नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

परिचय केंद्र हे अधिकृत माहितीचे स्त्रोत- दयानंद कांबळे

गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली : अधिकृत माहितीचे स्त्रोत म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राकडे बघितले जात असल्याचे कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना सांगितले.

यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील पत्रकारीता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी उपसंचालक श्री.कांबळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजधानी दिल्लीत महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राकडून कसे केले जाते याविषियी श्री.कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख बालाजी लाभशेटवार यांच्यासह प्राध्यापक लक्ष्मीकांत नंदपवार, प्राध्यापक संतोष मुडे, प्राध्यापक सिद्धेश्वर जगताप उपस्थित होते.

यावेळी झालेल्या अनौपचारिक चर्चेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती उपसंचालकांनी दिली. यामध्ये दैनंदिन कामकाजात केंद्र शासनाशी, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे महाराष्ट्रातील खासदारांशी तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणाऱ्या समन्वयाबाबत माहिती दिली. यासह दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा संपर्क परिचय केंद्राद्वारे करण्यात येणारा समन्वय, राबविण्यात येणारे विविध अभिनव उपक्रम आदींची माहिती श्री.कांबळे यांनी दिली.

महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युट्युब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटस्ॲप ग्रुप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारा शासनाचा जनसंपर्क तसेच प्रसिद्धविषयीही श्री.कांबळे यांनी यावेळी माहिती दिली. यावेळी विविध सामाजिक माध्यमांसाठी वैविध्यपूर्ण लिखाणाबाबत श्री.कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली. माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी शासनाच्या प्रतिमेनिर्मितीसाठी कार्यालयाकडून राबविण्यात येणाऱ्‍या उपक्रमांबाबते सादरीकरण केले.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment