नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी प्रत्येक तालुक्यात ग्रंथालय - पालकमंत्री दीपक केसरकर

सिंधुदुर्ग : स्पर्धा परीक्षा देणाऱ्‍या इच्छुक विद्यार्थ्यांसाठी माहिती मिळावी, परीक्षांसाठी मार्गदर्शन मिळावे, स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त पुस्तके वाचनासाठी मिळावित यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रंथालय सुरु करण्यात येतील, अशी घोषणा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी कुडाळ येथे स्पर्धा मार्गदर्शन शिबीर उद्घाटनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात केली.

कुडाळ येथील सिद्धीविनायक हॉल येथे अखिल भारतीय भंडारी महासंघ व सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परीक्षांची पूर्व तयारी व मार्गदर्शन शिबीराचे उद्घाटन पालकमंत्री श्री.केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार वैभव नाईक, अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, जिल्हा संघाचे अध्यक्ष अतुल बंगे, डॉ.सतीश नारिंग्रेकर, गोवा राज्य इतर मागासवर्गीय समितीचे अध्यक्ष अनिल होबले, जि.प. सदस्य संजय पडते आदी मान्यवर उपस्थित होते.

लातूर पॅटर्न महाराष्ट्रात गाजला. गेल्या काही वर्षाची गुणवत्ता यादी पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यानेही दहावी व बारावी गुणवत्ता यादीत राज्यात आघाडी घेतली आहे. आता गतवर्षी तर अकरा विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळविले आहेत असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, नजिकच्या काळात सावंतवाडी येथे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरु होत आहे. या केंद्रातून जिल्ह्यातील मोठ्या हायस्कुल व महाविद्यालयांना इंटरनेट कनेक्टव्हिटीद्वारे जोडून स्पर्धा मार्गदर्शन केंद्राचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत - जास्त विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न आहे. या शिबीरासाठी विद्यार्थ्यांची लक्षणीय उपस्थितीचा उल्लेख करुन ते म्हणाले की, 2020 साली भारत तरुणांचा देश होणार आहे. आपल्याला जगाच नेतृत्व करायचे आहे. गुणवत्ता यादीत चमकणाऱ्‍या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांचा नेटाने सराव करावा. तथापि मार्क कमी मिळालेल्या विद्यार्थ्यांनी नाराज न होता. पर्यटन पूरक व्यवसाय उद्योग उभारण्याबरोबरच पर्यटनातून रोजगाराच्या संधी मिळविण्यासाठीही प्रयत्नशील रहावे असे आवाहन केले. छत्रपती शिवरायांच्या नौदलात भंडारी समाजाच योगदान महत्वपूर्ण व मोलाचे होते. तद्वत्च राज्याच्या व जिल्ह्याच्या विकासात या समाजाने योगदान द्यावे. भंडारी समाज श्रेष्ठींनी महासंघाच्या माध्यमातून सुरु केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी यावेळी कौतुक केले.

यावेळी बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले की, दहावी- बारावी गुणवत्ता यादीत सिंधदुर्गाच यश राज्यात लक्षणीय आहे. भंडारी समाज महासंघाने स्पर्धा परीक्षेसाठी समाजातील मुलांसाठी सुरु केलेल्या हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. राज्यात सुमारे साडेचार लक्ष विद्यार्थी- विद्याथ्यींनी स्पर्धा परीक्षेला बसतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी मागदर्शन शिबिराचा लाभ घेऊन स्पर्धा परीक्षेला बसतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महासंघाचे अध्यक्ष नाविनचंद्र बांदिवडेकर यांनी त्यांच्या मार्फत गुणवत्ता यादीत शंभर टक्के गुण मिळविल्या बद्दल यावेळी उपस्थित मान्यवरांचे हस्ते कुमारी महिमा गणेश बागायतकर व कुमारी अर्पणा दत्तात्रय चिपकर या गुणवंत विद्यार्थ्यींनीना लॅपटॉप वितरीत करण्यात आले. प्रारंभी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर यांनी प्रास्ताविकात शिबीराचा हेतू विशद केला. यावेळी मान्यवरांचे हस्ते सरस्वती व शिवप्रतिमा पूजन करण्यात आले.

सभारंभास शेखर गंवडे, मामा माडिये, गुरुनाथ पेडणेकर, रमण वायंगणकर, संघाचे तालुकास्तरीय अध्यक्ष व पदाधिकारी शिक्षक, पालक व विद्यार्थीं- विद्यार्थ्यींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment