नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

नशिबाला कुणाच्या हसू नये

नशिबाला कुणाच्या हसू नये..
नशिब कुणी विकत घेत नाही,
वेळेचे नेहमी भान ठेवावे..
वाईट वेळ सांगून येत नाही..!
बुद्धी कितीही तल्लख असली..
नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
बिरबल बुद्धीवान असला..
तरीही तो राजा होऊ शकला नाही..!
एक दुसर्यासाठी जगणे..
याचेच नाव जीवन असते,
म्हणूनच वेळ त्यांना देणे..
ज्यांचे तुमच्यावर प्रेम असते..!
नाती तागडीत तोलू नये..
पैश्याची ती गुलाम नसतात,
नात्यात फायदा बघू नये..
ती तुम्हाला श्रीमंत करतात..!
तुमच्याकडे मारुती असो वा BMW..
रस्ते त्यांचे एकच असतात,
मनगटाला TITAN वा ROLEX असो..
वेळ एकच दाखवत असतात..!
मोबाईल APPLE असो वा SAMSUNG..
तुम्हाला फोन करणारे बदलत नसतात,
Economy आणि Business Class..
प्रवासाला वेळ सारखाच घेतात..!
श्रीमंतीचे प्रदर्शन करण्यात..
अर्धी श्रीमंती खर्चून जाते,
कमाई कमी जास्त असली तरी..
जेवणात पोळी एकाच आकाराची असते..!
आयुष्य खूप सुंदर आहे..
एकमेकांना समजून घ्या..!!

No comments:

Post a Comment