नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday, 29 December 2017

माझे वडील

Friends "HAPPY FATHER'S DAY ".   "वडील म्हणजे काटेरी फणसातले गोड गरे" हे title बघून थोडं आश्चर्य वाटले ना कि वडील आणि गोड गऱ्या सारखे? वडील तर किती खडूस असतात. ओरडतात , अभ्यास नाही केलं म्हणून मारतात पण अजिबात काळजी करत नाही. आई काशी चांगल - चांगलं खाऊ देते. प्रेमाने समजावते. आई म्हणजे ज्योत जी घराला प्रकाश देते; पण त्या ज्योतीला आधार देणाऱ्या समईला आपण सोयीस्कररित्या विसरतो. पण प्रत्यक्षात समईवरच जास्त ताण पडतो. हे आपण कधी लक्षातच घेत नाही. आई घराचे मांगल्य असते, तर वडील घराचे अस्तित्व असतात. आईच्या असण्याला किंवा आई होण्याला वडीलांमुळेच अर्थ आहे. पहिलटकरणीचे कौतुक होते; पण त्याच वेळी हॉस्पिटलच्या आवारात अस्वस्थपणे फेऱ्या घालणारे वडील कोण बघतच नाही.

आजारी पडल्यावर दिवसभर जवळ बसणारी आई दिसते पण ऑफिस मधून ४ वेळा phone करून तब्येत विचारणारे, 'जास्त बर नसेल तर डॉक्टर कडे घेऊन जा.' ' झोपला / झोपली का नीट त्रास होत नाही आहे ना ' म्हणून विचारणारे बाबा कधी आठवतच नाहीत. रात्री झोपेत आपल्याला थोडा जरी  त्रास झाला तर पटकन उठून बघणारे आणि आईला सांगणारे कि ," बघ गं काय झालाय ते"  असे बाबा . खाऊ देणारी आई दिसते पण तोच खाऊ कामावरून सुटल्यावर आठवणीने आणून आईकडे देणारे व सगळ्यांना सारखा दे म्हणून सांगणारे बाबा दिसतच नाहीत." पप्पा, मला नवीन बूट हवेत ! " असा हट्ट केला कि " ठीक आहे. बघू " बोलणारे आणि आपल्या नकळत आईकडे पैसे देताना बजावून सांगणारे कि " त्याला हवे ते बूट घेऊ दे . उगाच ओरडू नको मी माझ्यासाठी घेईन नंतर. " आपले बाबाच असतात.दिवाळीला नवीन कपडे घेताना " मी आत्ताच नवीन घेतलेत तेव्हा मुलांना नवीन कपडे घेऊया" म्हणून स्वत: जुने कपडे वापरून मुलांसाठी नवे कपडे, फटाके घेणारे आपलेच बाबा असतात ना. स्वत: काही न बोलता मुलांचा शिक्षणाचा खर्च, pocketmoney , कपडे, ई. सगळे कोणतीही अपेक्षा न ठेवता करणारे आपलेच बाबा असतात.  

कुठे पडलो किंवा खरचटले कि लगेच तोंडातून निघत "आई गं!" पण मोठ्या अपघातातून वाचलो कि " बाप रे!" असे उद्गार तोंडातून निघतात. कारण छोट्या संकटांसाठी आई आठवत असली तरी मोठी वादळे पेलताना बाबांची साथ लागते. आई रडते म्हणून तिचं दुख: दिसत पण बाबा रडत नाहीत तर संयमाने वागून पूर्ण परिस्थिती सावरतात दुख: त्यांना पण होत असतं पण ते दाखवत नाहीत.

माझे दादा पण अशेच आहेत. दादा म्हणजे माझे वडील मी त्यांना दादा म्हणते. खरं तर ते घरात सगळ्यात मोठे त्यामुळे सगळे त्यांना दादा हाक मारत त्यामुळे आम्ही पण दादा हाक मारायला शिकलो. आज मी हा ब्लोग लिहिती आहे ना तो पण त्यांच्या मुळे, त्यांनी मला ब्लोग लिहायला अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिले आहे ( अप्रत्यक्षपणे कारण त्यांना माहित पण नाही मी हा ब्लोग लिहिते पण माझी लेखनकला हि त्यांची देणगी आहे.) असा म्हटलं जाता कि आई हि प्रथम गुरु असते पण मी गर्वाने सांगते कि माझे दादा माझे  प्रथम गुरु आहेत. त्यांच्या मुळे मी एक वक्ती होऊ शकली. आज पर्यंत खूप वक्तृत्व स्पर्धा केल्या काहींमध्ये बक्षिसे पण मिळाली. वयाच्या ३ वर्ष्या पासून ह्या स्पर्धा करते आहे. ह्याचा श्रेय माझ्या दादांना जातं. त्यांच्या मुळे मला लेखन करण्याची पण सवय लागली. माझे दादा म्हणजे एक अजब रसायन totally unpredictable पण तरीही मनाने श्रीमंत दारात शत्रू जरी उभं राहिला तरी त्यःच्या स्वागताला धावून जाणारे.  हेच संस्कार आमच्यातही उतरवले आणि आम्हाला कळलं पण नाही.

माझ्या लहान पाणी मी आई- दादांसोबत झोपायची तेव्हा light कोण घालवणार म्हणून माझ्याशी खोटं- खोटं भांडणारे दादा आजही आठवतात पण आत्ता भांडायला मिळत नाही ( कारण बेडरूम वेगळी केली ना) आता मोठी झाली ना! पण आजही त्यांच्या सोबत "TOM & JERRY" बघताना केलेली "TOM & JERRY" सारखी केलेली मस्ती लहानपणाची आठवण करून देते. आम्ही दोन्ही भावंड म्हणजे मी आणि माझा भाऊ दोघे पण दादांजवळ जास्त असतो काही काम असले तरी दादा. आई तर सांगते कि generally लहानपणी मुलं आईच्या नावाने रडतात. मी तर तशी पण खूप कमी रडायची ती पण दादांच्या नावाने.


"HAPPY FATHER'S DAY "
~●๋•ηινє∂ιтα ραтιℓ ●๋•

No comments:

Post a Comment