नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

शेतकऱ्‍यांना जमिनीचा मोबदला देतांना सकारात्‍मक भूमिका ठेवावी - विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी



पुणे : सर्व विकास प्रकल्‍प पूर्ण होण्‍याच्‍या दृष्टीने नियमाच्‍या चौकटीत राहून शेतकऱ्‍यांना जमिनीचा मोबदला देतांना सकारात्‍मक भूमिका ठेवावी, अशा सूचना विभागीय आयुक्‍त चंद्रकांत दळवी यांनी दिल्‍या. विधानभवनात भूसंपादन अधिनियम 2013 या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते.

विभागीय आयुक्‍त श्री.दळवी म्‍हणाले, विकास प्रकल्‍प राबवतांना शेतकऱ्‍यांची जमीन संपादित करावी लागते. भूसंपादन मंडळाने शेतकऱ्‍यांच्‍या जमिनीचा मोबदला देतांना उदार दृष्टिकोन ठेवावा. जमिनीचा मोबदला वेळेत दिला नाही तर प्रकल्‍पाचा खर्च वाढून किंमत वाढते. त्‍यामुळे भूमीसंपादन, पुनर्वसन व पुनर्स्‍थापना करताना भूसंपादन मंडळाने शेतकऱ्‍यांना जमिनीच्‍या मोबदल्‍यात वाजवी भरपाई मिळण्‍याबाबत जागरुक रहावे. जेणेकरुन प्रकल्प वेगाने मार्गी लागतील. भूसंपादन अधिनियमाच्‍या कार्यशाळेत या बाबींवर व्‍यापक चर्चा होऊन ही प्रक्रिया अधिक गतिमान होईल, अशी आशा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. नवीन भूसंपादन कायदा पारदर्शक असून शेतकऱ्‍यांच्‍या हिताचा आहे. भूसंपादन मंडळाने लवादाच्‍या प्रकरणांचा वेगाने निपटारा करावा, असे ते म्‍हणाले. कार्यशाळेत मुंबई मेट्रो रेल्‍वेचे समीर कुर्तकोटी, सेवानिवृत्‍त नगररचनाकार मोहन वाणी, अपर जिल्‍हाधिकारी साहेबराव गायकवाड, अपर्णा ताम्‍हणकर, सुभाष डुंबरे, सहायक सरकारी वकील नितीन देशपांडे, अॅड.सुधाकर आव्‍हाड, रामचंद्र शिंदे आदींनी मार्गदर्शन केले तसेच उपस्थित करण्‍यात आलेल्‍या प्रश्‍नांचेही समाधान केले.

कार्यशाळेस उपजल्हिाधिकारी (भूसंपादन), जिल्‍हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. कार्यशाळेचे सूत्रसंचालन विशेष भूसंपादन अधिकारी स्‍नेहल बर्गे यांनी केले.
 
source:महान्यूज

No comments:

Post a Comment