विधानसभा प्रश्नोत्तरे :
नागपूर : राज्यातील ट्रॉमा केअर सेंटरची रचना बदलण्याची आवश्यकता असून त्यामध्ये न्युरोलॉजिस्ट, फिजिशियन, न्युरो सर्जन, रेडिओलॉजिस्ट यांची नेमणूक करुन ते परिपूर्ण करण्यासाठी मंत्रिमंडळाकडे प्रस्ताव सादर करण्यात येईल. डॉक्टरांचे वेतन वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रॉमा केअर सेंटर कार्यान्वित करण्यासह जिल्हा व उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना आरोग्यमंत्री म्हणाले की, सिंधुदुर्गसह राज्यातील डोंगरी भागात डॉक्टरांची कमतरता जाणवत आहे. डॉक्टरांची वेतनवाढ करण्याची आवश्यकता असून सध्या राज्यात जे विशेषज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांना 70 हजार रुपये किमान वेतन आणि प्रति शस्त्रक्रिया चार हजार रुपये अशा पद्धतीने दीड लाख रुपयांचे पॅकेज देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
जे डॉक्टर सातत्याने गैरहजर आहेत त्यांना बडतर्फ करण्याची प्रक्रिया सुरु आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अशा सातत्याने गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांवर देखील बडतर्फीची कार्यवाही केली जाणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या पावसामुळे लेप्टोच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली आहे. या भागात लेप्टोचे 87 रुग्ण आढळून आले असून डेंग्यूचे 55 तर माकड तापाचे 204 रुग्ण आढळले आहेत. लेप्टोसाठी डॉक्सिसाक्लॉन गोळ्यांचे वाटप करण्यात आले असून, माकड तापासाठी तीन टप्प्यात लस देण्यात येत आहे. आतापर्यंत 50,957 जणांना लस देण्यात आली असून, 32,000 जणांनी दुसऱ्या टप्प्यातील लस घेतली आहे.या लसीचे 70 लाख डोस प्राप्त झाले असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओरोस, सावंतवाडी आणि कणकवली या तीन ठिकाणी ट्रॉमा केअर सुरु आहेत. तळेरे येथे ट्रॉमा केअर प्रस्तावित असून जागेअभावी ते अद्याप सुरु नसल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री अजित पवार, वैभव नाईक यांनी भाग घेतला.
निगडे पाझर तलाव फुटून शेतीचे नुकसान झाल्यामुळे उपअभियंता-शाखा अभियंता निलंबित :
जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांची माहिती
निगडे जिल्हा पुणे येथील पाझर तलाव फुटून शेतीचे झालेल्या नुकसानाबद्दल संबंधित उपअभियंता व शाखा अभियंता यांना निलंबित करण्यात येईल. त्याचबरोबर पाझर तलावाचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकले जाईल, असे जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य संग्राम थोपटे यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना प्रा. शिंदे म्हणाले की, हा पाझर तलाव फुटल्याने 41 शेतकऱ्यांचे तीन लाख 87 हजार 473 रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आल्या आहेत. ठेकेदारावर 89 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाची मुख्य अभियंत्याच्या माध्यमातून ठेकेदाराची चौकशी केली जाईल. यावेळी झालेल्या चर्चेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अजित पवार, राहुल कुल यांनी भाग घेतला.
महाराष्ट्राचे पाणी गुजरातला जाणार नाही - जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांची माहिती
महाराष्ट्राचे संपूर्ण पाणी राज्यालाच मिळत आहे. गुजरातला पाण्याचा थेंबही जात नाही, असे जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सदस्य अतुल भातखळकर यांनी राज्यातील दमणगंगा-पिंजाळ व पार-तापी-नर्मदा नदीजोड प्रकल्प पूर्ण करण्याबाबत प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना श्री. महाजन म्हणाले की, दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प मुंबई शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी असून त्या माध्यमातून मुंबईला 20.44 टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठी चार योजना प्रस्तावित असून त्यासाठी 10 हजार 881 कोटी रुपये केंद्र शासनाकडून मिळावे, अशी मागणी राज्य शासनामार्फत करण्यात आल्याचे श्री. महाजन यांनी सांगितले.
या प्रकल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्राचे पाणी महाराष्ट्रालाच उपलब्ध होणार असून गुजरातला पाणी दिले जाणार नाही, असे श्री. महाजन यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतीश पाटील, जयंत पाटील यांनी भाग घेतला.
राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर ॲक्टिव्ह ट्रॅकर बसविणार नाही - आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत
राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर ॲक्टिव्ह ट्रॅकर बसविण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन नाही, असे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, सदस्य सर्वश्री अमीन पटेल, पृथ्वीराज चव्हाण यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला लेखी उत्तर देताना आरोग्यमंत्री यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाने संचालक पीसीपीएनडीटी यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेल्या तज्ज्ञांच्या समितीची नवी दिल्ली येथे बैठक झाली होती. त्यामध्ये ॲक्टिव्ह ट्रॅकर हे लिंग निदान प्रक्रियेस आळा घालण्यास उपयुक्त नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे राज्यातील सोनोग्राफी सेंटरवर अशा प्रकारची यंत्रे बसविण्यात येणार नाहीत.
Source:महान्यूज

No comments:
Post a Comment