नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Friday, 29 September 2017

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर पोलिसांनी माणुसकीला मूठमाती

एलफिन्स्टन रेल्वे स्टेशनवर झालेल्या दुर्घटनेत २२ लोकांचे बळी गेले. मात्र या घटनेत माणुसकीचाही बळी गेला. मुंबई पोलिसांनी त्यांच्यातल्या उरल्या सुरल्या माणुसकीला मूठमाती देऊन त्यावर स्वत:च्या पराक्रमाचा झेंडाच लावलाय. जे २२ लोक मेले त्यांच्या कपाळावर १ ते २२ असे नंबर लिहिण्याचे शौर्यकाम मुंबई पोलिसांनी केले आहे. विशेष म्हणजे मृतांचे कपाळावर नंबर लिहिलेले हे फोटो पोलिसांनी रिलीज केले आहेत.
माणसांच्या जीवाची काहीच किंमत उरलेली नाही का? जे मेले त्यांचे मृतदेह जर ओळीने पांढ-या कपड्यात गुंडाळून ठेवले असते आणि त्यांचे फोटो रिलीज केले असते तर मुंबई पोलिसांच्या संवेदनशिलतेचे दर्शन घडले असते पण हे घडले नाही. वेड लागलेला माणूसच ही असली कृती करु शकतो. वेळ गेलेली नाही, चुका सुधारता येतात, आता तरी ते कपाळावरचे नंबर पुसून ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात द्या. झालेल्या चुकीबद्दल सपशेल दिलगीर व्यक्त करा, आणि ज्यांनी कोणी हे केले असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा. एवढी तरी अपेक्षा मुंबई पोलिसांकडून करू शकतो की नाही.

No comments:

Post a Comment