नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

नाना पाटेकरयांचा शेयर केलेला लेख

हल्ली महाराष्ट्रात एक फॅशन आलीय स्वतःला शिवप्रेमी म्हणवून घेण्याची.पण हा शिवप्रेमी म्हणजे नक्की कोण असावा?राजकारणासाठी शिवरायांचे नाव वापरणारा?स्वतःच्या गाडीवर महाराजांचे चित्र लावणारा अन त्यावर चिखलाचा अभिषेक करणारा?स्वतःच्या हातावर महाराजांचे गोंदण काढणारा?गळ्यात शिव मुद्रेचे लॉकेट घालणारा की मग हातात मुद्रेची अंगठी घालणारा?माझ्या मते हे सगळे भुरटे शिवप्रेमी आहेत यांना फक्त प्रदर्शनात आनंद आहे.

महाराज म्हणाले की आजही गवताची पाती बोलू लागतात मग मराठीशांत राहु शकत नाही ना..मग सोशल मिडियावर लाइक अणि कमेंट च्या भिकेसाठी वापरले जातात महाराज.मुळात शिवप्रेमी हा शब्दच मला न पटणारा आहेप्रेमी कसले?

झाडाखाली किंवा झुडपात प्रेम करणारे का?लुंग्या सुंग्या भुरट्या भगवी कपडे घालून फिरणाऱ्या भोंदू बाबांचे तुम्ही अनुयायी किंवा भक्त होता आणि इकडे प्रेमी?

शिवाजी हां विषय मुळात प्रेम करण्याचा किंवा देवळात राजांना बसवून त्यांच्या पूजा अर्चा करण्याचा नाही.शिवाजी हा विषय स्वतःच्या क्षेत्रात सर्वोत्तम बनून सर्वांना अचंबित करुन सोडेल असा इतिहास घडवू शकणाऱ्या आणित्याला प्रेरणा देणाऱ्या तरुणाला मार्गदर्शक म्हणून उभा राहील असा आणि पाठिंब्याला सह्याद्री बनून उभा राहणारा आहे.तुम्ही मराठी आहात.. महाराष्ट्रात जन्माला आलात. तुम्ही या मातीत वाढला म्हणून तुम्ही शिवप्रेमी म्हणवून घेऊ नका.आपण शिवरायांचे कोणीतरी लागतो आणि आपल्याला शिवरायांचे कोणीतरी आहोत असे दाखवायचे असेल तर गड-किल्ल्यांना भेट द्या.. तिथला कचरा उचलापिणारे जाग्यावर ठेचा.. प्रेयसीला तिथे झुडपा आड़ नेण्यापेक्षा बुरुजावर उभा राहून सहयाद्रिला साद घालायलाप्रवृत्त करा तरच तिच्या पोटी तुम्हाला अभिमान वाटेल असा कोणी जन्माला येईल अन्यथा नव्हे ते काम ऐरा गबाळ्याचे.सामाजिक बांधीलकी जोपासा आणि स्वतःला शक्य तसे समाजकार्य करा.. समाजकार्य म्हणजेच शिवकार्य..आणि शेवटचे पण महत्वाचे शिवजयंती एक उत्सव म्हणून साजरी करा आणि हे विचारांचं आणि संस्कृतीचे सोने पुढच्या पिढीलाहस्तांतरित करा....आणि नुसते शिवरायांबद्दलचेmsgs पाठवत बसू नका तर स्वतःला सिद्ध करून दाखवा तर तुम्हाला खरे शिवराय समजतील.

No comments:

Post a Comment