नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

तुरडाळ वितरणाचा लाभ घ्यावा - पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : शिधापत्रिका धारकांना रास्त भाव दुकानामधुन 55 रुपये प्रति किलो याप्रमाणे एक किलो तुरडाळीचे वितरण केले जात आहे. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिका धारकांनी तुरडाळ वितरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे बोलताना केले.

रास्त भाव दुकानातून तुरडाळ वितरण योजनेचा शुभारंभ सावंतवाडी सालईवाडा येथे करण्यात आला. याप्रसंगी पालकमंत्री श्री.केसरकर बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बबनराव सालगावकर, उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी नितीन राऊत, तहसिलदार सतीश कदम, रुपेश राऊळ, शब्बीर मणियार, जि.प. सदस्य मायकल डिसुझा आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रत्येक शिधापत्रिकाधारकांनी या तुरडाळ वितरणाचा लाभ घ्यावा. शिधापत्रिकाधारकांना अधिकची तुरडाळ आवश्यक असेल तर संबंधित दुकानात मागणी नोंदवावी त्यांना तुरडाळीचा पुरवठा केला जाईल असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, यंदा तुरडाळीचे विक्रमी उत्पादन झाले. शेतकरी बांधवांचे नुकसान होऊ नये यासाठी शासनाने तूरडाळ खरेदी करुन रास्त भाव दुकानाद्वारे विक्री करण्याचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. या योजनेस उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्यास इतर धान्याबाबतही असा निर्णय होणे शक्य होईल. सिंधुदुर्गासाठी 235 मेट्रीक टन तूरडाळीचा साठा उपलब्ध असून जिल्ह्यातील 2 लक्ष 35 हजार शिधापत्रिकाधारकांना याचा लाभ होणार आहे.

प्रारंभी तहसिलदार सतिश कदम यांनी स्वागत केले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री.राऊत यांनी योजनेची माहिती दिली. समारंभास सावंतवाडी शहरातील नगरसेवक, नगरसेविका व सलाईवाडा परिसरातील नागरिक उपस्थित होते.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment