नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

विवाहितांच्या लैंगिक शंका

विवाहितांच्या काही शंका

मासिक पाळी आणि लैंगिक संबंध
वैयक्तिक स्वच्छता, शारीरिक त्रास व मानसिक अस्वस्थता लक्षात घेऊन मासिक पाळी चालू असताना लैंगिक संबंध ठेवणं योग्य नाही.

गर्भवती स्त्री आणि लैंगिक संबंध

गर्भवती स्त्रीला योनीस्त्रावांचा त्रास होत नसेल, तिची मानसिक अवस्था व शारीरिक प्रकृती गर्भवाढीच्या दृष्टीनं उत्तम असेल व तिला गर्भपाताचा पूर्वतिहास नसेल, तर अशा स्त्रीनं पहिल्या चार पाच महिन्यांत दोघांच्याही आनंदासाठी संभोग करण्यास हरकत नाही.

बाळंतपणानंतर केव्हा संभोग करणे इष्ट ?

बाळंतपणानंतरच्या काही दिवसात अशक्तपणा, योनीमार्गातील स्त्राव, कंबर दुखणं सुरू असतं, म्हणून सर्वसाधारणपणे बाळंतपणानंतर दोन ते तीन महिन्यांनी संततीप्रतिवेधक उपाययोजना करून संबंध सुरू करण्यास हरकत नाही. बाळंतपणानंतर जोपर्यंत मासिकपाळी सुरू होत नाही आणि जोपर्यंत बालकाचे स्तनपान चालू असतं तोपर्यंत लैंगिक संबंधातून गर्भधारणा होत नाही हा एक मोठा गैरसमज आहे.

उतारवय - म्हातारपण आणि लैंगिक संबंध

म्हातारपणी लैंगिकसंबंध ठेवणं हे काहीतरी लज्जास्पद आणि गैर आहे असं मानणं चूक आणि अन्यायकारक आहे. पती-पत्नीची इच्छा आणि क्षमता असेल तर लैंगिक संबंध चालू ठेवणं योग्य आणि हितकारक आहे. शारीरिक व लैंगिक क्षमतेनुसार अशा संबंधाबद्दलच्या अपेक्षा आणि पद्धती बदलाव्या लागतील एवढचं.

लैंगिक संबंधाबद्दलची निरीच्छता

काहींना अशा संबंधाबद्द्ल इच्छाच नसते किंवा घृणा असते, किंवा त्या व्यक्ती अशा व्यवहारात रमूच शकत नाहीत किंवा त्यांना त्या दुःखदायक असतात अशांनी तज्ज्ञांकडून वेळीच उपाययोजना करून घेणं आवश्यक आहे.

लैंगिक संबंधाचे प्रमाण

हे वैयक्तिक क्षमतेवर व आनंद मानण्याच्या कल्पनेवर अवलंबून आहे. लैंगिक संबंधामुळे थकवा येऊन त्याचा दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होत नसेल व तो संबंध दोघांनाही आनंददायक होत असेल तर त्याला कुठलंही प्रमाण किंवा माप लावणं योग्य ठरणार नाही.

लैंगिक भावनेला उत्तेजित करणारी व क्षमता वाढविणारी औषधे.

अशा औषधांचा अजिबात उपयोग होत नाही, उलट त्यामुळे निराशा पदरी येऊन न्यूनगंड मात्र निर्माण होण्याची शक्यता वाढते. अशा व्यक्तींनी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन आधुनिक शास्त्रीय उपाययोजना विशेषतः मानसोपचाराच्या पद्धतीनं करणं हितकारक ठरेल.

संतती नियमनाची साधनं व लैंगिक संबंध

कुठलीही योग्य अशी साधन वापरली किंवा कुणाचीही नसबंदी, शस्त्रक्रिया झाली असली, तरी त्याचे कुठलेही वाईट परिणाम लैंगिक क्षमतेवर होत नाहीत. काहीजण मुठीत संभोग करून वीर्य पाडतात. काहीजण वीर्य योनीबाहेर पडू देतात. यात स्त्रीवर अन्यायच होतो. क्वचित प्रसंगी दोघांच्याही भावनेसाठी असा संबंध केला तर अपवाद म्हणूनच असावा. तो एक नित्याचा प्रकार असेल तर त्याचा स्त्रीच्या मनावर तसंच शारीरिक प्रकृतीवर वाईट परिणाम होतो आणि काही वेळा योग साधला नाही, तर गर्घधारणेचाही धोका निर्माण होतो. योग साधण्यासाठी दोघांच्याही मनावर नेहमीच ताण पडतो. जरी कामजीवन हा मानवी जीवनातला एक अत्यंत आनंददायी व जीवनाला स्थिरता आणणारा महत्त्वपूर्ण घटक आहे, तरी ते जीवनाचे सर्वस्व नव्हे. लैंगिक शिक्षण, कुटुंब जीवन शिक्षण या अर्थानं ते शिकावलं, तर मानवाची गुणवत्ता वाढू शकेल आणि असं परिपूर्ण शिक्षण सुखाचा मूलमंत्र ठरू शकेल !

No comments:

Post a Comment