नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday, 25 October 2017

प्रेम कविता



प्रेमाचं रोपटं

ती रोज मला भेटायची
पाहताच मला थांबायची
गोड गोड हसून
मान घाली घालून जायची
का ती हसत होती
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं
त्याच त्याच घटनांचा
ऊत आला होता
अचानक नजर भिडण्याचा
मोहर आला होता
का ती मुध्दाम भेटायची
आज मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं
तिचा माझा तसा
काही परिचय नव्हता
पण हसण्यावर तिच्या
माझा जीव आला होता
नकळत प्रेमात रमलो
तेव्हा मला कळलं
कारण प्रेमाचं रोपटं
माझ्या काळजात उगवलं

प्रेम सगळीकडे आहे


प्रेम सगळीकडे आहे, असावे तर फक्त मनाचे डोळे
Engineering च्या मार्क मेमो कडे बघून झालेला बाबांचा संताप असो,
आई ने गायलेले अंगाई गीत असो
यात असते प्रेम...
पाढे चुकल्या नंतर ताई ने दिलेला धपाटा असो,
माझा उदास चेहरा बघून दादा ने विचारलेला प्रश्नका रे lovestory मध्ये काही प्रोब्लेम ?”
यातहि आहे प्रेम...
तिने खाऊ घातलेली पुरण पोळी असो कि कटाची आमटी,
आम्ही सोबत खालेले chocolates,
यातही आमच्या मैत्री चे प्रेम आहे...
तिच्या नावातचप्रेमआणि माझ्या नावातअनंत’,
असे माझे हेअनंत प्रेमतिच्यावर...
याच प्रेमाने जीवनाला अर्थ दिला...
याच प्रेमाने एक आत्मविश्वास दिला...
कधीतरी पालवी फुटेल आणि याअनंत प्रेमाचेएक फुल उमलेल,
प्रेम सगळीकडे आहे ,असावे तर फक्त मनाचे डोळे

आयुष्याचा भागीदार

तिच्या दिशेने पावलं
आपोआप माझी वळतात
मलाही उमजेना अशा
वाटेला भावना कळतात
भव्यतेची ओढ मला
स्वप्नं माझी साहसी
झोका घेता आकाशी भिडे
ती ही आहे धाडसी
पुस्तकांचे ओझे माझे
ती लिलया पेलेल का?
झेप घेऊनी धडपडलो
तर ती मला झेलेल का?
नेम अचूक स्थैर्य तिच्या हाती
तीक्ष्ण विचारांचे बाण
सोसेल का तिच्या बुद्धीला
माझ्या धनुष्याचा ताण
खळाळते हास्य तिचे
नम्रतेचा शृंगार
तिच्या तेजस्वी डोळ्यात दिसे
मला आयुष्याचा भागीदार

प्रेमाचे वादळ

ठरवून पण सहजपणे
माझ्या बाजूला बसतो
छोट्याशा विनोदावरही
जोरजोरात हसतो
कळतय मला
कळतय मला हास्यात तुझ्या
काय लपून बसलय
घाबरु नको मी ही मनात
तसच काहीसं जपलय
संपण्यार्या गप्पांचं मी
पांघरुण घेऊन निजते
तुझी हुशारी उत्तरात नाही
प्रश्नांमध्ये दिसते
आत्मविश्वासाने नटलेला
स्वभाव मोहक रहस्यमय
सारखा तुझा उल्लेख ओठी
हवीहवीशी तुझी सवय
विश्वासार्ह न्यायबुद्धी
वर्तनातही सभ्यता
हात तुझ्या हाती देता
मनी लाभली शांतता
आरशाने पहिल्यांदा माझ्या
डोळ्यात भरले काजळ
नव्हती ही झुळुक मैत्रीची
होते प्रेमाचे वादळ

सापडलेलं प्रेम


क्षणात एका टोचलेलं
खोल दरीत पोहोचलेलं
तिथेच डुंबत बसलेलं
बोलता रुसलेलं
ओठात कधी मिटलेलं
कागदास कधी भेटलेलं
पापणीच्या आड हसलेलं
मनात माझ्या वसलेलं
उशीच्या कुशीत निजलेलं
स्वप्नाळु जगात सजलेलं
असून सुद्धा नसलेलं
पण आरशात मात्र दिसलेलं
सापडलेलं प्रेम...

कोण असशी तू


कोण असशी तू माझा हे मला समजायचे
कोण नसशी तू माझा हे तुला उमगायचे
मी होता रणीचा पार्थ तू सांगशील रे गीता
विसर बंध नात्याचे लढ अन्यायाशी पुरता
मोहरता फुले मोहाची स्पर्शे गळतील सारी
आनंद अस्पर्षाचा हि तुझीच किमया न्यारी
सूरदास अंध मी होता तू होशी माझी काठी
जग शत्रू होता सारे तू एकालाच मम पाठी
द्वैतातून अद्वैताचे रेखाशीस तू चित्र
मम जन्म जन्मांतरीचा एकालाच तू मैत्र

स्पर्श

तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला
होता जरा शहारा, वेडा खुळा बहाना
ओठांवरी तुझ्या का, चढवुन साज गेला
संगीत शांत केले अंधार गात गेला
बेहोश रम्य राती उधळून श्वास गेला
भिजवुन अंग सारे विझवुन शब्द सारे
रंगात आज तुजला, रंगुन भास गेला...
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवून लाज गेला..
तो स्पर्श सांग तुजला सांगुन काय गेला
गालावरी तुझ्या का खुलवुन लाज गेला

जास्वंद


तुमच्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यात साठलेला ऋतुगंध सैल झाला
जवळी आलास तेव्हा श्वासात कैफ आला
अन्मोगरा सुगंधी लाजुन धुंद झाला...
अंती, गंध सारे गुलाबी ओठांवरी पहुडले
क्षण, अंगावरी बहरता जास्वंद मंद झाला...
तुमच्या कुशीत माझा पाषाण मोम झाला
डोळ्यात साठलेला ऋतुगंध सैल झाला

No comments:

Post a Comment