नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

विद्वानांशी पंगा नको


मिस्कील स्वामी विवेकानंद..
स्वामी विवेकानंद युनिव्हर्सिटी काॅलेज, लंडन येथे कायद्याचे शिक्षण घेत असतांनाचा किस्सा आहे.
एक 'पिटर' नावाचे प्रोफेसर विवेकानंद यांचा तिव्र द्वेष करीत.

एक दिवस डायनिंग रूममध्ये प्रो पिटर जेवण करीत असतांना विवेकानंद हातात जेवणाचे ताट घेऊन आले आणी प्रो पिटर चे शेजारी असलेल्या खुर्ची वर बसले.
यामुळे चिडून अस्वस्थ झालेले पिटर बोलले.. "मि. विवेकानंद, एक सुंदर पक्षी आणि एक घाणेरडे डुक्कर कधीच एकत्र बसून जेवण करीत नाहीत."
विवेकानंद यांनी शांतपणे प्रो. पिटर कडे पाहून म्हटले " काळजी करू नका .. प्रोफेसर मी उडून दूर जातो..!"

प्रोफेसर पिटर यांचा जळफळाट झाला. त्यांनी बदला घेण्याचा निश्चय केला.
दुसऱ्या दिवशी वर्गात त्यानी विवेकानंद यांना उभे करून प्रश्न विचारला "मि. विवेकानंद, तु रस्त्याने जात असतांना तुला दोन पिशव्या पडलेल्या दिसल्या.. एका मध्ये पैसे आहेत आणि एका मध्ये शहाणपणा आहे.. तु कोणती पिशवी घेशील?"
एक क्षणाचाही विचार न करता विवेकानंद उत्तरले "अर्थातच पैसे असलेली पिशवी घेईन..."
प्रो. पिटर विवेकानंदांची टर उडवून हेटाळणीच्या सुरात बोलले "तुझ्या जागी मी असतो तर शहाणपणाची पिशवी घेतली असती.."
विवेकानंद यांनी प्रो पिटर यांना सहमती दर्शवून म्हटले "बरोबर आहे.. ज्याचे जवळ जे नाही तेच त्याने घ्यावे.."

प्रो पिटर शरमेने आणि संतापाने लाल झाले. त्यांनी विवेकानंद यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
त्यांनी विवेकानंद यांचे उत्तरपत्रीकेवर 'इडियट' असे लिहीले. विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका घेऊन शांतपणे बसून राहीले..
प्रो. पिटर यांनी विचारले "कुणाला काही शंका..??"
विवेकानंद यांनी उत्तरपत्रीका दर्शवित सांगीतले "प्रोफेसर .. तुम्ही उत्तरपत्रीकेवर तुमची स्वाक्षरी केली आहे पण मार्कस द्यायला विसरले आहात ..."

😄😄 विद्वानांशी पंगा नको😅😅

No comments:

Post a Comment