नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

मी व्यवसाय का करावा ?

थोडा त्रास होइल वाचण्यासाठी पण

आवर्जुन वाचा. . . प्रेरणा नक्की मिळेल.

आज बहुतांशी लोकांना असे वाटते की एक मोठ्या पगाराची नोकरी असावी, कारण साधारण आठ तासाच्या नोकरी मधे एक फिक्स पगार मिळत असतो आणि रिस्क पण कमी असते, पण
एक तात्विक विचार केला तर ज्या ठिकाणी आपण नोकरी करत असतो त्या व्यवसायाचा मालक स्वतःच्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने व्यवसाय चालवत असतो आणि आपण मात्र
तीथे नोकरी करत असतो !

तुमच्या कड़े जर जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर स्वतःचा व्यवसाय चालू करुण एक अनोखे विश्व तुम्ही निर्माण करू शकता. पण एक लक्षात असू दया व्यवसाय करणे हे काम सोपे
नाही कारण त्यासाठी मनाची तयारी हवी, मेहनत करण्याची इच्छा हवी आणि सतत व्यवसाय वाढीसाठी धडपड करण्याची तयारी हवी.

आज बरेचशे युवक सुशिक्षित आहेत पण नोकरी मिळत नसल्याने घरी बसून आहेत. आज बरेचशे युवक आहेत त्यांना व्यवसाय चालू करण्याची तीव्र इच्छा आहे पण कोणता व्यवसाय चालू
करायचा किंवा व्यवसाय कसा चालू करायचा आणि व्यवसायासाठी पैसा कुठून उभा करायचा अशा अनेक प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळे हे युवक घरीच बसून आहेत.

परिणामी आजची तरुण पिढ़ी निरशेपोटी चुकीच्या मार्गाला जात आहे. नैराश्य आणि कमी झालेला आत्मविश्वास याच्यामुळे ही पिढ़ी गुन्हेगारी आणि आत्महत्या अशा प्रवृत्ती कड़े वळू लागली आहे.

आजचे बरेचशे पालक व्यवसायातील धोक्याचा आणि तोटयाचा विचार करुण मुलांना मोठेपणी चांगले शिक्षण घेवून एक मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी आग्रही असतात पण तो आपला
मुलगा किंवा मुलगी एक बिजनेसमैन किंवा बिज़नसवूमन होईल यासाठी अजिबात प्रयत्न नाही करत.
पालक आपल्या अपूर्ण इच्छा आकांशा मुलांवर लादतात आणि आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी नोकरी कडे बोट दाखवतात. आज समाजामध्ये नोकरीला खूप प्रतिष्ठा आहे, आमचा मुलगा
अमुक ठिकाणी कामाला आहे, आमच्या मूलाला एवढा पगार आहे असे बरेच पालक सांगत असतात . पण,
असे काही मोजकेच पालक असतात की जे ज्या क्षेत्रातमध्ये आपल्या पाल्याने शिक्षण प्राप्त केले आहे त्या क्षेत्रात काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने मुलांना व्यवसायासाठी प्रोत्साहन देतात,

फारच कमी असे पालक असतात की जे अंबानी, टाटा, किर्लोस्कर, मित्तल, बजाज व डी.यस. कुलकर्णी यांचे उदहारण देवून व्यवसायामधे मुलांचे मन घट्ट करतात.

मित्रहो तुम्हाला व्यवसायामधे उतरायचे असेल तर मनाशी एक दॄढ़ निश्चय असावा, व्यवसाय करू की नोकरी करू अशी द्विधा मनःस्थिति असेल तर व्यवसाय न केलेला बरा, कारण आपण
आपल्या निर्णयाशी ठाम नसाल तर व्यवसायामधे यश मिळणे खूप कठीन आहे, कदाचीत व्यवसायामध्ये सुरवातीला जर तुम्हाला अपयश आले तर नोकरी केली असती तर बरे
झाले असते अशी तुमची मानसीक स्थिती होईल.

मी काही तरी नवीन करणार हे ध्येय असेल आणि व्यवसायामधे येणाऱ्या प्रत्येक अडचनींना सामोरे जाण्याची हिम्मत असेल तरच व्यवसाय करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकावे. ज्यांना
कुणाच्या हाताखाली काम करण्याची इच्छा नसते पण कष्ट करण्याची अपार इच्छाशक्ती असते त्यांनी व्यवसायामध्ये आपलं नशीब नक्की आजमावं.

मित्रहो आव्हान स्वीकारण्याची आणि संकटे पचवण्याची ज्यांच्यामध्ये ताकद असते ती माणसे उद्योग क्षेत्रामध्ये स्वतःची नवी ओळख निर्माण करतात, अशी ओळख नोकरी मध्ये तुम्हाला
कधीच मिळनार नाही. व्यवसायामध्ये जीद्धीने यशस्वी झालात तर अमर्याद पैसा तुमचाच असतो आणि एक प्रतिष्ठा मिळते ती बहुतेक तीस-चाळीस वर्षाच्या नोकरीमध्ये तुम्हाला कधीच
मिळणार नाही .

ज्यांना घरची पार्श्वभूमी ही पिढीजात व्यवसाय करण्याची असते त्यांना मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे व्यवसायाचे धडे लहानपणापासूनच मिळत असतात. पण ज्यांच्या घरची पार्श्वभूमी
ही पिढीजात व्यवसाय करण्याची नसते त्यांनी व्यवसायाचे योग्य ते प्रशिक्षण आणि नियोजन करूनच व्यवसायाला सुरवात करावी.

व्यवसाय सुरु करण्याअगोदर मी व्यवसाय का करायचा हा प्रश्न नक्की स्वतःला विचारा त्याचबरोबर स्वतःची आर्थिक , बौद्धिक , मानसिक व शारीरिक तयारी आहे का याची ही एकदा
उजळणी करावी .

सांगायचे झाले तर अपयश आल्याशिवाय यश काय आहे याची गोड चव कळत नाही. व्यवसाय म्हंटला की नफा किंवा तोटा हा येतोच पण थोडयाश्या अपयशाने खचून न जाता आलेल्या
संकटाला सामोरे जाण्याची तयारी असेल तर व्यवसायामध्ये मिळालेले यश हे तुमचेच असते. मी व्यवसायामध्ये यशस्वी होणारच हे ध्येय असेल तर निश्चितच तुम्हाला कोणीही अडवू शकत
नाही.

व्यवसाय सुरु करताना त्या व्यवसायाचे सखोल ज्ञान असणे खूप गरजेचे आहे जर आपल्याला एखाद्या व्यवसायाची सखोल माहिती नसेल तर संपूर्ण माहिती गोळा करूनच योग्य नियोजन
करावे. तसेच तुम्ही करत असणाऱ्या व्यवसायाची तुम्हाला आवड पाहिजे जर तुम्हाला आवडच नसेल तर कशातच रस राहणार नाही.

एक लक्षात ठेवा व्यवसायामध्ये वेळेचे बंधन नसते अगदी सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्हाला व्यवसायात मेहनत करावी लागू शकते, उदाहरणासाठी बघायला गेले तर स्वीट
चे दुकान, हे दुकान सकाळी सात वाजता उघडते पण स्वीट विकणारा दुकानदार सकाळी पाच वाजल्यापासून त्याच्या दुकानाच्या तयारीला लागतो आणि संध्याकाळी दहा पर्यंत हे
दुकान चालूच असते म्हणजे हा दुकानदार फक्त सहा तास झोपतो आणि अठरा तास व्यवसायामध्ये डूटी करत असतो. सांगायचे झाले तर व्यवसायामध्ये जेवढा वेळ दयाल तेवढा
कमीच आहे.

तुमच्या पंखांमध्ये जेवढे बळ असेल तेवढे उंच तुम्ही तुमचा बिझनेस तुम्ही नेवू शकता.
मित्रहो व्यवसाय करायचा की नोकरी हा निर्णय घेण्यासाठी थोडा वेळ लागू द्या पण संपूर्ण विचार करूनच योग्य तो व्यवसाय चालू करा पण एकदा घेतलेल्या निर्णयाशी ठाम रहा आणि त्या
निर्णयाशी तुम्ही ठाम राहिलात तर उद्योजक म्हणून तुमचे नाव प्रत्येकाच्या तोंडावर असेल.

No comments:

Post a Comment