नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

नववधूला मातेने द्यावयाचे लैंगिक शिक्षण

नववधूला मातेने द्यावयाचे लैंगिक शिक्षण:

वैवाहिक जीवनातील लैंगिक आनंद हा जसा शारीरिक आहे तसाच तो मानसिक व भावनिकही आहे. परस्परांच्या सहवासात एकमेकांना सर्वस्वी जाणून घेणं एकात्मता व समंजसपणा निर्माण करणं, शरीरांचा शोध घेताना लैंगिकसंबंध ही त्याची एक इष्ट आनंददायक परिणिती आहे. ह्याची माहिती आवश्यक आहे. कुणाची एकाला इच्छा झाली, किंवा संबंध नकोसा वाटला, तर मुळातच त्याबद्दल सूचना देणं शहापणाचं कसं असत, त्यात स्त्रीत्वाला किंवा पुरुषार्थाला धक्का बसण्याचं कारण नाही, हे स्पष्ट केलं पाहिजे. दोघांच्याही स्वेच्छेनं, दोघांच्याही आनंदासाठी कुठंलही दडपण न आणता जर लैंगिक संबंध झाला, तरच तो संभोग ठरतो, नाहीतर तो नुसताच भोगच असतो. तसच दोघांनाही एकचवेळी आणि दरवेळी आनंदाचा उच्चांक गाठला पाहिजे आणि त्या संभोगसुखाची तीव्रता प्रत्येक वेळी जाणवली पाहिजे ही भ्रामक कल्पना मोडली जाणे जरुरीच आहे. संभोगक्रिया कष्ट व दुःखप्रद होत असेल, तर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेऊन उपचार करण्यास त्यांनी लाजू नये हे सुचविले पाहिजे, अनेक नवविवाहितांना पहिलीच गर्भधारणा नकोशी होते आणि ते गर्भपातासाठी डॉक्टरकडे येतात. अशा पहिल्याच खेपेला गर्भपातास कुणी डॉक्टर तयार होत नाहीत. पण असा प्रसंग येऊच नये. मनोवांच्छित गर्भधारणा व्हावयास हवी असेल, तर आपापसात मोकळेपणानं अगोदरच विवाहानंतर किती दिवसांनी ही जबाबदारी घ्यावयाची हे ठरवून संततीनियमनाचा सल्ला वेळीच घेणं हेच योग्य ठरेल, अशी चर्चा तुम्ही अगोदरच करा आणि सल्ला घ्या. हे आईनं मुलीला वेळीच सुचविणे महत्त्वाचं आहे. काहींना पहिल्याच आठवड्यात लैंगिक संबंधानंतर योनीस्त्राव, योनीमुखावर खाज सुटणं, आग होणं, लघवीची आग होणं सुरु होतं. अशावेळी निराश होऊन घाबरण्याचे कारण नाही. त्यासाठी परिणामकारक उपाययोजना असते. [मुलीच्या शरीरात बदल होत जात असताना आईनं तिला लैंगिक शिक्षण द्यायला हवं.

No comments:

Post a Comment