नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Wednesday, 25 October 2017

आत्मविश्वासाच्या प्रेरणादायी कविता

माईलस्टोन

ऊठ रे काळ्या पेंगू नको आता,
राहू केतूचे सैनिक नाहीतर धरतील तुमच्याच माना
चाल-चाल चालायचंय , राब-राब राबायचंय,
क्षितिजाच्या सामोरी जाऊन सूर्योदयही पहायचंय,
ओसाड झाल्या जमिनीवर हिरवं छप्पर घालायचंय,
मंतरलेल्या नदीतून देव देणं आणायचंय
ऊठ ऊठ काळ्या पेंगू नको आता,
काळे गोरे सगळेच नाही तर मारतील तुला लाता
हजार खोलीच्या मालकाला , , ,  शिकवायचंय,
जमलंच तर हात पकडून जग खरं दाखवायचंय,
पाळण्यातल्या बाळाला अजून चालणं शिकवायचंय,
चालून पळून थकलेल्याला हात देऊन उठवायचंय
सांभाळ रे काळ्या पेंगू नको आता,
डोक्यावरचा भार खाली पडेल मेल्या
गीताकुराणबायबल पुन्हा एकदा वाचायचंय,
कानामात्रावेलांटीला जग सारं सांगायचंय,
उघड्याबंब पेटाऱ्याना छपराखाली ठेवायचंय,
गडद-फिकट देखाव्यांचे सूर भारी जुळवायाचेय
चल पटकन काळ्या पेंगू नको आता,
वेळ सरतोय आता घाई कर पोरा
अजस्त्र बाहूंनी जग सारं ओढायचंय,
 खरचटता दरी  डोंगर ओलांडायाचेय,
नारायणाच्या दर्शनाला टपटप जायचंय,
पुढच्या माईलस्टोनला पटकन गाठायचंय

माणूस म्हणून


चल माणसा भाकीत कर
मन तुझं उघड कर
जगण्याचा प्रवाह शिथिल कर
सुकर कर सुजय कर
ज्ञान लेऊन सज्ज हो
शास्त्र घेउन कर्ता हो
जीव-जीवाशी हर्ष कर
धर्म होऊन शासन कर
साद देऊन प्रतिसाद हो
आवाज ऐकून भाषा हो
मना-मनाला साथ कर
प्रयत्न तुझे सुफळ कर
सुकर्म करून वंद्य हो
हात देऊन मित्र हो
क्षणा-क्षणाला लक्ष्य कर
कर्तृत्वाला तुझ्या अजिंक्य कर
वर्तमानातून भविष्य हो
सावली देऊन दिशा हो
कणा-कणाला स्पर्श कर
माणूस म्हणून राज्य कर

ध्यास

जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही
अगणित आकांशा
क्षणात संपत नसतात
पेटतात मंद चांदण्यांसारख्या
पेटतात तेजस्वी ताऱ्यांसारख्या
मावळतील दिवे
अंधार पसरेल चहुबाजू
सायंकाळ येईल
काळे वस्त्रे परिधान करून
त्याच क्षणी
सूर्य उगवलेला असेलच कोठेतरी
त्याची आग विझणार नाही
विझलेली मशाल
पुन्हा पेटवतील
असंतोषाचे हात
होईल सुरु
एक नवा प्रवास
तीच वाट धरून
पोहोचेल तो
परिवर्तनाच्या क्षितिजावर
तोपर्यंत त्याची पापणी
तुफानातही लवणार नाही

माझ्यातला परमेश्वर

धमण्यांतून धावणाऱ्या तांबड्या पाण्याशी
नातं सांगणाऱ्या पांढऱ्या ऋदयाच्या गर्दिवर माझा विश्वास नाही
विश्वास आहे तो फक्त
श्वासांतून अंतःकरणा पर्यन्त चैतन्यरुपी संचार करणाऱ्या
माझातल्या परमेश्वरावर

सिगारेटच्या कागदावर लिहिलेली कविता


मज संगतीत सारे, आभाळ गात होते,
ताफ्यात चांदण्यांच्या, मन धुंद न्हात होते...
आयुष्या आज मजला, हळूवार जे उमगले
ते विश्व आज सारे, माझे मला मिळाले...

निर्मळ खळखळ वाहतांना

शुभाशुभ मुहूर्ते कधी मानलीच नाही...
कळत - नकळत जे काही रूजत गेलं...
त्याचचं फलीत ते, कुतुहलाने अंकुरत गेलं...
मातीतुनचं जन्माला आला रंग, संवाद, संवेदनांचा एक भला मोठ्ठा पुंजका...
मनाला मेंदुच्या चाकोरीतून बाहेर काढण्याचे श्रेय पण त्यांनाच...
त्यांनीच जानवु दिला नाही कधीमीपणा...
म्हणूनच, पहील्या घंटेपासून - मध्यांतरा पर्यंन्त तरी...
शुन्य होतांनाही शुभाशुभ मुहुर्ते कधी मानलीच नाही...
आणि गोठलेल्या या पांढऱ्या गर्दितही...
निर्मळ - खळखळ वाहण्याचा पारदर्शक जीवनानंद घेता आला...
त्या माझ्या मातीतल्या हिरवळीचेऋण तिसऱ्या घंटेआधी फेडण्यासाठी...

डॉ. . पी. जे अब्दुल कलाम

निर्मळ वाचा
विज्ञान भक्ती
अवकाशी प्रेरणा
प्रेमळ व्यक्ती
विलक्षण बुद्धी
मार्मिक विचार
हाती दानत
मुखी आधार
मृदु स्वभाव
संवेदनशीलता
देश प्रेमाशी
एकनिष्ठता
कठोर परिश्रम
थोर नेतृत्व
सखोल अभ्यास
अद्वितीय कर्तुत्व
नव्या पिढीशी
विचार मंथन
स्वप्नाळू डोळ्यांना
अविरत समर्थन
या जाज्वल्य पार्वाला
भारताचा सलाम
एक महान गुरु
डॉ. . पी. जे अब्दुल कलाम

स्वतंत्रता दिवस

घडतोय बदल
चढतेय वीटेवर वीट
मिटतेय गुलामी
आपण होतोय धीट
उठत आहेत प्रश्न
कुरवाळतोय शंका
अन्यायाविरुद्ध
कुणी वाजवतोय डंका
पसरतेय महिती
हक्कासाठी भांडतोय
उलट सुलट का होईनात
आपण विचार मांडतोय
घडवितोय देश आपला
अंतराळी इतिहास
उद्याच्या चैतन्यावर
दृढ होतोय विश्वास
कोपर्यातल्या झोपडीमध्ये
प्रगतीची इच्छा दिसतेय
पुस्तकाच्या बाजारातही
आशेची पालवी रुजतेय
भारतीय असण्याचा वाटे
मनापासून अभिमान
बलाढ्य सुंदर समृद्ध स्वतंत्र
माझा भारत देश महान

महाराष्ट्र माझा


महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा
अभिमान माझा स्वाभिमान माझा
मराठी आमुची भाषा
मस्तकी देश प्रेमाची रेषा
सह्याद्रीच्या डोंगर रांगा
तलवारीची धार आमुच्या अंगा
पराक्रमांची ही भूमी
शूरविरांची नाही इथे कमी
शिवबाचा इतिहास सांगतो वारा
चमकतो संभाजीसारखा सूर्यतारा
ऐकतो तुकारामाची गाथा
टेकतो पंढरपुरी माथा
जाती धर्म जरी अनेक
तरी राहतो आम्ही एक

उद्याचा मी म्हणून

उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून
जगत असतो, पण उद्याचा दिवस
आज म्हणून येतो, तो कालचा झालेला असतो.
उद्याचा जन्मणारा बाळ आहे म्हणून
तरसत असतो, पण उद्याचा माझा बाळ
तरुण म्हणून होतो, तो दुसर्याचा झालेला असतो.
उद्याची कोमललेली सकाळ आहे म्हणून
तरळत असतो, पण उद्याची सकाळ
संध्याकाळ म्हणून येते, आणि ती चंद्राची झालेली असते.
उद्याचा मुलगा माझा आहे म्हणून
वेडावून गेलेला असतो, पण उद्याचा मुलगा
जावई म्हणून जातो, तो सासरचा झालेला असतो.
उद्याची सोनकळी माझी आहे म्हणून
सद्गदीत असतो, पण उद्याची सोनकळी
सून म्हणून जाते, ती दुसर्या घराची झालेली असते.
उद्याचा प्रत्येक क्षण माझा आहे म्हणून
कंठत असतो, पण उद्याचा क्षण
भूतकाळ म्हणून जातो, तो काळाचा झालेला असतो.
मी जेव्हा आज मात्र माझा आहे म्हणून
स्वतःवर मी पणा गाजवतो, पण आजचा मी
हरवलेला म्हणून येतो, तो अहंकारात विलीन झालेला असतो.
उद्याचं वाटणारं तारुण्य आहे म्हणून
जोशात असतो, पण उद्याचं तारुण्य
वार्धक्य म्हणून येतं, आणि तो उद्याचा मी म्हणूनच असतो.

 

फुल

आयुष्य जरी एक दिवसाचे
काम त्याचे लाख मोलाचे
सुख दुःखात असतो सोबती
फुलांची ही थोर महती
घेवू शिकवण आपण फुलांकडून
सुख दुःख वाटू सर्व मिळून
आयुष्यात असेल आपल्याही सुगंध
दृढ होतील ॠणाणुबंध

जळताना पळणे असे भासते

जळताना पळणे असे भासते
जणू काळाशी ओघवते लढणे
सवय नासली तलवारीची
अंगांगाची होळी झाली
तरी जळला पीळ लाडका
लाकूड होवून पळी व्हायचा
यज्ञामध्ये ज्वाळेसोबत
राळ होऊनी स्नान घ्यायचा
काळासोबत हलता डुलता
देह अनाहत कातळ झाला
कुण्या देशीच्या जनतेकरिता
वादळातला स्वामी झाला

No comments:

Post a Comment