नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday, 29 December 2017

महाराष्ट्र - एक नवी सांस्कृतिक ओळख

महाराष्ट्र म्हणजे संस्कृति आणि परंपरा यांनी नटलेल राज्य. ५० वर्षापुर्वीचा आणि आताच्या महाराष्ट्रात खूप बदल झालेत, जसे समुद्रात खूप सारे प्रवाह येऊन एकत्र होतात तसेच काहीसे महाराष्ट्रीयन संस्कृतीचे हि आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक प्रवाह इतके   वेगळे पण एकमेकाना जोडणारे आहेत आणि प्रत्येक प्रवाहाचे एक  वेगळे वैशिष्ठ्य आहे; त्यामुळे ह्या प्रत्येक प्रवाह मुळे महाराष्ट्राची एक नवीन ओळख बनते आहे. महाराष्ट्र ही भूमी ही देवांची , संताची अन भक्तांची, वीरांची, लोककलांची, साहित्याची आहे. हा प्रत्येक प्रवाह महाराष्ट्राची एक वेगळी ओळख सांगतो. ह्याच प्रवाहंची ही फ़क्त तोंड ओळख. ( कदाचित काही गोष्टी लिहायच्या राहून गेल्या तर क्षमस्व:   )

देवांचा, संतांचा , भक्तांचा महाराष्ट्र : महाराष्ट्रातील  देवस्थाने  आपल्या  सगळ्याना  माहित  असतीलच.  अष्टविनायक, मुंबई चे  सिद्धिविनायक,  पंढरपुर,  साईं बाबां  सारखा  अवतार  पण  देवाने  महाराष्ट्रातच  धारण  केला  ते  पवित्र  स्थान शिर्डी, गणपति पुळे,  ५१  शक्ती  पीठे  संपूर्ण  देशभरात  आहेत;  त्यातली  साडेतीन शक्ती पीठे हि महाराष्ट्रात आहेत आणि  ती म्हणजे तुळजाभवानी,  महालक्ष्मी, रेणुका  माता, आणि  सप्तशृंगी हे अर्धे पीठ मानले जाते. १२ ज्योतिर्लिंगापैकी  चार आपल्या महाराष्ट्रात  आहेत  ती  म्हणजे  भीमाशंकर,  नागेश्वर,  त्र्यंबकेश्वर,  घ्रिनेश्वर.  घरापुरी  येथील  लेणी  मधे  तर  ब्रम्हा,  विष्णु आणि  महेश  (शंकर)  ह्यांची  दुर्मिळ  मूर्ति  कोरलेली  आहे. अजुनही  बरीचशी  देवस्थाने आहेत.
संताची तर  महान  परंपरा  ह्या  महाराष्ट्राला  लाभली  आहे.  संताच्या  बाबतीत  म्हणतात  की,  " संतकृपा  झाली  ।  इमारत  फळा  आली  ॥ १ ॥ ज्ञानदेवें  रचिला  पाया  ।  उभारिलें  देवालया  ॥ २ ॥ नामा  तयाचा  किंकर । तेणें  केलासे   विस्तार ॥ ३ ॥ जनार्दन   एकनाथें   । ध्वज  उभारिला  भागवत  ॥ ४ ॥  तुका  झाला  तेथें  कळस । भजन  करावें  सावकाश  ॥ ५ ॥"  संत गाडगे  बाबा , संत  जनाबाई, संता  सावता  माळी,  अशी   फार   मोठी   परंपरा   लाभली   आहे.   भक्तांची   तर   वारी  कधी  चुकतच   नाही.  असा  आहे देवा- धर्माचा  आदर करणारा महाराष्ट्र.
विरांचा महाराष्ट्र : देवा - धर्माचा आदर  करणारा  महाराष्ट्र  संकटकाळात  तितक्याच  कणखर  पणे  संकटांचा  सामना  करतो. "गोब्राम्हणप्रतिपालक  क्षत्रिय  कुलावांतास सिंहासनाधीश्वर  छत्रपती  शिवाजी  महाराज  कि  जय "  म्हटलं  कि,  अंगात  वीरश्री  संचारली  नाही;  असा  माणूस  महाराष्ट्रात  औषधालाही  सापडणार  नाही.  शिवाजी  महाराजांच्या  महान पराक्रमानंतर  पेशाव्यानी  लावलेले  अटकेपार  झेंडे,  मोघलंशी  केलेले  युद्ध, " स्वराज्य  हा  माझा  जन्म  सिद्ध  हक्क  आहे आणि  तो   मी  मिळवणारच. "  अशी  सिंह  गर्जना  करणारे  लोकमान्य  टिळक ," मेरी  झांसी  नाही  दुंगी  " हे  ठणकावून सांगणारी  राणी  लक्ष्मीबाई  हिचा  जन्म  हि  महाराष्ट्रातच  झाला.  आपल्या  मातृभूमीला  भेटण्यासाठी  आतुर  होऊन  समुद्र पार  करून  येणारे  विनायक  सावरकर  पण  ह्याच  मातीतले , ब्रिटिश  सरकार  ची वागणूक  बघून  पेटून  उठानारे वासुदेव  फडके हे ही ह्याच मातीने दिले. मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र करण्यासाठी जीवनदान दिलेले १०६ हुतात्मे,  स्वातंत्र्यानंतर ही देशाच्या सीमेचे रक्षण करणारे जवान असोत वा अलीकडेच मुंबई वर झालेल्या हल्ल्यात शहीद झालेले विजय साळसकर, हेमंत करकरे , अशोक कामटे असो (अजुनही बरीच नावे ह्या यादीत येतील )  हे सगळे वीर म्हणजे महाराष्ट्राच्या शौर्याची गाथाच आहे.

कलाकारांचा महाराष्ट्र : पूर्वीच्या काळात पंढरीची वारी आणि बारी अश्या दोनच गोष्टी इकडच्या जनतेला माहित. यातूनच सुरवात झाली महाराष्ट्राच्या लोकगीतांची आणि संगीताची ह्या गीताचा उगम बघायला गेला कि प्रथम आठवतं ते "जातं" . प्रश्न पडला ना "जात्याच " अन गाण्याचा काय संबंध तर पूर्वी पहाटे उठून बायका जात्यावर दळण दळत असत त्या वेळी त्यातून येणाऱ्या घराघरीच्या तालात आपले सूर मिसळून ओव्या म्हणत हाच खरा वाद्यांचा उगम होय. रहाटाने विहिरीतून पाणी काढताना होणारा आवाज, बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज ह्या तालावर गाणे बोलणारा शेतकरी राजा, मग पुढे भर पडली ती वासुदेवाच्या चिपळ्यांची. पहाटे ची कामे उरकून दारात सडा- सारवण करून सुंदरशी रांगोळी घालीत असतांना, आगमन व्हायचे ते वासुदेवाचे डोक्यावर मोरपिसाची टोपी हातात चिपळ्या आणि तंबोरा  अन अंगात बाराबंदी घातलेला हा वासुदेव ओव्या, पुराणातील कथा  ह्या गाण्यात गुंफून सांगत असे व माय - लेकी कडे भिक्षेची मागणी करत आणि त्याही दान करत. जसा जसा दिवस सरकत जाई तसे मग मंडळी कामात गुंतत अन रात्री देवळात भजन - कीर्तनाच्या कार्यक्रमाला जमत. पूर्वीच्या काळी रात्री सुरु होणारी हि भजने कधी - कधी पहाटे पर्यंत चालायची (तेव्हा आत्ता सारखे पोलिस दादा येत नव्हते ना! ये १० वाजले बंद करा ! ) तर मग टाळ-मृदुंग ह्यांच्या गजरात लोक मंत्रमुग्ध होत. इकडून मग वाद्यात भर पडली ती टाळ - मृदुंग,  तंबोरा.

 धनगर गीत (गाजा)
 आपली गुरे (गाई , शेळ्या मेंढ्या) चरायला नेताना त्याच्या गळ्यात वाजणाऱ्या घंट्याचा आवाज व सोबत असणारी बसारी ह्यांच्या तालावर गायली जात.

 कोळी गीत
कोळी गीत म्हटले कि प्रथम आठवते ती वेसावची पारू नाही का? पावसाळ्या नंतर मासे पकडायला जाताना आपल्या लाडक्या दर्याची पूजा करून " सण आयलाय गो नारळी पुनवेचा"  असा म्हणत आपल्या होड्या पाण्यात सोडतात. कोळी गीतं कोण विसरू शकेल का ?

 शौर्यगीत किंवा  पोवाडा
मैदानावर शौर्य गाजवून आल्यावर,  मैदानावर गजवालेल्या शौर्याची गाथा ही सामान्य जनतेला कळावी आणि त्याच इतिहासाने नवीन तयार होणारी पिढी हि धाडसी तयार व्हावी म्हणून शब्दात गुंफून आणि रंगवून सांगितली जायची. (आठवला ना मी शिवाजी राजे भोसले बोलतोय मधला पोवाडा! )

 लावणी
महाराष्ट्राच्या संस्कृती मधला सर्वात लावण्य प्राप्त दागिना म्हणजे लावणी. उत्तरेकडच्या राजांच्या कारामुकीसाठी चालवल्या जाणाऱ्या मुजाऱ्याला आतिशय लावण्याकरी भाषेत दिलेलं उत्तर म्हणजे लावणी होय. उत्तरे कडे मुजरा चालतो आणि महाराष्ट्र हि कलेमध्ये मागे नाही हे दाखवण्यासाठी चालू झालेली हि लावणी पुढे महाराष्ट्राची परंपरा बनली ( नटरंग मधल्या अप्सरेने हट्ट धरला ना मला जाऊ द्याना घरी चा ??)

 तमाशा
तमाशा म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची लोककला मानली जाते . तमाशा हा फारशी शब्द असला तरी त्याचा अर्थ मनोरंजन असा होतो ह्या प्रकार मध्ये ढोलकी, तुणतुणे , झांझ, डफ, हलगी (छोटा डफ ), कडे - लेझीम, हार्मोनियम, घुंगरू ह्या वाद्यांचा वापार केला जातो, तमाशा हि कला प्रामुख्याने महाराष्ट्रातील २ समुदायात अधिक प्रमाणात दिसून येतो ते म्हणजे कोल्हाटी व महार. हि कला प्रामुख्याने गावाच्या जत्रेत अधिक प्रमाणात सादर केली जाते.

दिंडी
हि एक महाराष्ट्रातील महान परंपरा आहे, मुख्यत: आषाढी व कार्तिकी महिन्यातील एकादशीला च्या वेळी विठ्ठल भक्त जी विठ्ठलाची गाणी गात मिरवणूक काढतात त्याला दिंडी म्हणतात.
 ह्या सगळ्यात हळूचपणे महाराष्ट्राची संगीत परंपरा घडत गेली. सुरवातीला संतानी सांगितलेली प्रवचने, देवळात होणारी भजने, नंतर घराघरात जात्यावर दळताना गायल्या जाणाऱ्या ओव्या, वासुदेवाचे सकाळच्या वेळातले प्रसन्न करणारे आगमन, ह्याच परंपरेत मग भर पडत गेली. प्रथमत: कवितांना चाली लावणे व त्या सुरात गाणे ह्याचेच पुढचे पाऊल म्हणजे भावगीते ( भावगीते म्हटली कि कानात स्वर गुंजू लागतात ते "मेंदीच्या पानावर" मधले ) अशी हि घराघरातून सुरु झालेली संगीत परंपरेला आज खूप मोठे स्वरूप प्राप्त झाले आहे. ह्या संगीत प्रवाह बरोबर वाद्यात हि बदल होत गेले. जात्याच्या घरघरी पासून, सुरु झालेल्या ह्या प्रवासात बैलाच्या घळ्यातल्या घंटा, टाळ, मृदुंग, तंबोरा, सतार, हार्मोनियम, तबला, वीणा, बासरी, पियानो, गिटार, ड्रम, ई. वाद्यांची भर पडतच गेली.

 बदलत्या काळाबरोबर जनजीवन आणि काम्रानुकीचे साधना पण बदलत गेली, पूर्वी घराघरात बायका गायाच्या, पंढरीची वारी आणि बारी, त्या नंतर चित्रपट आले ते पण जत्रेतचं बघायला मिळायचे. मग शोध लागला तो ग्रामोफोनचा मग सुरवातीला काही ठराविक लोकांकडे असलेले हे ग्रामोफोन सगळ्यांच्या घरात स्थानापन्न झाले. १९२७ साली All India radio ची स्थापना झाली व १९५७ साली त्याची आकाशवाणी असे नामकरण करण्यात आले आणि सुरु झाली एक नवी "मंगलप्रभात " ( मंगलप्रभात हा आकाशवाणी वर सकाळी प्रसारित होणार्या कार्यक्रमाचे नाव आहे ). १९५९ साली  अचानक एका पाहुण्याचे आगमन झाले आणि तो आपल्याच घरातील सदस्य बनला त्या बद्दल लिहायचे झाले तर " तबकड्या मध्ये तेवती निरांजने अन वाती नव्या Television ची कहाणी सांगते तुझी न माझी प्रीती " त्याचा नाव आहे आपल्या सगळ्यांचा लाडका tv  . मग १९९० ते १९९१ च्या काळात cable TV ची सुरुवात झाली. मग गेल्या २ ते ३ वर्षात DTH पण आले. त्याच बरोबर mobile phones , computer चे पण आगमन झाले.  पण आपल्या लाडक्या TV चे महत्व  कमी झाले नाही उलट तो संगणकाचा  वापर करून कसा बघू शकतो हा शोध लावला गेला आत्ता तर mobile मध्ये पण TV बघायची सोय केली आहे. ( काही माहिती द्य्वयाची राहिली असल्यास क्षमस्व: )

महाराष्ट्राबद्दल बोलायचे झाले तर अजय - अतुल ह्यांनी संगीत बद्ध केलेले हे गीत अगदी योग्य ठरते

हि मायभूमी, हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची  (2)
हा आमचा आहे बाणा, हि आमुची आहे बोली
अस्मानी झळके भव्य पताका भगव्या जरी पटक्याची
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || धृ ||
राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा
प्रणाम माझ्या घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा
भीमा, वरदा, कृष्ण - कोयना, भद्रा, गोदावरी
एक पणाचे भारती पाणी मातीच्या घागरी
योग्यांची अन संतांची, भक्तांची , माळक-याची 
हि देव, देश अन धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची
योद्धयांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची
देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खर्चणाऱ्यांची
हि भूमी सप्त सुरांची, रंगांची, अष्टकलांची. काव्याची,
शास्त्र - विनोदाची, हि भूमी साहित्याची.
महाराष्ट्र भूमी हि जन्मभूमी, हि कर्मभूमी आमची
महावंदनिय अतिप्राणप्रिय हि माय - मराठी आमुची || १||


जय महाराष्ट्र !!!!!!!!!!!!!!!!!!!!

~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

No comments:

Post a Comment