नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

लैंगिक आकर्षणाची भावना

५ ते १२ वयोगट
ह्या वयात त्यांना लैंगिक आकर्षणाची भावना निर्माण झालेली नसते.

शाळेत: प्राथमिक आरोग्याचे धडे देत असताना निसर्गातील प्रजोत्पादनाची माहिती पुरविणे. ह्याचा संदर्भ पुढील शिक्षणात मनुष्याच्या प्रजोत्पादनाशी जोडावयाचा असतो.

घरोघरी: आईवडील आपल्याला आचरणातून सहजपणे काही ज्ञान, उद्दिष्ट व मूल्ये यांचे संदेश मुलांमुलींना देत असतात. लहान मुलं कुतहलापोटी आपल्या शरीराचा शोध घेतात व स्वतःच्या अवयवांपासून आनंद घेतात. उदाहरणार्थ लिंगाशी खेळणं, नागडे-उघडे वावरणं. अशावेळी पालक त्यांना रागवतात व चापटसुद्धा मारतात. लिंगाशी निगडीत गोष्टी घाण असतात लज्जास्पद आणि लपवावयाच्या असतात. अशा भावना मुलाच्या मनावर कुठंतरी खोलवर रुजतात व त्याबाबतची माहिती मिळविण्याची धिटाई मोकळेपणा त्यांना वाटत नाही. एवढंच नव्हे, तर भावी लैंगिक जीवनावर अशा अनुभवाचा विपरीत परिणाम होण्याची फार शक्यता असते. पालक विशेषतः स्त्रिया मुलामुलींशी वागताना त्यांच्यात भेदभाव करतात आणि मुलांमध्ये अहंगंड व मुलंमध्ये न्यूनगंड निर्माण करतात. हा टाळायला पाहिजे. लहान मुलं कुतुहलाच्यापोटी अनेक प्रश्न विचारून भंडावतात व पालक कौतुकानं, सहजतेनं त्याची उत्तरेही देतात परंतु ‘मी कुठून आलो ? कसा आलो ? या प्रश्नांबाबत बिचकतात. पळवाट शोधून खोटी उत्तर देतात तर कधी रागवतातसुद्धा. [मुलामुलींच एकत्र खेळणं, अभ्यास करणं हे त्यांच्या मनाला निरोगीपण मिळवून देत असतं.] मुलांचं वय, त्यांची जाण लक्षात घेता त्यांना समजेल अशा सोप्या भाषेत, पण झेपेल एवढं शास्त्रीय ज्ञान निःसंकोचपणे द्यायला हवे.

पौगंडावस्थेतील वयोगट १२ ते १८:
शालेय व विश्वविद्यालयापर्यंत शिक्षणक्रमात मानवी प्रजोत्पानाच्या अवयवांची रचना, कार्यपद्धती त्याचा अर्थ व उद्दिष्ट सांगितली पाहिजेत. गुप्तरोग, संभोग, जबाबदार लैंगिकत्व ह्याच ज्ञान दिलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकही तयार करण्याची जरुरी आहे.

घरोघरी: आईनं आपल्या मुलीला मासिक पाळी सुरू होण्याच्या सुमारास तिची मानसिक बैठक तयार करावयास हवी. शरीरात होणारे बदल, भिन्नलिंगी व्यक्तिमत्त्वाचं आकर्षण, मासिक पाळी ह्याचे उद्देश व हे सर्व फरक कसे स्वागतार्ह आहेत ह्याची कल्पना दिली पाहिजे. मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता, विश्रांती त्याबाबतचे गैरसमज नीट सांगितले पाहिजेत. संमिश्र समाजात वावरताना विशेषतः एकांताची स्थळे, होस्टेल्स, हॉटेल्स, शिबिरे व सहली अशा ठिकाणी मुलांच्या बरोबर जो आनंद मिळतो, सहवास घडतो त्या त्यावेळी आकर्षणाच्या, शरीरस्पर्श, सुखाच्या धुंद वातावरणात त्याच्या आनंदाला कुठं आवर घालावयास पाहिजे व तो का, हे सूचित करणं आवश्यक आहे. लैंगिक संबंध व त्याचे परिणाम ह्यांची जाणीव निःसंकोचपणे दिली जाणे योग्यच ठरेल.

विवाहपूर्व अवांच्छित गर्भधारणेचा धोका कस असतो व जिला अनियमित पाळी असते तिला कसा फसवतो, स्वतः मुलगी भीतीने पाळी चुकल्याचे कसे लपविते हे उघड स्पष्टपणे सांगितले पाहिजे आणि मुलींमध्ये आपल्याबद्दलचा विश्वास निर्माण केला पाहिजे, नाहीतर फार उशीर झाल्यावर मुली डॉक्टरांकडे आणण्यात येतात, आई म्हणते ‘मला कल्पनाच आली नाही’. आईवडिलांची एकमेकांतील आदरणीय पेमाची नाती, त्यांचे जबाबदार लैंगिक जीवन, दैनदिन जीवनातील त्यांच्या परस्परपूरक व्यक्तिगत उन्नतीला वाव देणाऱ्या भूमिका ह्या सर्वांचा परिणाम मुलाच्या मनावर सहजरीत्या होत असतो, हीच घरगुती संस्कृती त्यांच्या वैवाहिक जीवनाची उद्दिष्टं व मूल्य ठरवित असते. नुसतं शालेय पुस्तकी लैंगिक शिक्षण त्याची गुणवत्ता वाढवू शकत नाहीतं.

No comments:

Post a Comment