नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

जगातील सर्वांत सुखी माणसे

एकदा कॉलेजचे काही मित्र अनेक वर्षानंतर भेटतात.

ते सर्वजण आपल्या करियर मध्ये खूप चांगले कार्य करत असतात आणि भरपूर पैसे कमावत असतात.
एकमेकांशी बोलत असतांना खूप वेळेनंतर ते त्यांच्या कॉलेजचे सर्वांत आवडते प्रोफेसर यांना भेटण्याचे ठरवतात.
प्रोफेसरांच्या घरी गेल्यानंतर ते प्रोफेसर त्या सर्वांचे स्वागत करतात आणि सर्वांना त्यांच्या करियरबद्दल विचारतात.
हळुहळूगप्पा रंगतात आणि त्यादरम्यान ते जीवनात येणाऱ्‍या अडचणी आणि कामात येणारा तणाव याविषयी चर्चा करतात.

सर्वजण या मुद्दयाशी सहमत असतात की,जरी आपण आर्थिक स्थितीने मजबूत असलो तरी पण आपण पुर्वीच्या आयुष्यासारखे आता सुखी नाही.

ते प्रोफेसर सर्वांचे बोलणे खूप लक्ष देऊन ऐकत असतात...
आणि मग ते अचानक किचनमध्ये जातात आणि थोड्या वेळाने परतल्यावर सर्वांना म्हणतात की,
मी सर्वांसाठी कॉफी आणली आहे पण तुम्ही किचनमध्ये जाऊन एक-एक कप स्वतःसाठी घेऊन या...
सर्वजण किचनमध्ये जातात.तिथे अनेक प्रकारचे कप असतात.
आपल्या आवडीप्रमाणे ते सर्वजण कप घेऊन येतात.
मग ते प्रोफेसर कॉफी देतात आणि म्हणतात की,
"तुम्ही सर्वांनी चांगला जो कप किंमतीने महाग आहे तोच निवडला.जे कप साधारण आहेत त्या कपांकडे तुम्ही लक्ष दिले नाही.
जेव्हा एकीकडे आपण स्वतःसाठी चांगली इच्छा मनात ठेवतो तर दुसरीकडे हीच इच्छा आपल्या जीवनात अडचणी आणि तणाव आणत असते.
हे तर निश्चित आहे की,
कॉफीच्या क्वालिटी मध्ये कोणताच बदल होणार नाही.हा तर एक प्रकार आहे की,ज्याच्या माध्यमामधुन आपण कॉफी पित असतो.
तुमची खरी इच्छा कॉफी पिण्याची होती,
कपाची नाही.

तरीपण सर्वांनी चांगले आणि महागच कप निवडले.
आणि आपला कप निवडल्या नंतर तुम्ही
दुसऱ्‍यांच्या कपाकडे लक्ष दिले.
सर्वांनीच जरी कोणतेही कप निवडले असते तरी कॉफीची चव बदलली नसती.

तात्पर्य— आपले जीवन हे कॉफीसारखेच आहे.
आपली नोकरी,पैसा व परिस्थिती हे सर्व कपांसारखे फक्त जीवन जगण्याचे साधने आहेत खरं जीवन नाही.
म्हणून कॉफीची चिंता करा कपाची नाही.
जगातील सर्वांत सुखी माणसे ती नसतात ज्यांच्याकडे सर्व काही इतरांपेक्षा अधिक चांगलं असतं तर ते सुखी असतात की जे त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक गोष्टीचा चांगला उपयोग करतात...!
म्हणून साधेपणाने जगा.
सर्वांशी प्रेमाने वागा.
सर्वांची काळजी घ्या....

No comments:

Post a Comment