नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Showing posts with label Social. Show all posts
Showing posts with label Social. Show all posts

Saturday, 18 November 2017

November 18, 2017

निवृत्तीवेतन, कौटुंबिक आणि वैवाहिक लाभ

National Social Assistance Program (NSAP)
  •          National Old Age Pension Scheme
  •          National Family Benefit Scheme
  •          National Maternity Benefit Scheme
  •          Purpose
  •          Program Implementation


निवृत्तीवेतन, कौटुंबिक आणि वैवाहिक लाभ

  •         राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एन एस ए पी)
  •         राष्ट्रीय वृद्धावस्‍था निवृत्तीवेतन योजना
  •         राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना
  •         राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना
  •         उद्देश
  •         कार्यक्रमाची अंमलबजावणी

राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एन एस ए पी)

15 ऑगस्ट 1995 रोजी सुरू केलेला राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम (एन एस ए पी) म्हणजे घटनेतील 41 व 42 क्रमांकाच्या कलमांतील दिशानिर्देशक तत्वांच्या पूर्ततेकडील एक महत्वाची पायरी आहे.

गरीब कुटुंबांतील मिळवत्या व्यक्तीचा मृत्यू, वृध्‍दत्‍व, लग्‍नखर्च ह्यांकरीता सामाजिक सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाची ओळख करून देण्‍यात आली आहे. ह्या कार्यक्रमाचे तीन घटक आहेत, ते असे:-

    राष्ट्रीय वृद्धावस्‍था निवृत्तीवेतन योजना (NOAPS)
    राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना (NFBS)
    राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना (NMBS)

राष्ट्रीय वृद्धावस्‍था निवृत्तीवेतन योजना

ह्यामध्ये, खालील नियमांनुसार, केंद्राकडून सहाय्य देण्‍यात येते:

    अर्जदाराचे वय (पुरुष अथवा स्त्री) 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
    अर्जदाराचे स्वत-चे उत्पन्न नसावे किंवा कुटुंबातील सदस्य अथवा इतरांकडून आर्थिक सहाय्य मिळत नसावे.
    वृद्धावस्‍था निवृत्तीवेतनाची रक्कम दरमहा रु.75 आहे ज्यायोगे केंद्राकडून सहाय्य मिळू शकेल.

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना

ह्या योजनेत दरिद्र्यरेषेखालील कुटुंबांना, त्यामधील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, एकवट रक्कम देण्‍यात येते. 
खालील नियमांत बसत असल्यास केंद्राकडून सहाय्य मिळू शकते :

    प्राथमिक मिळवती व्यक्ती (स्त्री अथवा पुरुष) कुटुंबाची सदस्य असली पाहिजे व तिच्या उत्पन्नावर ते घर चालत असले पाहिजे.
    अशी मुख्य मिळवती व्यक्ती वयाने 18 ते 65 च्‍या दरम्यान असावी.
    भारत सरकारच्या नियमांनुसार असे कुटुंब दरिद्र्यरेषेखालील असावे.
    अशा मुख्य मिळवत्‍या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण काही ही असो, रु.10,000 चे सहाय्य देण्‍यात येते.
    अशा मुख्य कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर कुटुंबाचे कर्तेपद सांभाळणार्‍या व्यक्तीस, योग्य स्थानिक चौकशीनंतर, हे सहाय्य देण्‍यात येईल.

राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना

ह्या योजनेचा लाभ, एकवट रकमेच्या रूपाने, दरिद्र्यरेषेखालील कुटुंबातील गर्भवतींना खालील नियमांनुसार दिला जातो -

    गर्भवतीचे वय 19 वर्षे किंवा त्‍यापेक्षा जास्त असावे. पहिल्या दोन मुलांपर्यंतच हा लाभ मिळू शकेल. अर्भक जन्मतः मृत असल्यास हा लाभ मिळणार नाही.
    भारत सरकारच्या नियमांनुसार संबंधित गर्भवती दरिद्र्यरेषेखालील असावी.
    रु.500चे सहाय्य देण्‍यात येईल.
    प्रत्यक्ष बाळंतपणाच्या 12-8 आठवडे आधी हे सहाय्य देण्‍यात येईल.
    हे सहाय्य वेळेवर खात्रीशीर देण्‍यात येईल सरकारकडून उशीर झाल्यास बाळाच्या जन्मानंतर देखील लाभप्राप्‍तीकर्त्‍यांस हे मिळू शकेल.

उद्देश

    NSAP हा 100% केंद्र सरकारतर्फे पुरस्कृत कार्यक्रम आहे व सामाजिक सहाय्याचे किमान राष्ट्रीय मापदंड ठरवून देणे हा ह्याचा उद्देश आहे. हा लाभ राज्ये/केंद्रशासित प्रदेश सध्या देत असलेल्या व यापुढे देणार असलेल्या लाभांव्यतिरिक्त आहे.
    देशभरातील सर्व गरजूंना सामाजिक सुरक्षिततेचा समान लाभ होण्यात काही अडचणी येऊ नयेत ह्याच उद्देशाने केंद्र सरकारने हा कार्यक्रम 100% स्वतःकडे ठेवला आहे.
    अर्थात ह्याचा अर्थ असा नाही की राज्यांनी स्वतःच्या सामाजिक सुरक्षितता योजना राबवू नयेत. राज्ये/केंद्रशासित प्रदेश हे काम स्वतंत्रपणे करू शकतातच.
    गरिबी हटविण्याच्या व मूलभूत गरजा पुरविण्याच्या विविध योजनांची सांगड घालण्याची संधी NSAP द्वारा मिळू शकते. उदाहरणार्थ मातृत्व-सहाय्य बालकांसाठीच्या इतर कार्यक्रमांशी जोडता येईल.

कार्यक्रमाची अंमलबजावणी

    NSAP अंतर्गत असलेल्‍या योजना राज्ये/केंद्रशासित प्रदेश सरकार पंचायत व पालिकांमार्फत राबवू शकतात.
    NSAP च्या दिशानिर्देशक तत्वांनुसार NSAP ची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक राज्य/केंद्रशासित प्रदेशाने एक नोडल विभाग निश्चित केला आहे.
    नोडल विभागाच्या सचिवांनी संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशासाठी NSAP चे नोडल सचिव म्हणून काम करावयाचे आहे.
    जिल्‍ह्यांमध्‍ये, NSAP चे काम करण्यासाठी जिल्‍हा पातळी समिती आहेत.
    राज्य/केंद्रशासित प्रदेशांनी जिल्हापातळीवरील न्यायाधीश अथवा जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली काम करणार्‍या कार्यान्‍वयन प्राधिकार्‍यांना, आपल्या क्षेत्रात NSAP च्या योजना राबवण्यासाठी अधिसूचित केले आहे.
    जिल्हाधिकारी अथवा जबाबदार नोडल अधिकारी हा लाभार्थींच्या अर्जांवर प्रक्रिया करणे व मंजूर प्रकरणांमध्ये रक्कम अदा करणे ह्यासारख्या कामांना जबाबदार राहील.
    दिशानिर्देशक तत्वांमध्ये सांगितल्यानुसार वितरण प्राधिकारी रक्कम अदा करण्यासाठी विविध मार्ग अवलंबू शकतात (उदा. रोख रक्कम देणे)
    ग्रामपंचायत व पालिकांनी NSAP च्या ह्या तीन योजनांसाठी लाभार्थी निश्चित करण्याच्या कामात सक्रिय राहावे अशी अपेक्षा आहे.
    अशा रीतीने, राज्य सरकारे ग्रामपंचायत व पालिकांना NOAPS, NFBS आणि NMBS साठी लक्ष्य ठरवून देऊ शकतात ज्यायोगे  लाभार्थी निश्चित करण्याचे काम मोहल्ला कमिटीद्वारे देखील केले जाऊ शकते.
    NOAPS, NFBS आणि NMBS साठीचे केंद्राचे सहाय्यदेखील ग्रामीण भागातील ग्रामसभेत अथवा शहरी क्षेत्रातील मोहल्ला कमिटीमध्ये वितरित करण्‍यात येवू शकते.
    NSAP संबंधीची माहिती लोकांना देण्याची व त्यांचे लाभ त्यांना मिळवून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायती व पालिकांची आहे. ह्या कामी, स्वयंसेवी संस्थांची मदत व सहकार्य देखील घेता येईल.

 
November 18, 2017

भारतातील रोजगार निर्मिती

Employment Generation in India
  •         Workers in the unorganized sector of India
  •         Employment Generation - Government initiatives taken
  •             National Rural Employment Guarantee Act (NREGA)
  •             Khadi and Village Industries Commission (KVIC)
  •             National Commission for the Unorganized Sector (NCEUS) Establishment
  •             Technology modernization grant scheme and technology for cotton technology
  •             National Jute Board (National Trade Corporation):

 रोजगार
  •         भारतातील रोजगार निर्मिती
  •         भारतामधील असंघटित क्षेत्रातील कामगार
  •         रोजगार निर्मिती - सरकारने घेतलेला पुढाकार
  •             राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA)
  •             खादी व ग्रामोद्योग कमिशन (KVIC)
  •             असंघटित क्षेत्रातील उद्योगांसाठी राष्ट्रीय आयोगाची (NCEUS) स्थापना
  •             तंत्रज्ञान आधुनिकीकरण अनुदान योजना आणि कापसावरील तंत्रज्ञानाचे अभियान
  •             नॅशनल ज्यूट बोर्ड (राष्‍ट्रीय ताग महामंडळ):

भारतातील रोजगार निर्मिती

गरिबी-प्रतिरोधक धोरणान्‍वये गरिबी दूर करण्‍यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी विविध कार्यक्रम आपल्याकडे अनेक वर्षे राबविण्‍यात येत आहेत आणि अधिकाधिक रोजगार निर्माण करण्यासाठी, उत्पादक मालमत्ता तयार करण्यासाठी, तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्ये वाढवण्यासाठी व गरिबांच्‍या उत्पन्नाची पातळी वर नेण्यासाठी ते जास्त सक्षम देखील करण्‍यात आले आहेत. ह्या योजनांमधून नोकरी आणि स्‍व-रोजगार असे दोन्ही पर्याय दारिद्र्यरेषेखालील लोकांना देण्‍यात येतात. 1998-99 पासून हे विविध कार्यक्रम दोन मुख्य वर्गांनुसार एकत्र करण्‍यात आले आहेत -

    स्‍व-रोजगार योजना आणि
    नोकरीविषयक योजना

योजनांचा प्रभाव वाढवण्यासाठी रकमेचे वाटप आणि संघटनात्मक मुद्दे अधिक व्यावहारिक करण्‍यात आले आहेत. अशा कार्यक्रमांचा मुख्य उद्देश गरिबी हटवणे हा असल्याने ह्यांतून फारसा कायम स्वरूपी रोजगार निर्माण होत नाही.

भारतामधील असंघटित क्षेत्रातील कामगार

असंघटित क्षेत्रातील कामगार’ म्हणजे रोजंदारीवर, थेट किंवा दलालामार्फत, स्वतः कंत्राट घेऊन किंवा स्व-रोजगार पद्धतीने, स्वतःच्या घरातून किंवा इतर कोणत्या ही ठिकाणावरून काम करणारी परंतु ESIC कायद्याचे व भविष्यनिर्वाह निधि कायद्याचे तसेच सरकारी अथवा खाजगी विमा आणि निवृत्ति-वेतनाचे फायदे किंवा प्राधिकार्‍यांनी वेळोवेळी निश्चित केलेले अन्य फायदे न मिळणारी व्यक्ती

रोजगार निर्मिती - सरकारने घेतलेला पुढाकार
राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा (NREGA)

ह्यामध्ये ग्रामीण भागातील गरिबांना 100 दिवसांपर्यंत काम मिळू शकते. अशा प्रकारचे मोजमाप असलेली सामाजिक सुरक्षितता जगातील कोणत्या ही देशात नाही. ह्या कायद्याची व्याप्ती सुरुवातीला 200 ग्रामीण जिल्ह्यांपुरतीच मर्यादित होती, त्‍यात वाढ होवून सर्व म्हणजे 614 ग्रामीण जिल्हे समाविष्ट झाले आहेत (एप्रिल 2008).

खादी व ग्रामोद्योग कमिशन (KVIC)

ची पुनर्रचना करून लहान आणि ग्रामीण उद्योगांद्वारे रोजगार निर्मितीवर भर देण्‍यात आला आहे.
असंघटित क्षेत्रातील उद्योगांसाठी राष्ट्रीय आयोगाची (NCEUS) स्थापना

सल्लागार समितीच्या स्‍वरूपात करण्यात आली आहे तसेच ह्या क्षेत्रातील घडामोडींवर लक्ष ठेवणे, ह्या उद्योगांची उत्पादन क्षमता वाढवून कायम स्वरूपी रोजगाराची निर्मिती, विशेषतः ग्रामीण भागात, करण्याचा प्रयत्न करणे ही कामे देखील ह्या आयोगाकडे आहेत. संयुक्त प्रगतीशील शासनाने आपल्या राष्ट्रीय सामाईक किमान कार्यक्रमात दिलेल्या वचनानुसार हे करण्‍यात येत आहे. बदलत्या जागतिक समीकरणांमध्ये हे क्षेत्र टिकून राहावे आणि ह्याची सांगड पतपुरवठा, कच्चा माल, संसाधने, अद्ययावत तंत्रज्ञान आणि विक्री अशांसारख्या क्षेत्रांमध्ये संघटित उद्योगांशी घातली जावी असा उद्देश आहे. ह्या क्षेत्रातील एकंदर कौशल्याचा विकास करण्‍यासाठी काही पावले उचलण्याचा ही विचार आयोग करीत आहे.

तंत्रज्ञान आधुनिकीकरण अनुदान योजना आणि कापसावरील तंत्रज्ञानाचे अभियान

करमुक्तीसकट असलेले एक महत्‍वपूर्ण पॅकेज देण्‍यात आले आहे. वाढीस चालना देण्यासाठी आणि देशांतर्गत मूल्यवर्धनासाठी शुल्क आणि अधिभारांची पुनर्रचना करण्‍यात आली आहे. तंत्रज्ञान आधुनिकीकरण अनुदान योजना आणि कापसावरील तंत्रज्ञानाचे मिशन लागू करण्याचा विचार अशा योजनांची व्याप्ती आणि तरतुदी संबंधित उद्योगांना आधुनिक बनवण्यासाठी आणि त्यांना वाजवी दरात कच्चा माल मिळवून देण्यासाठी ह्यांतील खर्च आणि संधींमध्‍ये वाढ करण्‍यात आली आहे. पतपुरवठ्याशी निगडित 10 टक्क्यांव्‍यतिरिक्त पायाभूत अनुदान असल्यामुळे तंत्रज्ञान आधुनिकीकरण अनुदान योजनेतील गुंतवणूक वाढून ती रु. 1300 कोटींवरून (2003-04) सुमारे 20,000 कोटी रूपयांपर्यंत गेली आहे (2006-07). संसाधने मजबूत करण्यासाठी 40 एकत्रित टेक्स्टाइल पार्क्स उभारण्याची योजना आहे. 11 व्या पंचवार्षिक योजनेमध्ये कापडउद्योगासाठी तंत्रज्ञान पुरवण्याचा प्रकल्प राबविण्‍यात येईल.

नॅशनल ज्यूट बोर्ड (राष्‍ट्रीय ताग महामंडळ):

कच्च्या तागाची आधारभूत किंमत रू. 890 (2004-05 ) दर क्विंटल वरून वाढवून  2008-09 मध्ये रू. 1250 पर्यंत नेण्यात आली आहे. मागणी निश्चित करण्यासाठी साखर आणि धान्यांचे पॅकिंग तागामध्येच करण्याचे निश्चित करण्‍यात आले आहे. तागासंबंधीचे सर्वसमावेशक राष्ट्रीय धोरण प्रथमच ठरविण्‍यात आले असून तागाची मागणी वाढवणे व ताग-उद्योगास संरक्षण पुरवणे हे त्यामागचे उद्देश आहेत. ज्यूट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्‍या पुनर्रचनेचे कार्य सुरू करण्‍यात आले आहे. ताग क्षेत्राच्या सर्वां‍गीण विकासाकरीता ज्‍यूट टेक्‍नोलॉजी मिशनची सुरूवात करण्‍यात आली आहे. ह्या क्षेत्रात काम करणार्‍या विविध संस्थांच्या विविध गतिविधिंच्‍या समन्वयासाठी राष्ट्रीय ताग बोर्डाची स्थापना करण्‍यात आली आहे.

Saturday, 4 November 2017

November 04, 2017

सामाजिक कराराची उत्पत्ती, कराराचा सिद्घांत, स्वरुप आणि कार्य

सामाजिक कराराचा सिद्घांत

राजकीय तत्त्वज्ञानात राज्यकर्ते व प्रजा या दोहोंत कर्तव्ये आणि अधिकार यांसंबधी प्रत्यक्ष किंवा आनुमानिक झालेला करार. प्राचीन काळी मानव हा बेबंद अशा नैसर्गिक अवस्थेत वावरत होता. तो तत्कालीन परिस्थित्यनुसार सुखी वा दुःखी असेल. प्राथमिक समूह अवस्थेतील अशा रानटी परिस्थितीतून मुक्त होण्यासाठी त्यावेळी कोणताही निश्चित मार्ग दृष्टीपथात नव्हता. आक्र मण, भीती, अविश्वास आणि अखेर बळी तो कान पिळी अशी अवस्था निर्माण झाली होती. या बि कट अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी माणसाने आपापसांत सामाजिक हितासाठी करार केला व त्यातूनच सामाजिक कराराचा सिद्घांत ही संकल्पना अस्तित्वात येऊन राज्यसंस्था या यंत्रणेची निर्मिती झाली.

पाश्चिमात्य संस्कृतीच्या वैचारिक इतिहासात आणि ⇨ॲरिस्टॉटल (इ. स.पू. ३८४–३२२) आणि ⇨प्लेटो (इ. स.पू. ४२८–सु.३४८) यांच्या काळापासून सामाजिक कराराची उत्पत्ती, स्वरुप आणि कार्य यांविषयीचे विश्लेषण आणि चर्चा सुरु होती. त्यांनी राज्यसंस्थेच्या उत्पत्तीचे मूळ मनुष्याच्या सहकारी भावनेत असल्याचे मत प्रतिपादन केले आहे. ⇨एपिक्यूरस ( इ. स. पू. ३४१–२७०) आणि ⇨सिसरो ( इ. स. पू. १०६–४३) यांच्या लेखनातही सामाजिक कराराच्या विचाराची बीजे आढळतात; पण या कराराच्या संकल्पनेला अधिक सुसंगत आणि सुसूत्र स्वरुप सोळाव्या ते अठराव्या शतकांत टॉमस हॉब्ज, जॉन लॉक व झां झाक रुसो या विचारवंत तत्त्ववेत्त्यांनी दिले आणि आपल्या स्वतःच्या दृष्टीकोनातून या सिद्घांताचे परिशीलन करुन आपापले स्वतंत्र विवेचन मांडले. त्यामुळे या संकल्पनेला सैद्घांतिक व तात्त्विक बैठक प्राप्त झाली. या तत्त्ववेत्त्यांनी नागरी धुरीण समाजाला (लर्नेड सिव्हिल सोसायटी) मिळणाऱ्या सुविधा, फायदे आणि प्राथमिक नैसर्गिक अवस्थेत ( अ स्टेट ऑफ नेचर ) असलेल्या लोकांचे तोटे, अहितकारक गोष्टी यांची तुलना करुन राज्यसंस्था अस्तित्वात नसेल, तर काय घडते याचे आनुमानिक (हायपॉथेटिकल) चित्र संघटित राज्यसंस्थेचे मूल्य आणि उद्दिष्टे विशद करुन सिद्घ करण्याचा प्रयत्न केला आहे.

टॉमस हॉब्ज (१५८८–१६७९) याने रानटी दुःसह्य अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी मनुष्याने आपापसांत करार केला आणि त्यातून सार्वभौम सत्तेची उत्पत्ती झाली, असे सामाजिक कराराचे विवेचन लेव्हायथन या ग्रंथात केले आहे. हॉब्जच्या वेळी इंग्लंडमध्ये यादवी युद्घजन्य परिस्थिती होती. ती टाळण्यासाठी आणि सामाजिक स्थैर्य निर्माण करण्यासाठी हा सामाजिक कराराचा विचार त्याने मांडला. त्याच्या विचाराचे मुख्य सूत्र सार्वभौम सत्तास्थान असावे आणि समाजाने आज्ञापालन हे कर्तव्य मानावे, असे होते. त्याच्या मते अशी सार्वभौम सत्ता निरंकुश आणि अविभाज्य असते. अशा सार्वभौम सत्तेची इच्छा म्हणजेच देशाचा कायदा. त्याला कोणत्याही परिस्थितीत विरोध करणे अवैध होय. हॉब्जच्या या सामाजिक कराराविषयीच्या तत्त्वज्ञानाने इंग्लंडमधील राजेशाही सत्तेला भक्कम स्थान मिळवून दिले.

जॉन लॉक (१६३२–१७०४) याने हॉब्जनंतर हा विचार अधिक व्यापक व शास्त्रशुद्घ पद्घतीने टू ट्रीटिझिस ऑफ गर्व्हन्मेन्ट या ग्रंथातील दुसऱ्या प्रबंधात मांडला. या गंथात तो म्हणतो की, ‘मानवाची पहिली अवस्था नैसर्गिक अवस्था (अ स्टेट ऑफ नेचर) होती. त्या अवस्थेत सर्व मनुष्ये स्वतंत्र होती आणि सर्वांचे हक्कही समान होते. प्रत्येक व्यक्तीस आपले व्यवहार मनसोक्त करण्याचे स्वातंत्र्य होते आणि त्याच्यावर हुकमत गाजविणारी कोणतीही श्रेष्ठ सत्ता नव्हती. त्यामुळे व्यक्तीच्या स्वातंत्र्याला मर्यादा होती, ती फक्त नैसर्गिक कायद्याची’. हॉब्ज नैसर्गिक कायदा व मानवी प्रज्ञा (रीझन) ही एकच आहेत, असे मानतो. हा कायदा म्हणजे आपण आपले व आपल्या बांधवांच्या जीविताचे रक्षण करावे आणि कोणीही इतरांचे स्वातंत्र्य आणि मत्ता हिरावून घेण्याचा प्रयत्न करु नये; परंतु या व्यवस्थेत एखाद्याने गैरवर्तन केल्यास त्याचा बंदोबस्त करणारी कोणी अधिकारी व्यक्ती ह्या व्यवस्थेत शक्य नव्हती. यातून मार्ग काढण्याकरिता माणसांनी आपले नैसर्गिक अवस्थेतील काही हक्क सोडण्याचे ठरविले आणि सर्वांनी मिळून एक सामाजिक करार करुन एक समष्टी निर्माण केली. या करारान्वये सर्व मनुष्यमात्रांची जीवने, स्वातंत्र्य आणि मत्ता यांचे रक्षण केले जावे, असे ठरले. मनुष्याची ही मूळ नैसर्गिक अव अवस्था आणि सामाजिक करार या दोन्ही गोष्टी इतिहासात घडल्याचे लॉक मानतो.

झां झाक रुसो (१७१२–७८) या फ्रेंच तत्त्वज्ञ-विचारवंताने सामाजिक कराराचा पुरस्कार सोशल कॉन्ट्रॅक्ट (१७६२) या पुस्तकात केला असून हॉब्ज आणि लॉक यांच्या सामाजिक कराराविषयीच्या, विशेषतः नैसर्गिक अवस्था आणि धुरीण समाज या संकल्पनांविषयी मतभिन्नता व्यक्त केली आहे. त्याच्या मते नैसर्गिक अवस्था ही प्रक्रिया शांततामय व ऐच्छिक आहे. त्याने लोकांच्या क्रांतीचे तत्त्वज्ञान प्रतिपादिले असून जुलमी शासनसंस्थेविरुद्घ क्रांती करण्याचा जनतेला संपूर्ण अधिकार आहे, हा विचार मांडला. तो फ्रेंच राज्यक्रांतीला प्रेरणादायी ठरला. राज्यसंस्था हा एक करार आहे, ही कल्पना त्याने मांडली. नैसर्गिक जीवन तो आदर्श मानतो. माणसे स्वाभाविक प्रवृत्तीनुसार जीवनावश्यक गोष्टी मिळवून एकमेकांना मदत करीत होती, तेव्हा कोणत्याही संस्थेची, संघटनेची, राज्यसंस्थेची, दंडशक्तीची आवश्यकता वाटत नव्हती; पण जेव्हा माणसामाणसांतील संबंध गुंतागुं तीचे झाले आणि त्याला संघर्षात्मक स्वरुप प्राप्त होऊ लागले, तेव्हा नव्या समाजाच्या स्थैर्यासाठी-समाजव्यवस्थेसाठी रुसोला राज्यसंस्था अपरिहार्य वाटली. त्यासाठी त्याने सामाजिक कराराचा सिद्घांत प्रतिपादिला आणि समान इच्छा (जनरल विल) या आपल्या संकल्पनेवर उभा केला. मोठा समाज एकत्र नांदत असला की, सर्वांच्या हितासाठी सर्वांची मिळून एक,सर्वांना समान अशी सार्वत्रिक इच्छा निर्माण होते. तीच समान इच्छा वा ईहा होय. ती स्वतंत्र, सर्वांमध्ये सारखीच वसत असलेली पण अमूर्त अशी एक प्रेरणा असते. त्या इच्छेला प्रत्येक व्यक्ती समूहनियंत्रणासाठी सर्व प्रकारचे अधिकार आपण होऊन प्रदान करते आणि तीत त्या व्यक्तीचीही इच्छा समाविष्ट असते. थोडक्यात रुसोच्या मते प्रत्येक व्यक्ती स्वतःचे स्वतःलाच सर्वाधिकार सुपूर्द करीत असते. राज्यसंस्था ही त्या इच्छेने उभी केलेली यंत्रणा असून ती बदलणे, मोडणे इ. सर्व अधिकार त्या समान इच्छेला असल्याचे रुसो मानतो. यामुळे राजकीय विचारांच्या संदर्भात सामाजिक करार हा त्याचा सिद्घांत इंग्रजी विचारवंतांचा आर्थिक उदारमतवाद आणि फेंच तत्त्वज्ञ ⇨माँतेस्क्यू (१६८९–१७५५) याची प्रत्यक्षार्थवादी अभिवृत्ती या दोहोंच्या पलीकडे जातो.

हॉब्जच्या मांडणीप्रमाणे राजसत्तेला अनियंत्रित अधिकार मिळत होते; तर लॉकच्या विचारप्रणालीत राज्यसत्तेवर काही अल्पस्वल्प बंधने येत होती; मात्र रुसोच्या सामाजिक करारात जनतेचे सार्वभौमत्व आणि समतेचा सिद्घांत ही दोन मूलगामी तत्त्वे असल्यामुळे सरंजामशाही संपुष्टात येऊन आधुनिक लोकशाहीची बीजे रोवली गेली. परिणामतः फ्रेंच राज्यक्रांतीनंतर प्रस्थापित राजेशाही/सत्तांना रुसोच्या सामाजिक कराराने धक्का दिला. विसाव्या शतकात जॉन रॉल्स (१९२१– ) याने सामाजिक कराराच्या सूत्रीकरणात काही बाबतीत रुसोचे अनुकरण केले आहे. त्याच्या मते सुयोग्य अशी समाजव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी पूर्वग्रह, स्वार्थ, हेवेदावे यांपासून अलिप्त असलेल्या बुद्घिनिष्ठ व्यक्तींची निकड आहे. आपला सामाजिक दर्जा, प्रतिष्ठा काय आहे, हे विसरुन लोकांनी अज्ञानाच्या पडद्याआड जाऊन आपली समान मूलभूत अवस्था (ओरिजिनल् पोझिशन) ध्यानी घ्यावी. या अवस्थेमुळे न्याय व सुव्यवस्था नांदेल; कारण बुद्घिनिष्ठ सूज्ञ व्यक्ती समान व निःपक्षपाती कायद्याविषयी आदर दर्शवितात. रॉल्सला अभिप्रेत असलेली मूलभूत अवस्था ही संज्ञा नैसर्गिक अवस्थेला चपखल लागू पडते;तथापि अजूनही वास्तवात धुरीण समाज आणि हितचिंतक मध्यस्थ आपणच सर्वांचे कल्याण करु शकतो या भ्र मात असतात.

विसाव्या शतकात उपयुक्ततावादी विचारसरणीमुळे विशेषतः ⇨जेरेमी बेंथॅम (१७४८–१८३२), ⇨ जॉन स्ट्यू अर्ट मिल(१८०६–७३) यांच्या लेखनामुळे सामाजिक कराराची सैद्घांतिक विचारसरणी मागे पडली; तरीसुद्घा सार्वभौम सत्ता,प्रातिनिधिक राज्यसंस्था आणि जुलमी सत्तेविरुद्घ क्रांती करण्याचा लोकांचा अधिकार यांसारखी राजकीय मूल्ये सामाजिक कराराच्या सिद्घांतातून प्रसृत झाली, हे निर्विवाद होय. या कराराने अमेरिकन-फ्रेच राज्यकर्त्यांत लोकशाही मूल्ये रुजविली. त्यामुळे त्यांच्या संविधानात व विधिसंहितांत समानतेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले.

November 04, 2017

सामाजिक मानसशास्त्राची बीजे

( सोशल सायकॉलॉजी ). सामाजिक–सांस्कृतिक संदर्भांत मानवी वर्तनाचा शास्त्रशुद्घ अभ्यास करणारी मानसशास्त्राची एक शाखा वा उपक्षेत्र. सामाजिक मानसशास्त्राची बीजे प्राचीन तत्त्ववेत्त्यांच्या लेखनातूनही आढळतात. ⇨प्लेटो आणि ⇨ ॲरिस्टॉटल ह्या तत्त्वज्ञांनी सामाजिक जीवनातील प्रश्नांचा विचार केला होता. त्यानंतर ⇨झां बॉदँ, ⇨टॉमस हॉब्ज, ⇨ जॉन लॉक, ⇨ झां झाक रुसो ह्यांनीही व्यक्ती आणि समाज ह्यांच्या संबंधांबाबत चिंतन केले होते. एकोणिसाव्या शतकात फ्रेंच तत्त्वज्ञ ⇨ऑग्यूस्त काँत ह्याने मानवाच्या सामाजिक जीवनाची रचना कशी करता येईल ह्याचा विचार केला. समाजजीवनाच्या स्थित्यंतरावरही त्याने विचार मांडले. विख्यात फ्रेंच समाजशास्त्रज्ञ ⇨एमील द्यूरकेम (१८५८–१९१७) ह्याने समूहाच्या वा सामुदायिक जाणिवेच्या अभिव्यक्तीचे तत्त्व मांडले. इंग्लंडमध्ये ⇨हर्बट स्पेन्सर ह्या तत्त्ववेत्त्याने क्रमविकासाच्या कल्पना सामाजिक विकासाला लावण्याचा प्रयत्न केला. ⇨गाबीएल तार्द (१८४३–१९०४) आणि ल बों (१८४१–१९३१) ह्या दोन सामाजिक विचारवंतांनी समाजजीवनाविषयी महत्त्वाचे लेखन केले.समाजजीवन हे मुख्यत्वेकरून अनुकरणावर अवलंबून असते, हा विचार तार्दने मांडला, तर ल बों याने समूहाच्या वर्तनाचे स्पष्टीकरण ⇨सूचन आणि सूचनक्षमता ह्यांच्या आधारे करण्याचा प्रयत्न केला.

विसाव्या शतकाच्या आरंभी सामाजिक मानसशास्त्राला स्वतंत्र अभ्यासक्षेत्राचे स्थान मिळवून देणारे दोन ग्रंथ प्रसिद्घ झाले : (१)⇨ एडवर्ड ॲल्झवर्थ रॉस ह्याचा सोशल सायकॉलॉजी (१९०८) आणि (२) ⇨विल्यम मॅक्डूगल (१८७१–१९३८) ह्याचा ॲन इंट्रोडक्शन टू सोशल सायकॉलॉजी (१९०८). रॉसवर तार्दच्या अनुकरणप्रणालीचा प्रभाव होता. मॅक्डूगलने ⇨सहजप्रेरणांची प्रणाली मांडली. समूहजीवन आणि सामाजिक आंतरप्रक्रिया ह्यांचा आधार म्हणून त्याने काही सहजप्रेरणांची सूचीच दिली.माणसे आणि मानवेतर प्राणी ह्यांच्या कृतींच्या मूलचालक (प्राइम मूव्हर्स) म्हणून त्याने सहजप्रेरणांना महत्त्व दिले.

सी. एच्. कुली ह्याने ह्यूमन नेचर अँड द सोशल ऑर्डर (१९०२) ह्या त्याच्या ग्रंथात व्यक्ती आणि समाज ह्यांच्यातील नात्याच्या अतूटपणाचा मुद्दा मांडला. माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास कुटुंब, बालोद्यान, प्ले ग्रू प अशा ठिकाणी कसा होतो, हे त्याने सोशल ऑर्गनायझेशन (१९०९) मध्ये दाखवून दिले. ए स्टडी ऑफ द लार्जर माइंड मध्ये शहरीकरण, जलद वाहतूक आणि संदेशवहन, औद्योगिकीकरण आणि विशेषीकरण, वर्गसंघर्ष इत्यादींचा मानवी व्यक्तिमत्त्वावर काय परिणाम होतो, ह्याचे विवेचन केले. आनुभविक (एम्पिरिकल) पद्घतीचा प्रथम वापर १९२० च्या दशकात सुरू झाला. या पद्घतींनी सामाजिक प्रभाव आणि व्यक्तिगत वर्तन यांमधील संबंधांची साधनसामग्री पुरविली. या क्षेत्रात सर्वप्रथम अमेरिकेच्या संयुक्त संस्थानात संशोधनास सुरू वात झाली. त्यावेळेपासून सामाजिक मानसशास्त्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील एक प्रणाली वा शास्त्र म्हणून विकासित झाले. साहजिकच अमेरिकेतील संशोधकांचा या क्षेत्रावर अधिकतर प्रभाव जाणवतो.

माणसाच्या भोवतालचा परिसर जसा भौतिक, तसा सामाजिक आणि सांस्कृतिकही असतो. व्यक्तीचा समाजातील अन्य व्यक्तींशी वा व्यक्तिसमूहांशी संपर्क येत असतो. त्यांच्याशी व्यक्तीच्या आंतरक्रिया (इंटरॲक्शन्स) होत असतात. त्या व्यक्तींची काही एक संस्कृतीही असतेच. त्यांची मूल्यव्यवस्था, जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोण, रीतिरिवाज, विधिनिषेध, जीवनशैली ह्या संस्कृतीचा भाग असतात. ह्या साऱ्यांचा व्यक्तीवर काही प्रभावही पडत असतो. अशा सामाजिक–सांस्कृतिक आंतरक्रियांमधूनच व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होत असते.

सामाजिक आंतरक्रियांचे वर्ग तीन आधारांवर केले जातात

(१) त्या आंतरक्रियेत सहभागी असलेल्या व्यक्तींची संख्या. (२)संबंधित व्यक्तींची परस्परांशी असलेली जवळीक. (३) सामाजिक आंतरक्रियांमागे असलेल्या ⇨सामाजिक प्रक्रिया.

पहिल्या आधारावर केलेल्या वर्गात व्यक्ती आणि व्यक्ती; समूह आणि व्यक्ती [⟶ समूह] किंवा व्यक्ती आणि समूह व समूह आणि समूह असे प्रकार मोडतात. व्यक्ती आणि व्यक्ती ह्या प्रकाराचे आई आणि मूल ह्यांच्यातील आंतरक्रिया हे उत्तम उदाहरण होय.आपण एका कुटुंबाचा घटक आहोत आणि कुटुंबातील प्रौढ व्यक्ती आपल्यावर वर्चस्व गाजवीत आहेत, ह्याची जाणीव मुलाला यथावकाश होते. इथे काही व्यक्तींचा समूह आणि मूल ह्यांच्यात सामाजिक आंतरक्रिया होते. ह्या कौटुंबिक सभासदांच्या वर्तनाचे आकृतिबंध, त्यांच्या वृत्तिप्रवृत्ती, त्या कुटुंबाच्या परंपरा मूल स्वीकारते. कुटुंबातील आपल्या विशिष्ट स्थानाचीही त्याला जाणीव होते. नंतर कुटुंबाबाहेरील समूहांशी संबंध येतो. आयुष्याच्या निरनिराळ्या टप्प्यांवर निरनिराळे समूह भेटतात.समूहवर्तनाच्या वेगवेगळ्या प्रकारांचा त्याला अनुभव येतो. वेगवेगळ्या समूहांतील आपल्या वेगवेगळ्या भूमिका व्यक्ती पार पाडू लागते. काही समूहांमध्ये तिचे वर्चस्व असते, तर काही समूहांमध्ये तिला गौण भूमिकाही स्वीकारावी लागते.

समूह आणि समूह हा सामाजिक आंतरक्रियेचाच एक प्रकार. हा अधिक गुंतागुंतीचा असतो. शेजारी–शेजारी राहणाऱ्या कुटुंबांतील स्पर्धा, राष्ट्राराष्ट्रांमधील युद्घे, भांडवलदार आणि मजूर ह्यांच्यातील संघर्ष, दोन जमातींमधील दंगे ह्या ‘समूह आणि समूह’ ह्या प्रकारात मोडणाऱ्या सामाजिक आंतरक्रिया होत.

समूहांचेही वेगवेगळे प्रकार असतात. उदा., कुटुंब हा समूह अधिक घट्ट बांधणीचा, कुटुंबाच्या सभासदांमध्ये जिव्हाळा असलेला, एकतेचे मूल्य मानणारा, परस्परांविषयीची कर्तव्ये ओळखून प्रसंगी एकमेकांसाठी त्याग करणारा असा मानला जातो;पण एखाद्या क्लबमधले लोक, राजकीय पक्षाचे सदस्य, गृहनिर्माण संस्था, भाडेकरूं ची संघटना यांतले संघटन वेगळ्या प्रकारचे असते. काही विशिष्ट हेतूंनी हे समूह तयार होतात आणि आवश्यकतेनुसार त्यांची पुनर्रचनाही होत असते; पण प्रतीक्षालये, बस, आगगाडी, चित्रपटगृह अशा सार्वजनिक ठिकाणी एकत्र येणारे लोक म्हणजे अगदीच तात्पुरत्या स्वरूपाचे समूह असतात.

समायोजन, विरोध आणि सहकार्य ह्यांसारख्या सामाजिक प्रक्रियांवर काही सामाजिक आंतरक्रिया आधारलेल्या असतात. सामाजिक आंतरक्रियांमध्ये जे संबंध आणि प्रक्रिया गुंतलेल्या असतात, त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र असेही सामाजिक मानसशास्त्राबद्दल म्हणता येईल.एखाद्या समूहामधील आंतर्व्यक्तिक (इंटरपर्सनल ) संबंध, विविध समूहांमधले संबंध, सामाजिक संस्था वा संघटना, संवेदन,स्मृती, ज्ञान–संपादन, समायोजन, संदेशवहन, अनुकरण, सूचन ह्या प्रक्रियांबद्दल तसेच स्पर्धा, सहकार्य अशा माध्यमांतून,ज्या व्यक्ती व समूह परस्परांच्या सहवासात येतात आणि विविध प्रकारचे नातेसंबंध निर्माण करतात, त्यांच्याबद्दल सामाजिक मानसशास्त्राला मोठे स्वारस्य आहे. हे नातेसंबंध केवळ व्यक्तीच्या वर्तनावर अवलंबून नसतात. त्याचप्रमाणे एका व्यक्तीने दिलेल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया एकत्रितपणे पाहून त्यांचे आकलन होणार नसते. येथे आंतरक्रिया सर्वांत महत्त्वाची असते;कारण आंतरक्रियेतून नव्या, अनन्यसाधारण अशा स्थितींची निर्मिती होते आणि त्यांतून व्यक्तींना आणि समूहांना अशा स्थितींसाठी नवे, अनन्यसाधारण प्रतिसाद देण्यास चालना मिळते. अशा प्रकारे सामाजिक आंतरक्रियेतून व्यक्ती आणि सामाजिक परिसर ह्या दोहोंतही बदल घडून येतात. तसेच अशा सामाजिक आंतरक्रियेमधून निर्माण होणाऱ्या स्थितींमधून व्यक्तीच्या वा समूहाच्या वर्तनाला त्याचे व्यवच्छेदक स्वरूपही प्राप्त होते.

जन्मापासून प्रौढावस्थेपर्यंतच्या काळात व्यक्तीची होत जाणारी सामाजिक स्थित्यंतरे हा सामाजिक मानसशास्त्राच्या अभ्यासाचा एक महत्त्वाचा विषय आहे. सुरू वातीला आत्मकेंद्रित आणि सुखप्राप्तीकडेच कल असणारे मूल वाढत्या वयाबरोबर कुटुंबातील आणि त्याबाहेर पसरलेल्या समाजातील वेगवेगळ्या नातेसंबंधांचा अनुभव आल्यानंतर आत्मनियंत्रण करून इतरांचाही विचार कसा करू लागते आणि अखेरीस समाजातील एक जबाबदार घटक कसा बनते, ह्याचा विचार सामाजिक मानसशास्त्र करते.व्यक्तीच्या सामाजीकरणाची दीर्घ प्रक्रिया ही अंतिमतः सामाजिक आंतरक्रियेचीच प्रक्रिया असते.
सर्व सामाजिक घटना; सामाजिक संघटन, [⟶ सामाजिक विघटन व संघटर्नें ], ⇨सामाजिक परिवर्तन, तसेच अनेकदा दिसणारे विविध संस्कृतिप्रवाहांचे संमिश्रण हे सर्व मानवी व्यक्तिमत्त्वाच्या भोवती फिरत असते. त्यांचे मानवी व्यक्तिमत्त्वाबरोबरचे आंतरसंबंध (इंटररिलेशन्स) हा सामाजिक मानसशास्त्राच्या विचाराचा एक केंद्रवर्ती विषय होय.

सामाजिक प्राणी वा जीव म्हणून माणसाच्या मूलभूत सामाजिक गरजा काय आहेत, सामाजिक आंतरक्रियेतून तो आपल्या जैव तसेच सामाजिक गरजा कशा भागवतो, आपल्या वृत्ती आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये ह्यांचा विकास तो कसा घडवतो, सर्व संस्कृतींना समान असणाऱ्या वृत्ती आणि वैशिष्ट्ये कोणती, हेही सामाजिक मानसशास्त्राच्या आस्थेचे विषय आहेत. अशा प्रश्नांच्या अभ्यासासाठी सामान्य मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि सांस्कृतिक मानसशास्त्र ह्यांसारख्या संबद्घ अभ्यासऐक्षेत्रांचा महत्त्वपूर्ण उपयोग होत असला, तरी सामाजिक मानसशास्त्राला त्याचा असा एक स्वतंत्र अभिगम (ॲप्रोच) आहे आणि मानवी स्वभावाचे ज्ञान आणि आकलन ह्यांच्या संदर्भांत ते देत असलेले योगदान फार मोठे आहे, अशी सामाजिक मानसशास्त्रज्ञांची धारणा आहे. माणसांचे सामाजिक वर्तन नीट समजून घेऊन त्याला योग्य दिशा देणे, त्याचे नियमन–नियंत्रण करणे सामाजिक मानसशास्त्राला निश्चितच शक्य आहे, असेही त्यांना वाटते. व्यक्तींच्या सामाजिक आंतरक्रिया, विविध प्रकारच्या सामाजिक–सांस्कृतिक चौकटीत माणसांचे वर्तन कसे होत असते, सामाजिक दडपणे व्यक्तींवर कोणते परिणाम घडवून आणतात, खोलवर रुजलेले पूर्वगह सामाजिक सद्भावनेस कशी हानी पोहोचवतात, ह्यांच्या आकलनांतून सहकार्य, सहिष्णुता, स्वीकारशीलता ह्यांचा पाया सामाजिक संबंधांना मिळवून देऊन विविध वांशिक, धार्मिक, राष्ट्रीय समूहांमधले संघर्ष नाहीसे करता येतील;सामाजिक संबंध निकोप करता येतील; सामाजिक पुनर्रचना घडवून आणता येईल. [⟶ सामाजिक संबंध].

सामाजिक मानसशास्त्रामध्ये माहिती वा आधारसामग्री मिळविण्यासाठी दोन मुख्य स्रोत असतात. एक, प्रयोग; आणि दुसरा,क्षेत्रीय काम. संशोधनास साहाय्य म्हणून प्रयोगशाळेच्या चौकटीत आणि वातावरणात काही व्यक्तींवर प्रयोग केले जातात; पण ह्या पद्घतीला मर्यादा आहेत. एक तर समाजात प्रत्यक्ष चालू असलेल्या सामाजिक आंतरक्रियांचे व्यापक जग प्रयोगशाळेत आणता येत नाही आणि ज्यांच्यावर प्रयोग चालू असतात, त्यांनाही आपले निरीक्षण चालू असल्याची जाणीव राहते. क्षेत्रीय कामासाठी संशोधक विशिष्ट सामाजिक आंतरक्रिया ज्या ठिकाणी घडतात, तिथे जाऊन निरीक्षणे करतात; पण येथेही कधी कधी अडचणी येतात. संशोधकांना सर्वच क्षेत्रांमध्ये सहज प्रवेश मिळत नाही.

सामाजिक आंतरक्रियेमुळे माणसांमध्ये समान विचारशैली, समान भावना आणि समान वर्तनशैली विकासित होण्यास साहाय्य होते. त्यातून समूहमनाची प्रणाली मांडली जाऊ लागली. समाजाला त्याचे असे एक मन असते, असा हा विचार होता. विल्यम मॅक्डूगलने द ग्रूप माइंड : अ स्केच ऑफ द प्रिन्सिपल्स ऑफ कलेक्टिव्ह सायकॉलॉजी (१९२०) या ग्रंथात व्यक्तींच्या व्यक्तिगत मानसिक जीवनातील काही समान वृत्ती आणि विश्वास ह्यांतून समूहमन घडते, असे मत मांडले. ⇨फ्लॉइड एच्. ऑल्पोर्ट ह्याने सोशल सायकॉलॉजी (१९२४) या ग्रंथात सामाजिक वर्तन हे माणसाच्या जैव गरजा भागविण्याचे एक साधन आहे आणि व्यक्तीच्या जैव आणि मानलक प्रक्रियांच्या आधारे हे स्पष्ट करता येते, हे दाखवून दिले.

आधुनिक सामाजिक मानसशास्त्रात तीन प्रवृत्ती दिसतात : पहिली, सांस्कृतिक मानवशास्त्राचा ह्या अभ्यासक्षेत्रावर पडणारा वाढता प्रभाव. ह्या प्रभावाचा परिणाम म्हणजे व्यक्तीचे अधिक परिपूर्ण असे आकलन व्हावयाचे असेल, तर तिचा अभ्यास निरनिराळ्या संस्कृती आणि सामाजिक संघटना ह्यांच्या संदर्भात केला जाणे आवश्यक आहे ह्याची जाणीव. वेगवेगळ्या सांस्कृतिक चौकटीतील व्यक्तिमत्त्वांच्या तौलनिक अभ्यासातून मानवी स्वभावाचे अधिक समृद्घ असे चित्र पाहता येईल, असा विचार प्रभावी ठरत आहे. दुसरी प्रवृत्ती प्रायोगिकतेची. सामाजिक मानसशास्त्र प्रायोगिक पद्घतींचा अवलंब करू लागल्यामुळे विज्ञानाच्या इतर शाखांऐबरोबर त्याला आता स्थान मिळू लागले आहे. प्रायोगिक पद्घतींमुळे सामाजिक वर्तनाचे विश्लेषण अधिक अचूक होऊ लागले आहे. तिसरी प्रवृत्ती अनुप्रयुक्ततेची. सामाजिक मानसशास्त्र हे अनुप्रयुक्त शास्त्र म्हणूनही झपाट्याने मान्यता पावत आहे. उदा., मानवी संबंधांमध्ये सुधारणा घडवून आणण्याची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने सामाजिक मानसशास्त्र उपयोगात आणले जाऊ शकते. ⇨समूहगतिकीच्या अभ्यासाचा अवलंब करून ते उद्योगाच्या क्षेत्रात मनोधैर्याचे वातावरण निर्माण करून उत्पादनात सुधारणा घडवून आणू शकते. तसेच भांडवलदार आणि कामगार संघटना ह्यांच्यातील आंतरसंबंध सुधारु शकते. ह्याशिवाय जातीय तणाव, वेगवेगळ्या समूहांमधील पूर्वगह कमी करू शकते. आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि शांतता ह्यांसाठीही सामाजिक मानसशास्त्र महत्त्वाचे योगदान देऊ शकेल असे मत व्यक्त केले जाते.

November 04, 2017

सामाजिक पर्यावरण - सर्वंकश आवरण

( सोशल इन्व्हाय्रन्मेन्ट ). मानवासभोवतीचे सर्व मानवनिर्मित भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय घटक यांतील परस्परसंबंध आणि आंतरक्रिया यांतून तयार होणाऱ्या सर्वंकश आवरणास सामाजिक पर्यावरण असे संबोधण्यात येते. 

मानव नैसर्गिक व सामाजिक अशा दोन प्रकारच्या पर्यावरणात वावरत असतो. अर्थात सामाजिक पर्यावरण ही परिपूर्ण स्वतंत्र संकल्पना नसून ती नैसर्गिक पर्यावरणावर आधारित आहे. त्यामुळे स्थलकालपरत्वे तीत फरक आढळतो. नैसर्गिक पर्यावरण जसे गतिशील आहे, तसेच सामाजिक पर्यावरणही गतिशील आहे. त्यात सातत्याने बदल होत असतात.

सामाजिक पर्यावरणाचे भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय असे प्रमुख चार घटक मानले जातात. भौतिक घटकामध्ये भौगोलिक प्रदेश, जमीन, निवास, निवासाचे स्थान, इमारती, वसाहती, संस्था, रस्ते, लोहमार्ग, हवाईमार्ग,जलमार्ग, वाहतुकीची साधने, दळणवळणाची साधने, करमणुकीची साधने, निरनिराळी भांडी, हत्यारे, उपकरणे, यंत्रे, पैसा,व्यवसाय, वस्त्रप्रावरणे, फर्निचर, कागदपत्रे, लेखनसामग्री, पुस्तके इत्यादींचा समावेश होतो. सामाजिक घटकामध्ये व्यक्ती,कुटुंब, समुदाय, समाज, जातिव्यवस्था, सामाजिक स्तर, सामाजिक संस्था इ. अंतर्भूत होतात. सांस्कृतिक घटकामध्ये संस्कृती म्हणजेच समाजाची सर्वच क्षेत्रांतील वैकासिक प्रगती, ज्ञानाची पातळी, अभ्यासकम, शिक्षण, शिक्षणपद्घती,शिक्षणसंस्था, विद्यापीठे, धर्म, धार्मिक विचार, धार्मिक संस्था, धार्मिक ग्रंथ, धार्मिक रीतिरिवाज, अर्चना, प्रार्थना, अध्यात्म,योग, चालीरीती, साधना, परंपरा, रुढी, विविध कला, कलाविष्कार वगैरेंचा समावेश होतो. राजकीय घटकामध्ये राज्यव्यवस्था, व्यवस्थापन, राज्यघटना, नियम, कायदे, प्रशासन, प्रशासकीय यंत्रणा, संरक्षणव्यवस्था, पोलीसयंत्रणा, सैन्य,गुप्तचर विभाग, परराष्ट्रीय धोरण, परराष्ट्रीय संबंध वगैरेंचा समावेश होतो. या सगळ्या घटकांची निर्मिती मानवाने स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतः केलेली आहे. या सर्व घटकांमध्ये परस्पर आंतर–संबंध असून त्यांच्यांत अगदी सूक्ष्म पातळीवरही आंतरक्रिया होत असतात. त्यातूनच मानवाला जगण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, अन्न, वस्त्र, निवारा, अर्थ,साधनसामग्री, शक्ती, मानसिक स्वास्थ्य, सुख आणि समाधान याबरोबरच जगण्याचा सन्मान मिळत असतो.

Source;vikaspedia.in
November 04, 2017

सामाजिक लोकशाही - एक राजकीय प्रणाली

(सोशल डेमॉक्रसी). एक राजकीय प्रणाली. ती प्रस्थापित राजकीय प्रक्रियांचा उपयोग करून समाजाचे भांडवलशाहीकडून समाजवादाकडे कमविकासी व शांततामय मार्गांनी संकमणाचा (स्थित्यंतराचा) पुरस्कार करते.ही संकल्पना ⇨कार्ल मार्क्स आणि ⇨फीड्रिख एंगेल्स यांनी प्रतिपादिलेल्या सिद्घान्तावर आधारित आहे. तीत मार्क्सवादातील सर्वसामान्य पायाभूत कल्पनांचा काही भाग आहे; तथापि संघर्षवाद व सर्वंकषवाद यांपासून ती पूर्णतः अलिप्त आहे. तसेच कामगार कांती तिला मान्य नाही.

सामाजिक लोकशाहीवादी चळवळ ही ऑगस्ट बेबल (१८४०– १९१३) या विचारवंताच्या प्रयत्नातून उद्‌भवली. त्याने विल्यम लिप्वनेख्ट (१८२६–१९००) या राजनीतिज्ञासमवेत जर्मन सोशल डेमॉकटिक लेबर (वर्कर्स) पार्टीची स्थापना केली आणि ती जनरल जर्मन वर्कर्स युनियन या पक्षात पुढे विलीन करून (१८७५) तिचे नामांतर सोशल डेमॉक्रटिक पार्टी ऑफ जर्मनी करण्यात आले. या पक्षाने जर्मनीतील संसदेत (राइक्स्टॅग) सर्वांत जास्त जागा जिंकल्या. परिणामतः यूरोप खंडातील देशांतून सामाजिक लोकशाही तत्त्वज्ञान प्रसृत झाले. बेबलची अशी धारणा होती की, सामाजिक लोकशाहीला अभिप्रेत असणारा समाजवाद हा सक्तीने न करता सनदशीर व विधिपूर्वक मार्गांनी प्रस्थापित व्हावा. सामाजिक लोकशाही या तत्त्वप्रणालीच्या प्रसार–प्रचारात जर्मन राजनीतिज्ञ व विचारवंत एदूआर्ट बेर्नश्टाईन (१८५०–१९३२) याचे योग दान मोठे आहे. तो मुळात मार्क्सवादी होता; तथापि मार्क्सवादातील उणिवा त्याच्या लक्षात आल्याने त्याने मार्क्सवादात सुधारणा करून ही नवीन विचारसरणी प्रसृत केली. याचे सविस्तर विवेचन त्याच्या ईव्हलूशनरी सोशॅलिझम ( इं. भा.) या ग्रंथात आढळते. या ग्रंथात बेर्नश्टाईनने मार्क्सवादी तत्त्वज्ञानाला आव्हान दिले आहे. मार्क्सच्या ‘भांडवलशाही अखेरची घटिका मोजत आहे’, या मताचे खंडन करताना बेर्नश्टाईन म्हणतो की, “उद्योगधंद्यांची मालकी अत्यल्प भांडवलदारांकडून अधिकाधिक लोकांच्या हाती जात आहे आणि कामगारांचा सामाजिक दर्जाही सुधारत असून सार्वत्रिक मताधिकारामुळे ते आपले प्रतिनिधी निवडून देऊ शकतात;जे कामगारांची बाजू समर्थपणे मांडू शकतील”. तात्पर्य बेर्नश्टाईन भांडवलशाहीचे उच्चटन या तत्त्वाशी सहमत नाही. त्याच्या मते वर्गसंघर्ष आणि वर्गविषमता या बाबी सामाजिक एकात्मतेला व प्रगतीला बाधक असून त्या नष्ट केल्या पाहिजेत. त्याकरिता सनदशीर मार्गाने सुधारणा करणे आणि आर्थिक पुनर्वितरणाचे कार्यक्रम राबविणे, हा उपाय तो सुचवितो. डावीकडे झुकलेली ही मध्यममार्गी विचारप्रणाली आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टिकोनातून भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा घडवून आणणे, हा तिचा मूळ उद्देश आहे. भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा केल्यास सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो,अशी या विचारप्रणालीची धारणा आहे. कल्याणकारी राज्य आणि आर्थिक लोकशाही प्रस्थापित करणे, हा कामगारांचे हक्क सुरक्षित ठेवण्याचा मुख्य उपाय असल्याचे व त्या आधारे भांडवलशाही व्यवस्थेत सुधारणा करण्याचे सामाजिक लोकशाहीच्या पुरस्कर्त्यांचे धोरण आहे. ऐतिहासिकदृष्ट्या ही एक उत्क्रां तवादी सुधारणा समाजवादाची चळवळ म्हणून उदय पावली.विसाव्या शतकात या चळवळीने मार्क्सवादाला स्पष्ट विरोध नोंदवून कांतिकारी समाजवाद आणि वर्गसंघर्ष हे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याचे शाश्वत मार्ग नसल्याचे स्पष्ट केले आणि सामाजिक सुधारणा हाच योग्य मार्ग ठरविला. त्या आधारे यूरोपातील लोकशाही समाजवादी राजकीय पक्षांची ध्येयधोरणे कृतिकार्यक्र माद्वारे निर्धारित केली. सामाजिक लोकशाही आणि लोकशाही समाजवाद यांमध्ये यूरोपातील सामाजिक लोकशाहीवादी पक्षांनी फारसा फरक केला नव्हता. फक्त बोल्शेव्हिक साम्यवाद आणि स्टालिनवाद यांना विरोध करून भांडवलशाहीचे समाजऐवादी अर्थव्यवस्थेत सनदशीरपणे क्र माकक्रमाने रुपांतर करणे, हे सामाजिक लोकशाहीचे मध्यवर्ती सूत्र प्रतिपादिले. फ्रँक फुर्ट येथे भरलेल्या ‘सोशॅलिस्ट इंटरनॅशनल ‘च्या अधिवेशनात (१९५१) हे सूत्र निर्धारित करण्यात आले. ‘सोशॅलिस्ट इंटरनॅशनल’ ही सामाजिक लोकशाहीवादी पक्षांची संघटना असून तिच्या माध्यमातून या पक्षाची ध्येयधोरणे व कृतिकार्यक्र म निर्धारित केले जातात आणि मूलभूत हक्क आणि नागरी स्वातंत्र्य यांना विशेष प्राधान्य दिले जाते.

रशियन क्रां ती (१९१७) झाल्यानंतर सामाजिक लोकशाहीची चळवळ व तिचे तत्त्वज्ञान अधिक विशिष्टवादी झाले आणिकाळाच्या ओघात तिचे स्वरूप मध्यममार्गी झाले. राजकीय सत्ता हे परिवर्तनाचे साधन असले, तरी तिचा दुरूपयोग होऊ नये;त्याचप्रमाणे समता आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेची व्याप्ती केवळ आर्थिक क्षेत्रापुरतीच मर्यादित न ठेवता सामाजिकआणि सांस्कृतिक क्षेत्रांतील समतेचाही त्यात अंतर्भाव असावा; याशिवाय समान संधी व सामाजिक एकसंधता याही बाबींचीपूर्तता व्हावी, असे निर्धारित करण्यात आले. ‘लाल गुलाब’ हे या चळवळीचे प्रतीक ठरविण्यात आले.

दुसऱ्या महायुद्घानंतर सामाजिक लोकशाहीवादी पक्ष यूरोपमधील काही देशांतून–विशेषतः पश्चिम जर्मनी, स्वीडन आणि ग्रे टब्रिटन (लेबर पार्टी ) यांतून–सत्तारुढ झाले आणि त्यांनी आधुनिक समाजकल्याण कृतिकार्यक्र मांचा पाया घातला. या पक्षांनीआपली पारंपरिक उद्दिष्टे आणि कार्यक्र मांत परिस्थित्यनुसार बदल केले असून मानवी हक्क आणि पर्यावरणाचे प्रश्न, जागतिकशांतता इत्यादींचा त्यांनी पुरस्कार केला आहे. पारंपरिक लाल आणि आधुनिक पर्यावरणवादी हिरवा रंग यांचा समन्वय साधलाअसून ‘लाल–हिरवा संमिश्रण’ निर्माण करण्याचाही त्यांनी प्रयत्न केला आहे.

सांप्रत सामाजिक लोकशाहीवादी चळवळीचे स्वरूप पारंपरिक अन्य चळवळींपेक्षा बऱ्याच अंशी प्रागतिक आहे. तिनेराष्ट्रीयीकरण, सार्वजनिक न्याय, अनुदाने, सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय आरोग्य, पर्यावरण संवर्धन, वित्तीय नियमनइत्यादींचा स्वीकार केला आहे. शिवाय काही प्रमाणात खाजगीकरण व उदारीकरण यांना प्रोत्साहन देऊन उपभोगवादाला,सामाजिक उद्दिष्टांना तो मारक ठरणार नाही, एवढी मोकळीक तिने दिली आहे.

Source:vikaspedia.in
November 04, 2017

सामाजिक आदान-प्रदानाचे विविध नमुने

सामाजिक आदान-प्रदान

(सोशल कम्युनिकेशन). सामाजिक आदान-प्रदान ही समाजशास्त्रातील एक महत्त्वाची संकल्पना आहे. माणूस समाजप्रिय प्राणी आहे. समाज अनेक समूहांचा आणि अनेक प्रकारच्या व्यक्तींचा असतो. या नानाविध व्यक्तींमध्ये देवाण-घेवाण चालू असते. व्यक्ती वेगळ्या वयाच्या, विविध नातेसंबंध असलेल्या व विविध धर्म-पंथांच्या आणि विविध रिवाज पाळणाऱ्या असतात. व्यक्ती वेगवेगळे व्यवसाय करतात म्हणूनच समाजव्यवस्था चालू राहते. असे व्यक्तिसमूह एका भौगोलिक प्रदेशात राहतात म्हणूनच त्या जागेबद्दलची आत्मीयता ‘आपला गाव, राज्य, देश आणि आपले एकत्र राहणारे सर्व लोक’ अशी भावना समूहांमध्ये असते; आणि अशा समुदायांमध्ये सतत आदान-प्रदान चालू असते. स्वतःला विसरुन समूहातील व्यक्तींचे आदानऐ-प्रदान सामाजिक स्वरुपाचे असते. प्रसिद्घ जर्मन समाजशास्त्रज्ञ ⇨माक्स वेबर (१८६४–१९२०) यांनी चार प्रकारचे आदान-प्रदान असल्याचे सांगितले आहे : पारंपरिक (मंदिरबांधणीत सहभाग, पूजा-अर्चा, उपवास इ. रुढी पाळणे),मानसिक (प्रेम करणे, वाईट वाटणे, भिणे, सहकार), मूल्यप्रमाणित वर्तन (कायदे पाळणे, सामूहिक लढ्या त भाग घेणे इ.) व वैचारिक आणि व्यावहारिक वर्तन.प्रसिद्घ अमेरिकन समाजशास्त्रज्ञ ⇨टॅलकॉट पार्सन्झ (१९०२– ७९) यांच्या मते समुदायातील व्यक्ती क्रि यांची निवड समुदायातील नियमांनुसार करते. समाजाच्या सुरुवातीपासून व्यक्ती इतरांशी प्रेमाने, सलोख्याने, सहकार्याने वागते. आज व्यक्ती एकत्र उत्पादनाचे काम करतात, सरकारने सुरु केलेल्या कामावर सर्वांना बरोबर घेऊन कामाचा भार उचलतात. असे असूनही व्यक्ती नेहमीच असे वागत नाहीत. कधीकधी काहींशा रागाने, द्वेषाने आणि सूडबुद्घीने वागतात. व्यक्तींच्या मनातील सूडभावना सामूहिकपणेही प्रकट होतात, त्या कधी तडजोड करतात, तर कधी त्यांच्यामध्ये वैर चालूच राहते. तसेच विविध समुदाय आपापल्या धर्माचे ग्रंथ पवित्र मानतात आणि सणसमारंभ साजरे करतात. प्रत्येक धर्माचे बोधचिन्ह वेगवेगळे असते. हे वर्तणुकीतील वेगळेपण सामाजिक स्वरुपाच्या आदान-प्रदानाची गरज पूर्ण करते. परस्परांत सौहार्दाचे वातावरण आवश्यक असते.

जे समुदाय कोणतेच धर्म किंवा कर्मकांड पाळीत नाहीत, ते सर्वांनी पाळण्याजोगे कायदे आणि मूल्यांनुसार वर्तन करणे पसंत करतात. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समता, स्वातंत्र्य ही मूल्ये जोपासतात. त्यांच्या क्रिया अधिकतर सांघिक असतात. मोर्चे,हरताळ, बंद, सभा यांतून त्या व्यक्त होतात. क्रांती, चळवळ, सत्यागह, अन्यायमूलक विरोध ही साधने त्यांना वापरावी लागतात. आतापर्यंत जगात ठिकठिकाणी समुदायांनी अन्य समुदायांवर अन्याय केले. राजे, सावकार, उच्च जाती, जमीनदार यांनी गरीब जनतेवर, पुरुषांनी स्त्रियांवर, धर्ममार्तंडांनी अडाणी भक्तगणांवर अन्याय केला; मात्र या दुष्ट प्रथांचे विचारवंतांनी खंडन केले. उद्योगाच्या क्षेत्रात आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध झाली. परिवहनाची आधुनिक साधने निर्माण झाल्यामुळे परदेशात व देशांतर्गत उत्पादनाच्या क्षेत्रात औद्योगिक क्रांती घडून आली. पूर्वापार चालत आलेली वस्तुविनिमयाची जागा बाजारव्यवस्थेने घेतली. बँका निघाल्या, औद्योगिकीकरणाला चालना मिळाली, भांडवलदारांची श्रीमंती वाढतच गेली आणि समाजात श्रीमंत-गरीब यांच्यातील दरी वाढत गेली. कारखानदारांकडून कामगारांची पिळवणूक होऊ लागली. परिणामतः कामगार संघटनांचे संघटन होऊन हरताळ, बंद इ. प्रकारांनी कारखानदारांवर दबाव आणला गेला. तत्पूर्वी यूरोप खंडात ⇨कार्ल मार्क्स यांनी ‘जगातील कामगारांनो, संघटित व्हा आणि अन्याय करणाऱ्या भांडवलशाहीला विरोध करा. तुम्हाला केवळ तुमच्या पायातील बेड्या गमवाव्या लागतील; पण त्या बदल्यात तुम्हाला स्वातंत्र्य व सत्ता मिळेल’ असा उपदेश केला आणि त्याची परिणती रशियन राज्यक्रांतीत झाली (१९१७). माणूस आदान-प्रदानातून मोठे युद्घही लढू शकतो हे सत्य जगापुढे आले.
समाज आकाराने लहान होता, त्यावेळी कुटुंबामध्ये, गावांमध्ये, समुदायांमध्ये व्यक्ती परस्परांशी प्रेमाने आणि सलोख्याने वागत असत. त्यावेळी समस्यांचे प्रमाण कमी होते; परंतु जागतिकीकरणाच्या प्रक्रियेपासून लहानमोठ्या समुदायांमध्ये भांडणतंटे,सूड घेणे वाढले. ‘मी’ पणाची भावना वाढून स्वार्थ, स्पर्धा आणि संघर्ष यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले. संघर्ष केवळ देशांतर्गत राहिला नाही, तर देशा-देशांमध्ये सुरु झाला.
देशांतर्गत सुरक्षा रहावी, त्या दृष्टीने शासन सतर्क असते. सुरक्षेइतकेच महत्त्व शिक्षण, आरोग्य आणि प्रतिबंधात्मक वैयक्तिक आरोग्य यांनाही आहे. यावर शासन व समाजसेवी संस्था काम करीत असतात. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात तंत्रज्ञान व विज्ञानातील संशोधनामुळे औषधो पचारात प्रगती झाल्याने बालमृत्यू आणि स्त्रीमृत्यू यांचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच दळणवळणातील प्रगतीमुळे प्राथमिक आरोग्यसेवा गावोगावी पोहोचत असून, आहार आणि कुटुंबकल्याण यांवरही भर दिला जात आहे. नेत्रदान आणि देहदान ह्या पुण्यकर्मांचे महत्त्व समाजावर बिंबवले जात आहे. ज्ञान, मानसिक प्रवृत्तींचे उन्नयन व त्यानुसार क्रि या करणे ही त्रिसूत्री जनता स्वीकारु लागली, तर सामाजिक क्रिया कल्याणकारी होतील.

नैसर्गिक आणि अन्य आपत्तींच्या वेळी सामाजिक दातृत्वाचे निखळ दर्शन घडते. जात, धर्म, वंश, आर्थिक स्थिती इत्यादींचा विचार न करता माणसे आपद्‌गस्तांना मदत करतात. समुदायातील सेवाभावी संस्था दुःखात सहभागी होतात. समुदायात ‘आम्ही, आपले आणि आमच्या सर्वांचे अशी भावना असते’. इतरांच्या समस्या माझ्याच समस्या आहेत असे मानून परस्परांना त्या साहाय्य करतात. आजचे ‘बचतगट’ – विशेषतः महिलांचे – स्त्रियांची संकुचित दृष्टी व्यापक करण्यास साहाय्यभूत होतात. त्यांच्या एकत्र भांडवलनिर्मितीतून उत्पादक क्रि यांना आणि बाजारहाट यांना तर वाव मिळतोच; पण त्याशिवाय कोणाही महिलेवर संकट आले, तर धावून जाण्याची क्षमताही दाखविली जाते. समाजात विविध समुदाय आपापली संस्कृती जपतात. समाज नव-अभिजात-सिद्घांतानुसार सुखलोलुप होत आहे. तो सुखकारक कृती करण्याकडे प्रवृत्त होतो आणि दुःखकारक गोष्टी करण्याचे टाळतो. यालाच विलासवादी मानसशास्त्र असे म्हटले जाते. या सिद्घांतास सुख-दुःख असेही म्हणतात. आदान-प्रदानाचे हे विविध नमुने समाजात आढळतात.

Source: vikaspedia.in