नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday 29 December 2017

आयुष्याच्या डायरीतून काही टिप्स

* आपणास नक्की काय करायचे आहे हे ठरवा .
त्या नुसार काही तरी Plan करा . नुसते काही तरी करायचे
म्हणून काही करु नका . नेहमी लक्षात असू द्या
Failing to plan is planning to fail.
* यशस्वी होण्यासाठी फार काही वेगळे करायची गरज नसते
जे काही करता त्यात मात्र वेगळेपणा जपा .
* Adjustment आणि तडजोड हे शब्द नेहमी वापरात आणा.
अट्टाहासापायी अडून बसण्यापेक्षा हळूहळू करत पुढे गेलेले
केव्हाही चांगले
* वेळेचे भान ठेवा . केव्हा कुठे आणि कीती वेळ द्यायचा
याचे नियोजन करा . वेळ वाया घालवायपेक्षा
सत्कारणी लावा
* एक चूक एकदाचं . चुकायला घाबरु नका .चुकतो तोच शिकतो .
चूकले म्हणून हळहळत बसू नका . चूक लक्षात आली की लगेचं सुधारा
* बदल पहायचा आहे मग स्वतःत आधी त्यानुसार बदल करा मग दुसर्याला बदलायला .
* जे काही कराल ते आनंदाने करा त्याची मजा घेत ती गोष्ट करा.
त्याला अनूभवा . ह्या मुळे कामाचा कंटाळा नाही येत व निम्मे अडचणी
आधीचं गायब होतात....
* कसलीही सुरुवात करताना आधी माहीती त्या बद्दल मिळवा ,
मग कामाला लागा . प्रामाणिकपणे मेहनत करा .
योग्य वेळी output नक्कीचं मिळते
मेहनत कधीचं वाया नाही जात .......
* नेहमी इतरांशी स्वतःची तुलना करत बसू नका .
असे करुन स्वतःची किंमत कमी होते . एक नेहमी लक्षात असू द्या
आपण जगात सगळ्यात अनमोल आहोत......
* प्रत्येकास सारे जग बदलायचे आहे थोडे स्वतःच्या
दॄष्टीकोनात आणि स्वतःत थोडा बदल करुन पहा जग बरेचं बदललेले दिसेल....
* आज जो विचार कराल ते लगेचं नाही होणार . पण उद्या काय होणार आहे
हे आज केलेल्या विचारवर अवलंबून आहे . Think Big Do Big ...
* कसलीही सुरुवात करताना नकारात्मक विचार करु नका
सुरुवात नकारात्मक केली तर अर्धी लढाई आपण सुरुवात न करताचं हरतो
* अशक्य हे शक्य असते फक्त त्या कडे कसे पहातो तसे ते दिसते
* जीवनात नेहमी काही तरी अपूर्णचं असते म्हणून परिपूर्ण असयचा प्रयत्न करा
* नेहमी आनंदी असा जीवनाची मजा घ्या , हर एक क्षण जगा .

No comments:

Post a Comment