लक्षणे
केस गळण्याची कारणे
केस गळण्याची कारणे
सामान्यपणे प्रत्येक व्यक्तीचे दर दिवशी
५० ते १०० केस गळतात. याचे कारण म्हणजे केस सायकलनुसार वाढतात तर काही केस
टेलोजेन अवस्थेत जातात. हे गळलेले केस साधारण १०० दिवसांनंतर पुन्हा
उगवतात. पण व्यक्तीच्या डोक्यावर साधारण १,००,००० केस असतात. त्यामुळे या
नगण्य केसगळतीमुळे डोक्यावरील केस कमी झाल्यासारखे वाटत नाहीत. जसजसे वय
वाढत जाते, तसतसे व्यक्तीचे केस विरळ होत जातात. केसगळतीसाठीची इतर कारणे
खालीलप्रमाणे –
हॉर्मोनल घटक
मेल पॅटर्न बॉल्डनेस किंवा फिमेल पॅटर्न
बॉल्डनेस हा अनुवंशिक घटक हे केसगळतीचे प्रमुख कारण असते. जनुकीयदृष्टय़ा ही
अवस्था उद्भवण्याच्या शक्यता असलेल्या लोकांमध्ये सेक्स हॉर्मोनमुळे केस
कायमचे गळू शकतात. हा घटक पुरुषांमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येत असून
याची सुरुवात पौगंडावस्थेपासूनही होऊ शकते.
बहुधा आई किंवा वडिलांच्या बाजूकडून हा
अनुवंशिक घटक कुटुंबात अस्तित्वात असतो. ज्या कुटुंबात दोन्ही बाजूकडून हा
घटक अंतर्भूत असेल तिथे ही स्थिती अधिक गंभीर असते.
वजनात झालेली प्रचंड घट, गरोदरपणा,
प्रसूती, गर्भरोधाच्या गोळ्या घेणे थांबवणे किंवा रजोनिवृत्तीमुळे
हॉर्मोनमध्ये होणारे बदल वा असंतुलन यामुळे तात्पुरती केसगळती होऊ शकते.
आजार
अनेक प्रकारच्या आजारांमध्ये केसगळती होते. त्यात खालील आजारांचा समावेश आहे.
थायरॉइडची समस्या :
तुमच्या शरीरातील हॉर्मोनच्या पातळीवर थायरॉइड ग्रंथी नियंत्रण ठेवते. ही
ग्रंथी व्यवस्थित काम करत नसेल तर त्याची परिणती केसगळतीमध्ये होऊ शकते.
एलोपेशिया एरियाटा (चाई)- शरीरातील प्रतिकार यंत्रणा केसांच्या मुळावर आक्रमण करते तेव्हा हा विकार उद्भवतो. या विकारात केसांचे मऊ, गोलाकार पुंजके गळतात.
No comments:
Post a Comment