नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday 27 December 2017

अलिबाग हे एकमेकाद्वितीय पर्यटनस्थळ - जयकुमार रावल

अलिबाग महोत्सव 2017

अलिबाग : अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने राज्यातील महत्वाचे स्थान आहे. येथे पर्यटन केंद्रीत प्रत्येक गोष्ट आहे. निसर्गाने नटलेला परिसर, इतिहास, समुद्र किनारा असे एकमेवाद्वितीय पर्यटन स्थळ आहे. स्थानिकांच्या रोजगाराचे मुख्य स्त्रोत म्हणून येथील पर्यटन सुविधांचा विकास करु, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी, पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज येथे केले.

अलिबाग येथे रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.अलिबाग, नगर परिषद अलिबाग व महिला बचत गट फेडरेशनच्या सहकार्याने आयोजित अलिबाग महोत्सव 2017 च्या उद्घाटनप्रसंगी जयकुमार रावल बोलत होते.

यावेळी आमदार जयंत पाटील, आमदार सुभाष पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षीताई पाटील, जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी,अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष आस्वाद पाटील, रघुजीराजे आंग्रे, उपनगराध्यक्षा मानसी म्हात्रे, महिला बचत गट फेडरेशनच्या चित्रेलखा पाटील, अलिबाग नगरपरिषदेचे नगरसेवक आदि मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री.रावल म्हणाले की, अलिबागाला पर्यटनाच्या दृष्टीने आगळेवेगळे महत्व आहे. याकरीता पर्यटन क्षमतेचा विकास करणे आवश्यक आहे. पर्यटन हे सर्वात मोठे रोजगाराचे साधन आहे. अलिबाग सारख्या पर्यटन स्थळी पर्यटन हेच रोजगाराचे मुख्य स्त्रोत आहे. वेगवेगळ्या विभागात पर्यटन विभागले आहे. शासन किल्ले संवर्धन हे नविन धोरण आणत आहे. रायगड किल्ल्याला गतवैभव परत मिळवून देण्यासाठी शासनाने 606 कोटीचा निधी मंजूर केला आहे. याकरीता स्वतंत्र प्राधिकरण निर्माण केले आहे. 2018 मध्ये सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समाधीस्थळी लाईट शो, तसेच अलिबाग समुद्र किनारी पर्यटकांना सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. या करीता पर्यटन विभाग आवश्यक ती सर्व मदत करेल. परंतु हे सर्व करत असताना नैसर्गिक सौंदर्य अबाधित राखले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी आमदार जयंत पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, रायगड जिल्ह्यात पर्यटनाला चालना मिळावी या करीता पर्यटन विभागाने आवश्यक ते सहकार्य करावे. अलिबागाचे नाव पर्यटनाच्या जागतिक नकाशावर न्यायचे आहे. पर्यटनामुळे रायगड जिल्ह्यातील जनतेला रोजगार उपलब्ध होऊन पर्यटनाला चालना मिळेल असे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी केले तर सुरक्षा शहा यांनी मान्यवरांचे आभार मानले.

source:महान्यूज

No comments:

Post a Comment