मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये मोदी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. इतकं खोटं बोलणारे पंतप्रधान कधीही पाहिले नसल्याची थेट टीका राज ठाकरे यांनी केली. तसंच या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राज ठाकरे यांनी माजी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांचं कौतुक करत रेल्वे मंत्री बदलण्याच्या निर्णयावर नरेंद्र मोदींवर कडाडून टीका केली. सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं नाही ? बुलेट ट्रेनच्या लाडापायी प्रभुंना हटवलं आणि पियूष गोयल यांना आणलं. पियूष गोयल काय आधी टीसी होते, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे. बुलेट ट्रेनला सुरेश प्रभू यांनी विरोध केला म्हणूनच त्यांचं रेल्वेमंत्रिपद काढून घेतलं, अशी टीका याआधीही करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून सुरेश प्रभु यांच्याकडून रेल्वे खाते काढून घेतल्याचं म्हंटलं होतं. यानंतर आता राज ठाकरे यांनी तशीच टीका केली आहे.
Saturday, 30 September 2017
सुरेश प्रभू चांगलं काम करत होते. त्यांना का हटवलं कळलं?
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment