतांना विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणी प्रो पिटर चे शेजारी असलेल्या खुर्ची वर बसले.
यामुळे चिडून अस्वस्थ झालेले पिटर बोलले.. "मि. विवेकानंद, एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून जेवण करीत नाहीत."
विवेकानंद यांनी शांतपणे प्रो. पिटर कडे पाहून म्हटले " काळजी करू नका .. प्रोफेसर मी उडून दूर जातो..!"

प्रोफेसर पिटर यांचा जळफळाट झाला. त्यांनी बदला घेण्याचा निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी वर्गात त्यानी विवेकानंद यांना उभे करून प्रश्न विचारला "मि. विवेकानंद, तु रस्त्याने जात असतांना तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या.. एका मध्ये पैसे आहेत आणि एका मध्ये शहाणपणा आहे.. तु कोणती पिशवी घेशील?"
एक क्षणाचाही विचार न करता विवेकानंद उत्तरले "अर्थातच पैसे असलेली पिशवी घेईन..."
प्रो. पिटर विवेकानंदांची टर उडवून हेटाळणीच्या सुरात बोलले "तुझ्या जागी मी असतो तर शहाणपणाची पिशवी घेतली असती.."
विवेकानंद यांनी प्रो पिटर यांना सहमती दर्शवून म्हटले "बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे.."

प्रो पिटर शरमेने आणि संतापाने लाल झाले. त्यांनी विवेकानंद यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
त्यांनी विवेकानंद यांचे उत्तरपत्रीकेवर 'इडियट' असे लिहीले. विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका घेऊन शांतपणे बसून राहीले..
प्रो. पिटर यांनी विचारले "कुणाला काही शंका..??"
विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका दर्शवित सांगीतले "प्रोफेसर .. तुम्ही उत्तरपत्रीकेवर तुमची स्वाक्षरी केली आहे पण मार्कस द्यायला विसरले आहात ..."

😄😄 विद्वानांशी पंगा नको😅😅
December 29, 2017

माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे

नक्की वाचा फक्त १ मिनिट लागेल.

बाजारातुन परत घरी येताना काही खाण्याच मन झाल..
म्हणुन ती मुलगी पाणीपुरीच्या ठेल्यावर थांबली..
एकटी मुलगी पाहुन शेजारीच असलेल्या पान टपरीवरची काही मुले ही त्या ठेल्यापाशी आली..
. त्यांनी त्या मुलीला छेडायला चालु केल..
अश्लिल गाणी आणी संवाद चालु केला..
घाणेरडी नजर त्या मुलीच्या देहावरुन फिरत होती..
बिचारी आगोदर पैसे दिल्याने तिला तेथुन जाता ही येत नव्हते..
आपली ओढणी संभाळत..
"भैया जल्दी दो"..
या पलिकडे ती काहीच बोलत नव्हती..
घाबरलेली तिची नजर फक्त खाली पाहत होती..

. तेवढ्यात तिथे एक तरुण युवक आपल्या बाईक वरुन येऊन तेथे थांबला..
. आधिच मनात कल्लोळ चालु असताना त्यात आजुन एक ती पुर्ण भेदरुन गेली..
. तेवढ्यात तो युवक बोलला..

" आरे अंजली तु इथे कुठे" भावाला एकट्याला सोडुन पाणी पुरी खातीयेस काय?"
. संकटाची संभावणा पाहुन तिथली बाकीचे मुले चालते झाले..
आपल्यावरच संकट टळलेल पाहुन मुलीन मोकळा श्वास घेतला..
. न राहुन तिने त्या युवकाला विचारल..
"माफ करा माझ नाव अंजली नाही पुर्वा आहे"
. तो युवक हसत बोलला "काय फरक पडतो.. तु आहेस तर कुणाची तरी बहिणच ना"?
. आणी तो युवक आपल्या डोक्यावर हेल्मेट चढवुन तेथुन निघुन गेला..
. त्या पाठमोर्या जाणार्या युवकाकडे पाहुन त्या मुलिची मान आभिमानाने उंचावली...
. माझ्या भारताला अशा युवकांची गरज आहे..
उद्याचा भक्कम भारत घडविण्यासाठी..

. ‪#‎Plz_Respect_women‬ .

Thursday, 28 December 2017

December 28, 2017

मराठी माणसाला काय येते?

I👤 मराठी माणसाला काय येते?
👤 मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.
👤 मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
👤 मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.
👤 मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
👤 मराठी माणसाला 🏤स्वराज्य उभं करता येते.
👤 मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते
. 👤 मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
👤 मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
👤 मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
👤 मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
👤 मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
👤 मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
👤 मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
अभिमान बाळगा 'मराठी' असल्याचा.
🚩 🚩 🚩 😎 😎 😎
का 'मी मराठी' ?
- मी 'मराठी' आहे कारण...
- घरी येताना पिझ्झा खाल्ला तरी,
वरण-भात, साजूक तुपाशिवाय माझं पोट भरत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- ख्रिसमस, NEW YEARच्या जरी पार्ट्या मित्रांसोबत केल्या तरी,
घरात 'पाडवा' साजरा करतोच.
- मी 'मराठी' आहे कारण...
- जाम, सॉस कितीही आवडत असले तरी,
चटणी-लोणच्याचे ५-७ प्रकार तरी घरात सापडतील.
- मी 'मराठी' आहे कारण...
- रागाच्या भरात/चेष्टेत मित्रांना कितीही इंग्लिशमध्ये शिव्या दिल्या तरी,
ठेच लागल्यावर 'आई गं' हेच शब्द तोंडात येतात.
- मी 'मराठी' आहे कारण...
- हॉटेलमध्ये पैसे द्यायला जरी मागे रहात असलो तरी,
मित्रास त्रास देणा-याच्या ४-५ थोबाडात लावण्यास कमी पडणार नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- 'छत्रपती शिवाजी महाराज की'
हे ऐकल्यानंतर माझ्या तोंडून आपसूक 'जय' आल्याशिवाय राहत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'HIGH LIVING' असलो तरी,
हात जोडून 'नमस्कार' बोलल्याशिवाय माझी 'ओळख' होत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- कितीही 'BRANDED PERFUMES' वापरले तरी,
'उटण्या'शिवाय माझी 'दिवाळी' साजरी होत नाही.
- मी 'मराठी' आहे कारण...
- गाडीतून जाताना 'मंदिर' दिसलं
कि,
आपोआप 'हात' जोडल्याशिवाय मी राहत नाही.
माझ्यातले 'मराठी'पण जोपासण्याची मला गरज नाही.
ते माझ्या 'रक्तात' भिनलंय.
आणि...
या 'मराठी'पणाचा मला खूप खूप 'गर्वच'' आहे.
🚩जय हिंद ! जय महाराष्ट्र !!!🚩
December 28, 2017

क्रेडिटकार्ड वाल्यांचा फोन

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट
कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि
गणपतराव ला सुध्दा संताप यायचा पण मग आता त्यांनी
ह्याचा आनंद घ्यायचा ठरवले आणी आता तर त्यांची
खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त
करण्यासाठीच येतात.

आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या
सदहेतुने गणपतरावांचे संभाषण येथे देत आहोत.
(ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

फक्त आनंद घ्या लेखनाचा
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो
आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा
बॅंक.
गणपतराव :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये,
आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी
माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही
इंट्रेस्टेड आहात का सर ?
गणपतराव :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
गणपतराव :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात
पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड
आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ
उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर
तुम्हाला कधि वेळ आहे ?
गणपतराव :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती
देण्यासाठी.
गणपतराव :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर
मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला
सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी
आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला
कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण
माहिती देइल.
गणपतराव :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव
मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत
होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
गणपतराव :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप
चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी
असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द
वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला
आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात
ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या
आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
गणपतराव :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली
आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही
हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज
वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
गणपतराव :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला.
पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन
भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक
स्वरात बोलायला लागली आहे.)
गणपतराव :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार
आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत
करे कोई और फल खाये कोई
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर
साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी
माणसे नेमली आहेत.
गणपतराव :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी
आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे
आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत
त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
गणपतराव :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच
म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या
भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
गणपतराव :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे
आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
गणपतराव :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या
सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड
वापरता ?
गणपतराव :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन,
क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण
नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या
वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या
ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड
विषयी बोला.
गणपतराव :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत.
माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही
मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी
करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन
फोन आदळला जातो.)
हे पहा आता
December 28, 2017

काय म्हणाव अश्या मातेला ?

एका शाळकरी मुलाला शाळेतील बाईनी एक चिट्ठी दिली आणि सांगितलं हि चिट्ठी तुझ्या आई ला दे. मुलगा धावत धावत घरी आला आणि ती चिट्ठी आई जवळ दिली. आई ने ती चिट्ठी पहिली मात्र आणि त्या मुलासमोर ती वाचून दाखवली. त्यातील मजकूर असा होता "प्रिय पालक आपला मुलगा खूपच हुशार व बुद्धिमान आहे, त्याची आकलनशक्ती अमाप आहे, परंतु आमच्या शाळेत त्याला शिकवतील असे शिक्षक नाहीत, त्यामुळे या पुढे तुम्ही आपल्या मुलाला शाळेत पाठउ नका, त्याचा अभ्यास तुम्ही घरीच घ्या. "

कालांतराने आई वारली. मुलगा देखील आता मोठा झाला होता, आता सार जग त्याला ओळखत होत. एके दिवशी असाच जुने पेपर्स चाळत असताना त्याला ती चिट्ठी सापडली . तीच जी त्याच्या आईने लहानपणी वाचून दाखवली होती. ती पाहताच तो ढसा ढसा रडायला लागला. त्यातील मजकूर असा होता " प्रिय पालक आपला मुलगा मतीमंद आहे. त्याची आकलनशक्ती फारच कमी आहे, अश्या मुलाला आमची शाळा शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठू नये. त्याचा आभ्यास तुम्ही घरीच घ्यावा" त्याला कळून चुकल त्याच्या आई ने ते पत्र खोट वाचून दाखवील होत.

हा मुलगा म्हणजेच थोर शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन. ज्याने विजेचा शोध लावून अख्ख जग प्रकाशमय करून टाकल. काय म्हणाव अश्या मातेला जीने एका मतीमंद मुलातून एक शास्त्रज्ञ घडविला. ही किमया फक्त आई च करू शकते.