नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

क्रेडिटकार्ड वाल्यांचा फोन

आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट
कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि
गणपतराव ला सुध्दा संताप यायचा पण मग आता त्यांनी
ह्याचा आनंद घ्यायचा ठरवले आणी आता तर त्यांची
खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त
करण्यासाठीच येतात.

आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या
सदहेतुने गणपतरावांचे संभाषण येथे देत आहोत.
(ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)

फक्त आनंद घ्या लेखनाचा
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो
आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा
बॅंक.
गणपतराव :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये,
आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी
माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही
इंट्रेस्टेड आहात का सर ?
गणपतराव :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
गणपतराव :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात
पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड
आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ
उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर
तुम्हाला कधि वेळ आहे ?
गणपतराव :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती
देण्यासाठी.
गणपतराव :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर
मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला
सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी
आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला
कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण
माहिती देइल.
गणपतराव :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव
मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत
होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
गणपतराव :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप
चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी
असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द
वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला
आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात
ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या
आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
गणपतराव :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली
आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही
हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज
वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
गणपतराव :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला.
पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन
भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक
स्वरात बोलायला लागली आहे.)
गणपतराव :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार
आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत
करे कोई और फल खाये कोई
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर
साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी
माणसे नेमली आहेत.
गणपतराव :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी
आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे
आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत
त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
गणपतराव :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच
म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या
भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
गणपतराव :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे
आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
गणपतराव :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या
सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड
वापरता ?
गणपतराव :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन,
क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण
नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या
वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या
ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड
विषयी बोला.
गणपतराव :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत.
माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही
मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी
करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन
फोन आदळला जातो.)
हे पहा आता

No comments:

Post a Comment