नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

महिला बचतगटांना शासन सहकार्य करणार - विष्णू सवरा

कोकण सरस विक्री व प्रदर्शन 2017 चे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

पालघर : महिला बचतगटांच्या आर्थिक सबलीकरणासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री विष्णू सवरा यांनी केले.

कोकण सरस विक्री व प्रदर्शन 2017 चे उद्घाटनाप्रसंगी श्री.सवरा बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विजय खरपडे, नगराध्यक्ष उत्तम पिंपळे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद बोरीकर, कोकण विभागीय उप आयुक्त गणेश चौधरी, पोलीस अधीक्षक मंजुनाथ सिंगे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नंदकिशोर जेजुरकर, महिला बचत गटांच्या प्रतिनिधी, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी सवरा म्हणाले की, महिला बचतगट हे अत्यंत प्रभावीपणे काम करीत आहे. या बचतगटांना काही अडचणी सुद्धा आहेत. त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. महिला बचतगटांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्रीसाठी व्यवस्था केली जाईल. आदिवासी विभागांमार्फत सुद्धा महिला बचतगटांना मदत केली जाईल. या सरस कार्यक्रमाचे यशस्वीरित्या आयोजन करण्याचे आवाहन ग्रामीण जिवनोन्नती अभियान (उमेद), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि जिल्हा परिषद पालघर यांनी यशस्वीरित्या पेलल्याबद्दल पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीस त्यांचे अभिनंदन केले.

यावेळी बोलताना बोरीकर म्हणाले की, बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून पिळवणूक करणाऱ्या दलालांना बाजूला सारून त्यांना योग्य मोबदला देण्याचा प्रयत्न या कोकण सरसच्या माध्यमातून केला जात आहे.

या महोत्सवात ६ जिल्हे (पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे आणि नाशिक) सहभागी झाले आहेत. यात एकूण १२२ स्टॉल उभारण्यात आले आहेत. याबरोबर विविध चर्चासत्र, माहितीपर आणि जनजागृती कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम इत्यादिंचेही आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे. दि.23 ते 27 डिसेंबर 2017 या कालावधीत पालघर येथे कोकण सरसचे आयोजन करण्यात आले आहे.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment