नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday, 22 December 2017

खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी विधेयक मसुदा समिती स्थापन- विनोद तावडे

विधानपरिषद प्रश्नोत्तरे

नागपूर : राज्यातील अनधिकृतरित्या चालविण्यात येणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी समिती स्थापन केली असून विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य नागोराव गाणार यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले, खाजगी कोचिंग क्लासेसवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा अंमलात आणणार असून त्याअनुषंगाने विधेयकाचा मसुदा तयार करण्याची कार्यवाही शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या समितीमार्फत करण्यात येत आहे.

खाजगी अनुदानीत प्राथमिक शाळांचे लेखापरीक्षण- विनोद तावडे

राज्यातील खाजगी अनुदानीत प्राथमिक शाळांचे लवकरच लेखापरीक्षण करण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य हेमंत टकले यांनी लेखापरीक्षणाबाबत प्रश्न विचारला होता. श्री.तावडे म्हणाले, राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक शाळांना शासनाकडून दिल्या जाणाऱ्या वेतनेत्तर अनुदानाच्या विनियोगाचे लेखापरीक्षण करण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करुन शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत लेखापरीक्षण झालेल्या शाळांचे अनुदान मंजूर करण्यात येईल.

आकृतीबंध तयार करण्याची कार्यवाही

सदस्य विक्रम काळे यांनी राज्यातील माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध अहवाल करण्याबाबत प्रश्न विचारला असता श्री.तावडे म्हणाले, आकृतीबंध तयार करण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरु आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री सतीश चव्हाण, नागोराव गाणार यांनी सहभाग घेतला.

पुण्यात क्रीडासंकुल उभारण्याबाबत बैठक

पुणे शहरातील हडपसर, कोथरुड आणि कर्वेनगर या उपनगरात क्रीडासंकुल उभारण्याबाबत बैठक घेण्यात येईल, असे तावडे यांनी सदस्य अनिल भोसले यांच्या क्रीडासंकुलाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना विधानपरिषदेत सांगितले

बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार- विनोद तावडे

बीड जिल्ह्यातील उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांची रिक्त पदे लवकरच भरणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अमरसिंह पंडित यांनी उर्दू शिक्षकांची पदे भरण्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री. तावडे म्हणाले, सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात उर्दू माध्यमाच्या इयत्ता 11वी व 12वीमध्ये एकूण 79 विद्यार्थी शिकत आहे. मौजे तलवाडा येथे जिल्हा परिषदेच्या उर्दू शाळेस शासन मान्यता असून तेथे उर्दू शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य विक्रम काळे, सतीश चव्हाण, श्रीमती हुस्नबानू खलिफे यांनी भाग घेतला.

नियमबाह्यरित्या शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी चौकशी करणार- विनोद तावडे

राज्यातील नियमबाह्यरित्या शिक्षकांची नेमणूक केल्याप्रकरणी चौकशी करणार असल्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

राज्यात प्राथमिक विभागात 796, माध्यमिक 4 हजार 570 आणि उच्च माध्यमिक विभागात 1 हजार 550 शिक्षकांच्या नियमबाह्य नियुक्त्या करण्यात आल्यासंदर्भातील प्रश्न सदस्य नागोराव गाणार यांनी विचारला. या प्रश्नाच्या उत्तरार्थ श्री. तावडे म्हणाले, शासनाने ऑगस्ट 2015 मध्ये वैयक्तिक मान्यता तपासणी समिती गठित करुन मान्यता देणाऱ्या शिक्षणाधिकारी, शिक्षण उपसंचालक यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या असून शिक्षकांच्या नियुक्त्या रद्द केल्या आहेत.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री विक्रम काळे, हेमंत टकले, कपिल पाटील यांनी सहभाग घेतला.

विनाअनुदानित शाळेच्या मूल्यांकनाकरिता लवकरच आदेश- विनोद तावडे

विनाअनुदानित शाळेच्या मूल्यांकनाकरिता उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कार्यवाही केली जाईल, असे शाळेच्या मूल्यांकनाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य डॉ. सुधीर तांबे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. उच्च न्यायालयाने अल्पसंख्याक संस्थांना शेवटच्या वर्गाच्या पटात 30 ऐवजी 20 पट करुन त्याबाबत नवीन शासन आदेश निर्गमित करण्याचे निर्देश शासनाला दिलेले आहेत, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

नगरपरिषदेच्या शिक्षकांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याबाबत लवकरच निर्णय- विनोद तावडे

नगरपरिषदेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील शिक्षक, कर्मचाऱ्यांना शासनाच्या वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

नगरपरिषदेच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्तीचा लाभ देण्याबाबतचा प्रश्न सदस्य प्रा. अनिल सोले, विक्रम काळे यांनी विचारला होता.

लासलगाव विंचूरसह 16 गावांच्या पाणीपुरवठा योजनेसाठी सौरऊर्जा संयंत्र मंजूर करणार- बबनराव लोणीकर

लासलगाव विंचूरसह (जि. नाशिक) 16 गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सौरऊर्जा संयंत्र मंजूर करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले जातील, असे पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य जयवंतराव जाधव यांनी सौरऊर्जा पथदर्शी प्रकल्पाबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री. लोणीकर म्हणाले, ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या योजना विजेअभावी बंद आहेत. तेथे सौर ऊर्जेचा वापर करण्याबाबत शासन विचार करीत आहे. लासलगाव विंचूरच्या सौरऊर्जा प्रकल्पाची नाविन्यपूर्ण योजना म्हणून शासनस्तरावर दखल घेतली जाईल.

यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य हेमंत टकले यांनी भाग घेतला.

रॅगिंग, लैंगिक शोषण प्रकरणी युजीसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही- रवींद्र वायकर

राज्यातील महाविद्यालयामध्ये सुरु असलेल्या रॅगिंग व लैंगिक शोषणावर प्रतिबंध घालण्यासाठी युजीसीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार कार्यवाही केली जाईल, असे उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी विधानपरिषदेत सांगितले.

सदस्य अनंत गाडगीळ यांनी रॅगिंग व लैंगिक अत्याचाराबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. श्री.वायकर म्हणाले, अमरावती येथील रॅगिंगची एक घटना वगळता अशा प्रकारच्या घटना राज्यात आढळून आलेल्या नाहीत. राज्य रॅगिंगमुक्त असावे, याबाबत सर्व शैक्षणिक संस्थांना सूचना दिलेल्या आहेत.

प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्वावरील प्राध्यापकांच्या मानधनात वाढ करण्याबाबत लवकरच कार्यवाही करण्यात येईल, असेही श्री.वायकर यांनी सदस्य सतीश चव्हाण यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

यावेळी चर्चेत सदस्य विक्रम काळे, नागोराव गाणार यांनी भाग घेतला.

Source:महान्यूज

No comments:

Post a Comment