नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday, 29 December 2017

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा

सण आयलाय गो, आयलाय गो नारळी पुनवेचा
  मनी आनंद मावेना कोळ्यांच्या दुनियेचा ||

असे म्हणत कोळी लोकांचा जमाव, सजवलेला नारळ घेऊन हसत खेळत समुद्राच्या रोखाने जात असतो आणि समुद्राची पूजा करून तो नारळ त्याला अर्पण केला जातो ती दिवस म्हणजे श्रावण शु. पोर्णिमा यालाच नारळी पोर्णिमा म्हणतात. आषाढ महिन्यात व श्रावणाच्या पूर्व भागात पावसाचा जोर फार असतो. पावसाचा देव ' वरुण' याला शांत करण्यासाठी सागराला नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे. कोळी लोकांचे जीवन समुद्रावर अवलंबून असते त्यामुळे ते दर्याराजा शांत होण्याची ते वाट बघत असतात. श्रावण पौर्णिमेला दर्याराजाला नारळ अर्पण करून त्या नंतर कोळी लोक मासेमारीसाठी दर्यात जहाज हाकारतात.

                          प्राचीन काळी भारतीय लोक व्यापार आणि धर्मप्रसार या साठी जलमार्गाने परदेशी जात असत. त्यांचे सुयश आणि जीवन या रत्नाकरावर अवलंबून असे म्हणून समुद्राचे पूजन व श्रीफळ दान विधी करून समुद्र शांत होण्यासाठी ते प्रार्थना करीत. तो सामुदाईक समारंभ याच श्रावण शुद्ध पौर्णिमेस करण्याची प्रथा पडली. याच दिवसापासून पाऊस संकटांचा जोर कमी होऊन त्या लोकांचा समुद्र प्रवास सुखकर होई. 

                           नारळी पोर्णिमा हा सण कोळी लोकांत फारच उत्साहाने साजरा करतात. तसेच इतर सर्व जातीतील लोकहि साजरा करतात. घरोघर गोड पदार्थांचे जेवण असते. विशेषत: नारळी भात करण्याची प्रथा आहे. सायंकाळी लहानथोर सर्वजण छान- छान नवीन कपडे घालून मुलाबाळांसह समुद्रावर जातात आणि पाण्यात नारळ टाकतात.

                           प्राचीन काळी आश्रमीय विद्यार्थी श्रावण शुद्ध पौर्णिमेस श्रावणी नावाचा विधी करत. श्रावणी करणे म्हणजे शुचिर्भूत होने. काया, वाचा, मान यापासून कळत- नकळत झालेल्या पापांचा उच्चार करून परमेश्वराजवळ  क्षमा मागणे व पुनश्च असा प्रकार न घडण्याबद्दल निश्चय करणे. अजूनही बरेच  लोक या दिवशी पंचगव्य प्रश्न करतात. होम-हवन ई. विधी प्रसिद्ध आहे.

                       हा दिवस 'रक्षाबंधन' या नावाने पण प्रसिद्ध आहे. उत्तर भारतात हा सण उत्साहाने व थाटाने साजरा केला जातो. पूर्वी राजपूत स्त्रिया शत्रूच्या  गोटात  शिरून विरुद्ध बाजूच्या वीर जवानांच्या हातात राखी बांधीत व त्यामुळे युद्ध प्रसंग टळत , अशी वर्णने राजपुतांच्या इतिहासात आढळतात.
राक्षबंधानाशी संबंधित उद्बोधक कथा अशी :,

मेवाडच्या राजावर बहादुरशाहने हल्ला केला तेव्हा राणी कर्णावतीने दिल्लीपती हुमायूनला राखी पाठवली व भाव - बहिणीचे नाते जोडले. हुमायून मेवाडच्या रक्षणासाठी आला. पण त्या आधीच बहादुरशाहने  मेवाडचा पराभव केला होता. व राणी कार्णावातीने जोहार केला होता. ती ज्या ठिकाणी जळून मेली त्या ठिकाणी फक्त राखेचा ढीग उरला होता. त्या पवित्र ढिगाजवळ   हुमायून गुढगे टेकून बसला व म्हणाला, " तुझ्या पवित्र राखीमुळे हा बहु तुझे रक्षण करण्यास बांधला होता. पण मी ते करू शकलो नाही म्हणून मला क्षमा कर."
अशा प्रकारच्या कथा इतिहासात आहेत. पण रामायण - महाभारत यात याचा उल्लेख नाही. त्यामुळे केवळ रूढीमुळे हा सण प्रसिद्ध आहे. आजूनही रक्षाबंधनाचा दिवस सर्वत्र साजरा केला जातो  व बहिण भावाच्या हातात आपल्या प्रेमाचे प्रतिक म्हणून राखी बांधते.

रक्षाबंधन व नारळी पौर्णिमेच्या शुभेच्छा !!

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

No comments:

Post a Comment