नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

आंगणेवाडी यात्रेपूर्वी सर्व मुलभूत सुविधा पूर्ण कराव्यात - पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : आंगणेवाडी यात्रा 27 जानेवारी रोजी आहे. या यात्रेपूर्वी आंगणेवाडीकडे जाणारे सर्व रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुविधा, विद्युत व्यवस्था, बी.एस.एन.एल.ची संपर्क यंत्रणा सक्षम करणे, आरोग्य सुविधा, एस.टी. वाहतूक या सर्व मुलभूत सुविधा यात्रेपूर्वी पूर्ण कराव्यात, अशी सूचना पालकमंत्री दीपक केसरकर यांनी येथे आयोजित बैठकीत केली.

जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित सभेस खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, जिल्हाधिकारी उदय चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षीतकुमार गेडाम, आंगणेवाडी ग्रामस्थ संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आंगणेवाडीसाठी स्वतंत्र व कायम स्वरुपी पिण्याच्या पाण्याची योजना प्रस्तावित करण्याची सूचना करुन पालकमंत्री श्री.केसरकर म्हणाले की, बी.एस.एन.एल. विभागाने टॉवरची क्षमता वाढवावी, एस.टी. विभागाने रेल्वे स्थानकावर कक्ष कार्यान्वित करण्याबरोबरच रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे एस.टी. बसेसची व्यवस्था करावी, सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाने आंगणेवाडीकडे जाणाऱ्‍या सर्व रस्त्यांची डागडुजी यात्रेपूर्वी पूर्ण करावी, आवश्यक ठिकाणी दिशादर्शक फलक लावावेत, हेलीपॅडची सुविधा अधिकची हवी असल्यास तशी कार्यवाही करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

आंगणेवाडी यात्रेच्या वेळी आंगणेवाडी येथे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे आयोजन अधीक्षक कृषि अधिकारी व संबधित विभागाने निट-नेटके करावे, असेही यावेळी पालकमंत्री श्री.केसरकर व खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment