नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Wednesday, 25 October 2017

दुःखाच्या कविता

हरवलेली स्वप्नं


मी,
गारव्याला झाडाखाली
ती,
विस्कटलेल्या चेहर्याची
गालावर आसवांचे डाग
हातात टोपली...
माझ्याजवळ आली
इकडं तिकडं घोटाळली
काय हरवलं असावं?
तिचं ते धांडोळण
बघता बघता
माझी नजर
पायाकडं
बरीच चाल
चाललेले पाय
काय शोधत फिरताहेत...?
मी विचारलं
तिचं उत्तर...
हरवलेली स्वप्न!

अखेरच्या वळणावर


प्रवाह विवंचनेत गुंतल्याप्रमाणे वाहत होता..
अखेरच्या वळणावर..
अबोल, संथ, निस्वार्थी...
हरेक किनारा चुंबीत!
..आणि किनारा
आधार देत सावरत होता,
सह - वेदनांच्या ठिसुळ गुढ आठवणींसह
चिखल आणि तृणपात्यांच्या
अनाकलनीय आधार स्तंभांना!

लाटेवरच्या सावल्या


अंश - अंश हा असा माझा
क्षितिजाशी नाते म्हणतो...
पण, मीच हा असा माझा
भ्रमराचा भवती फिरतो...
दुर सावल्या गेल्या त्या लाटेवरती साऱ्या...
अन्‌,
या काठावरती माझा आभास शोधती फिरतो...
संपत आले अंती हे जीवन-गाणे सारे...
अन्‌,
या जीवन गाण्यासाठी संगीतशोधती फिरतो...

बुरसटलेली पाच पावले

जगण्याच्या शर्यतीत कसाबसा
धावत, धडपडत, धापा टाकत...
उपांत्य फेरीत, मी!
तेवढ्यात,
पांढऱ्या गर्दीतून एक नातं आडवं गेलेलं
घाबरलेल्या अपशकूनासारखं,
आणि, आयुष्य निर्वीकारपणे माघारी
बुरसटलेल्या पाच पावलांसारखं!

No comments:

Post a Comment