नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

नुसते शिवाजी महाराज छातीवर लावून मराठी होत नाही

पोलिसांना एका तरूण मुलाची बुलेट अडवली...
मागच्या नंबर प्लेटवर पोलिसांनी नजर टाकली...!!
एक लेडिज कॉन्सटेबल ती नंबर प्लेट काढण्यासाठी नंबर प्लेट्ला हात लावताच मुलगा गाडीवरुन उतरला आणि म्हणाला,
"नंबर प्लेटला हात लावायच नाही, जो फाईन बसतो तो भरायला तयार आहे"..!!
पोलिस अधिकारी जवळ आला त्यानं सांगितल
५००/- रुपये दंड पडेल...!
मुलाने क्षणात खिशातुन १०००/- रुपयाची कोरीकरकरीत नोट काढली आणि त्या पोलीस
अधिकार्याच्या हातात दिली...
पोलिस अधिकार्याने ५००/- रुपये परत देण्यासाठी खिशाकडे हात नेला...
तेव्हा मुलगा म्हणाला,
"बाकीचे उरलेले ५००/- रुपये पुढच्या वेळेसचा अँडव्हांस दंड म्हणून ठेवा."

असं काय होत त्या नंबर प्लेटवर...?

मित्रांनो,
त्या नंबरप्लेटवर होते
"छत्रपती शिवाजी महाराज"

मुलाने त्या ट्रॉफिक पोलीस आणि लेडि कॉन्सटेबलकडे एक तिरपा कटाक्ष टाकून म्हणाला,
"शिवरायांसाठी कायपण"
अन ऐटीत किक मारली.
घरी गेला...जेवला.. झोपला..
स्वप्नात त्याला साक्षात...
"छत्रपती शिवाजी महाराज" दिसले..

शिवाजी महाराजांनी आपल्या हातातील एक वस्तु त्याला दिली...
तलम व चमचमीत रेशमी कापडातील ती गुंडाळलेली वस्तु पाहुन तो खुश झाला...
त्याला वाटलं महाराजांनी काही भेट वस्तु दिली किंवा आपला पराक्रम पाहुन बक्षीस..! नजराणा दिला.
आनंदाच्या भरात त्याने ती वस्तु तलम कापडातुन बाहेर काढली आणि बघतो तर काय...
त्याच्या गाड़ीची नंबर प्लेट..!

महाराज गरजले..!
"माझ्या राज्यात कायदे मोडणा-यां माझ्याच सरदारांचे मी हात तोडले.. आणि तु माझाच फोटो लावुन कायदा मोडतो..
तंगड़ तोडु का तुझं...?"
सगळ्यांनी माझेच फोटो लावले तर पोलीस गाडी कसे ओळखणार..?
आणि
माझे फोटो लावुन कोणी बँका लुटल्या तर..?
आया बहिणींची छेड काढुन पसार झाले तर...?
तुझा अपघात झाला तर घरच्यांना कसं कळणार...?
लक्षात ठेव अरेरावी..
हुज्जत घालणे ही माझी शिकवण नाही..!
"अन्यायाच्या विरोधात आवाज उठविणे हिच माझी शिकवण.."
आणि नुसते शिवाजी महाराज छातीवर लावून मराठी होत नाही आधी
कर्तब आणि कर्तव्य करा मग तिच छाती ठोकून सांगा मराठी आहे...

No comments:

Post a Comment