नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday, 27 December 2017

मुख्यमंत्र्यांनी घेतली माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची भेट

नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांची सदिच्छा भेट घेतली.

नुकताच, श्री. वाजपेयी यांचा 93 वा वाढदिवस साजरा झाला. या पार्श्वभूमीवर, श्री. फडणवीस यांनी श्री. वाजपेयी यांच्या 6 ए- कृष्णमेनन मार्ग या शासकीय निवासस्थानी आज सदिच्छा भेट दिली आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी राज्याचे महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या उभय नेत्यांनी श्री. वाजपेयी यांचे आशिर्वाद घेऊन वाजपेयी यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चर्चा केली. यावेळी श्री. वाजपेयी यांच्या आठवणीना उभय नेत्यांनी उजाळा दिला.

श्री वाजपेयी यांच्या सार्वजनिक तसेच राजकीय जीवनातील विविध आठवणी व किस्से यांची यावेळी चर्चा झाली. श्री. फडणवीस यांची सार्वजनिक व राजकीय जीवनातील वाटचाल व श्री. वाजपेयी यांचा लाभलेला आशिर्वाद व मार्गदर्शन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

मुख्यमंत्री यांनी दिला बालपणीच्या आठवणींना उजाळा

या चर्चेदरम्यान, श्री. फडणवीस यांच्याकडे असलेले श्री.वाजपेयी यांच्या सेाबतचे बालपणीचे दुर्मिळ छायाचित्र कुटुंबियांना दाखविले. कुटुंबियांना याचा अत्यानंद झाला. श्री. फडणवीस यांच्या बालपणात झालेल्या श्री. वाजपेयीसोबतच्या भेटी संदर्भात चर्चाही रंगली.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment