नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

तलाठ्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील - पालकमंत्री दीपक केसरकर


सिंधुदुर्ग : तलाठ्यांच्या अनेक वर्षापासून प्रलबिंत असलेल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करेन, असे आश्वासन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी काल तलाठी त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये केले.

रत्नागिरी - सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ त्रैवार्षिक अधिवेशन सावंतवाडी येथील डी.के. टुरिझम माजंगाव येथे आयोजित केले होते यावेळी ते बोलत होते. या अधिवेशनास रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एच.व्ही. गवस, उपाध्याक्ष एस.जी. जाधव, एन.जी. बांवरकर, सरचिटणीस ङि एम.पाटील, खजिनदार व्ही.एस. कोदे आदी उपस्थित होते.

तलाठी हे पद आपल्या सर्वांचे अत्यंत जिव्हाळाचे आहे. तलाठ्यांचे काम मी जवळून पाहिले आहे. तलाठ्याच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहे. त्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक आहे. तसेच मंडळ अधिकारी यांच्यासाठी प्रत्येक सर्कल ठिकाणी कार्यालय उभारणीच्या कामास मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करीन. कनेक्टव्हिटीची समस्या असल्यामुळे सातबारा अपडेट करण्यासाठी खूप वेळ जात आहे. त्यामुळे नागरिकांना सुविधा मिळत नाही. यासाठी रत्नागिरी - सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यासाठी स्वंतत्र सर्व्हर घेण्याबाबत प्रयत्न करेन, असे त्यांनी यावेळी सांगितले.

या त्रैवार्षिक अधिवेशनासाठी रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाठी संघटनेचे पदाधिकारी तसेच तलाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
source:महान्यूज

No comments:

Post a Comment