नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

अंधविश्वासाची झापडं उघडणारच नसतील

**** अंधविश्वासाची झापडं उघडणारच नसतील तर मग शिकायचं कशासाठी....?
ज़रा वेळ देवून यावरती चिंतन करा

प्रश्न 1 - रावणाला जर 10 तोंडे होती तर
1) मुख्य तोंड डावीकडून कितव्या क्रमांकावर होते ?
2) त्याच्या मुलाला एकच तोंड का होते?
3) एकाच मानेवर 10 तोंडांना आधार कसा होता ?
4) कान किती व कसे होते ?
5) दहा तोंडांची सेवा 24 तास होती की फक्त कधीकधीच ?

प्रश्न 2 - तुळशीचे झाड जर देवाशी दरवर्षी लग्न करू शकते तर बाभळीचे झाड माझ्याशी एकदातरी लग्न करू शकेल का ?
प्रश्न 3 - योग्य क्रम लावा.
पृथ्वी नागाच्या डोक्यावर,
नाग समुद्रात,
समुद्र पृथ्वीवर
प्रश्न 4 - कुंभकर्ण जेवण केल्यावर 6 महीने जर झोपत असेल तर प्रातःविधीला कधी जात असेल ?
प्रश्न 5 - असं म्हणतात की, ब्रम्हदेवाने सृष्टी निर्माण केली म्हणजे त्यात मग सर्व जग आलं, सगळे प्रांत सगळे देश आलेत मग.......३३ कोटी देव इतर कोणत्याही देशात न राहाता आपल्या भारतातचं का राहतात ?
प्रश्न 6 - राम जर सर्व शक्तिमान होता तर त्याला आपली बायको स्वतः का शोधता आली नाही ?
प्रश्न 7 - हनुमानाने जर डोंगर उचलुन आणला होता तर त्याच डोंगरा वर सैन्या का नेल नाही ?
प्रश्न 8 - रामाने बाण काढताच समुद्राने घाबरून सेतू बांधायला रस्ता दिला मग......सेतु बांधायचा ताप बिचार्या माकडांना का दिला ?

प्रश्न 9 - बायका चंद्राला भाऊ मानतात मग...
1) वहीनी कोणती ?
2) भाऊ च का मानतात ?
3) आजीचाही भाऊच,
आईचाही भाऊच,
मुलीचाही भाऊच,
मुलीच्या मुलीचाही भाऊच......
काय नाते आहे की बनवाबनवी आहे ?
🚦काय गडबड आहे ही🚦
▶ प्रत्येक धर्मात स्वर्ग, नरक ह्या कल्पना आहेत. किती मस्त कल्पना आहेत ना स्वर्ग, नरक, आत्मा. माणुस मेला की त्याच्या शरीरातुन त्याचा
आत्मा बाहेर पडतो, नंतर त्याचा आत्मा इतर धर्मांचं माहिती नाहीये पण हिंदू धर्मातल्या गरुडपुराणानुसार मृत्युलोकात जातो मग पापं केली
असतील तर नरकात शिक्षा दिल्या जातात, पुण्य केली असतील तर स्वर्गात जातो, स्वर्गात अप्सरा असतात, पाहीजे ते भोजन असतं, नंतर
अप्सरा नृत्य करतात, सगळा आनंद आपला आत्मा घेतो, नरकात तर यापेक्षा भयानक हाल, गरम तेलात आत्मा तळला जातो, चाबकाने आत्मा फोडला जातो, तेलाचे घाणे फिरवले जातात.

▶ मजेची गोष्ट अशी की गीतेत लिहीलंय....आत्मा ना शस्त्राने कापला जाउ शकत, ना तो जळु शकतो, ना तो नष्ट होउ शकतो.
▶ मग प्रश्न पडतो कि, आत्म्याला चाबकाने फोडलं कसं जाउ शकतं, किंवा आत्म्याला शिक्षा कशी दिली जाउ शकते, विचार करा जरा.
▶ बरं तेही जाउ द्या, सांगितलं जातं की मेलेला माणुस परत येउ शकत नाही, आणि विज्ञानाच्या दृष्टीने ते सत्य ही आहे, मग कुणी स्वर्गाचं किंवा नरकाचं वर्णन हुबेहुब कसं केलं बुवा....?
▶ कारण स्वर्गात किवा नरकात जाण्यासाठी मरावं लागतं, मग असा कोण महाशय आहे की तो मरुन परत
आला आणि हे प्रपंच (बाड) लिहुन गेला....?
▶ म्हणजे मृत्त्यू ह्या अंतिम सत्त्याला ही हुलकावणी देणारे कुणीतरी होते की काय....?
▶ वैज्ञानिक दृष्टीने चिकीत्सा केली तर लक्षात येते की आत्मा असा काही प्रकारच अस्तित्वात नाहीये, आणि हे खरंही आहे कारण मी तरी नाही पाहिला
अजुन आत्मा बित्मा, किंवा अनुभव ही नाही आला मला. माणुस मेल्यानंतर त्याच्या शरिरातील पेशी मरतात तेव्हा मनुष्य मेला आहे असं
घोषित होतं, माणसाने हालचाल केली की त्याच्या शरिरात आत्मा असतो, पण विज्ञान म्हणते की मानवाच्या शरिराची हालचाल त्याच्या
शरिरातील पेश्यांच्या सक्रियतेने होते, म्हणुन ही कदाचित माणसाचा जीव हळुहळू जातो, आणि तेव्हा त्याला वाटतं की त्याला यमदूत घ्यायला आलाय
कारण अश्या वेळेस मानवाच्या पेश्या जेव्हा कमजोर होतात तेव्हा त्याचा मेंदु त्याला या घटना दाखवतो, जसं की दिवसभर विचार
केल्यावर रात्री तेच विचार स्वप्नात येतात, मरताना ही माणुस हाच विचार करत असतो की तो स्वर्गात जाणार की नरकात, यम त्याला कधी घ्यायला
येईल आणि त्याचा मेंदु तेच चित्र त्याला दाखवतो, मग आता प्रश्न हा पडतो की आत्मा, स्वर्ग, नरक ह्या कल्पना कुठून
आल्यात....?
▶ पहिलं कारण आहे भय पसरवणे
▶ दुसरं म्हणजे त्याच भयाचं रुपांतर धंद्यात करण्याचं
▶ बघा ना आता....ज्या पालकांना आपण जीवंतपणी चांगलं खाउ घालत नाही किंवा त्यांच्यावर खर्च करत नाहीत त्यांच्या मरण्यानंतर, दहावं,
बारावं, तेरावं, महिना, वर्षश्राद्ध, नंतर पिंडदान.
▶ आत्मा भटकता असेल तर नारायण नागबली, अमुक पुजा, तमुक पुजा, त्यांचा खर्च हा कुणाच्या खिशात, कुठे जातो....?
▶ अंधविश्वासाची झापडं उघडणारच नसतील तर मग शिकायचं कशासाठी....?
▶ भाताचे गोळे करुन आत्म्याला खाउ घातलं जातं, किती तरी भात असाच नष्ट होतो, अंधश्रध्देच्या आहारी जाउन मेलेल्यांना खाउ घालतो आणि
जिवंत असलेल्यांना दारातून हुसकुन देतो.
याचा कधी डोळसपणे विचार केलाय का, ह्या सगळ्या कल्पना (खयाली पुलाव) नाहीतर मग काय आहे....?
असो
आतातरी......बदला......

No comments:

Post a Comment