नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday, 21 December 2017

मौखिक आरोग्य तपासणी शिबिरास विधान परिषद सभापती व मुख्यमंत्र्यांची भेट

नागपूर : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने नागपूर विधान भवनात आयोजित मौखिक आरोग्य तपासणी शिबिरास आज विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी त्यांचे स्वागत केले.

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने विधीमंडळ सदस्य, अधिकारी, कर्मचारी तसेच विधानभवनमध्ये येणाऱ्या अभ्यांगतांसाठी मौखिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरास भेट देऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस व सभापती श्री. नाईक निंबाळकर यांनी शिबिराची माहिती घेतली. यावेळी आमदार हुस्नबानो खलिफे यांच्यासह विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

source: महान्यूज

No comments:

Post a Comment