पुण्यातल्या मुलींना
पुण्यातल्या मुलींना बर्थ डे गिफ्ट काय द्याल?
.
.
.
.
.
एक डझन स्कार्फ...!
पुण्यातील एक नामवंत डॉक्टर
डॉक्टर: तुमच्या आजाराचं नेमकं कारण माझ्या लक्षात येत नाहीये, कदाचित दारू प्यायल्यामुळे हे होत असावं !
पेशंट: हरकत नाही तुमची उतरल्यानंतर येतो मी परत.
पुण्यातल्या मुलीची अॅक्टीवा
पुण्यातली एक मुलगी तिची बंद पडलेली अॅक्टीवा घेऊन गॅरेज मधे जाते.
मॅकेनिक (गाडी चेक केल्यावर): मॅडम, बॅटरी बदलावी लागेल.
मुलगी: ठीक आहे.
मेकॅनिक: exide ची बसवू का ?
मुलगी(बराच विचार केल्यावर): नको, दोन्ही साईडची बसवा.
मेकॅनिक: ही अॅक्टीवा घ्या आणि कृपया घरी जा.
मेकॅनिक (मनातल्या मनात): बोर्डात ९५% मार्क होते म्हणे...
पुणेरी जाहिरात
एका पुणेकर व्यक्तिने मिठाईचे दुकान उघडले आणि जाहिरात दिली
“कामगार पाहिजे”
पात्रता - मधुमेह असला पाहिजे...
“कामगार पाहिजे”
पात्रता - मधुमेह असला पाहिजे...
चहाची ऑर्डर
मुंबईतल्या एका पंचतारांकीत हॉटेल मध्ये पहिल्यांदाच गेलेल्या एका पुणेरी माणसाने चहाची ऑर्डर दिली...
वेटरने उकळलेला कोरा चहा, साखर आणि गरम दुध आणून दिले...
पुणेरी माणुस कसाबसा चहा पिऊन संपवतो न संपवतो तोच त्याला वेटरने विचारले, “साहेब, आपण अजुन काही घेणार का?”पुणेरी माणूस: “भजी खायची होती रे! पण तु कढई, तेल, बेसन आणि कांदे आणून ठेवशील... जाऊदे”

पोहे आणि उपीट तयार आहे
एक बाळ जन्माला आल्या - आल्या बोलायला लागतो...
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स:पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा:अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो...
थांबा मी चहा घेऊन आलो
एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला, “थांबा मी चहा घेऊन आलो...”
(१० मिनीटांनी)
चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया !
(१० मिनीटांनी)
चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया !
एक लाख रुपयाची लॉटरी
स्थळ: सदाशिव पेठ, पुणे.
जोशी काका: काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या: अहो, आमच्या शेजारच्या कुलकर्ण्यांना एक लाख रुपयाची लॉटरी लागलीये !
जोशी काका: मग तुम्हाला का इतका आनंद झालांय ?
तात्या: त्याला आता तिकिट सापडत नाहीए !

व्यावहारीक प्रश्न
स्थळ: पुण्याशिवाय दुसरे असू शकत नाही.
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे! साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): ...आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?
पेशंट: डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे! साधारण किती खर्च येईल ?
डॉक्टर: ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून): ...आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?
पुणेरी एकदम तिखट
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला...
मुलगी: बावळट, ब्रेक नाही का मारता येत...?
मुलगा (पुणेरी उत्तर): अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु ?
पुणेरी एकदम तिखट...
मुलगी: बावळट, ब्रेक नाही का मारता येत...?
मुलगा (पुणेरी उत्तर): अख्की सायकल मारली, आता काय ब्रेक वेगळा काढून मारु ?
पुणेरी एकदम तिखट...
वीस नंबरची बस
पाहुणा: अहो कॅम्पला जायला कुठली बस पकडू ?
पुणेरी: २० नंबर ची पकडा.
पाहुणा: ...आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी: १० - १० च्या २ पकडा...
पुणेरी: २० नंबर ची पकडा.
पाहुणा: ...आणि ती नाही मिळाली तर?
पुणेरी: १० - १० च्या २ पकडा...
जरा कॅमेरात बघून सांगा ना
पुण्याला डेक्कनच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले.
(दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन)
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का ?”
(दुसऱ्या दिवशी सकाळी पोलिस कंट्रोल-रूमला आलेला पहिला फोन)
“अहो, जरा कॅमेरात बघून सांगा ना, चितळे उघडले आहेत का ?”
पुण्यातले गरमा गरम पोहे
भन्नाट पुणेरी बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूःआहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
जोशी काकूःआहे ना, गरमा-गरम पोहे खातोय. तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
पुणेकर ग्राहक - दुकानदार
पुणेकर ग्राहक: उंदिर मारायचे औषध द्या
पुणेकर दुकानदार: घरी न्यायचंय का ?
पुणेकर ग्राहक: नाही, उंदिर आणलाय सोबत, इथेच भरवतो.
पुणेकर दुकानदार: घरी न्यायचंय का ?
पुणेकर ग्राहक: नाही, उंदिर आणलाय सोबत, इथेच भरवतो.
पुणेरी वैमानिक
एकदा अमेरिकेत एक विमान वाईट हवामानामुळे डोंगर दऱ्यात भरकटते...
वैमानिक सर्व कौशल्य पणाला लावून डोंगर दऱ्यातुन आडवे तिडवे कट मारून ते विमान सुखरूप विमान तळावर घेउन येतो...
त्याचा सत्कार केला जातो आणि हे कौशल्य कुठे आत्मसात केलस असं विचारलं जातं...
तो लाजून म्हणतो, आधी पुण्यात बाईक चालवायचो...!

पुण्यातला उकाडा
मुंबईकर: तुम्ही उकडत असल्यास काय करता ?
पुणेकर: आम्ही कुलरसमोर बसतो...
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर काय करता ?
पुणेकर: मग आम्ही कुलर चालु करतो...
पुणेकर: आम्ही कुलरसमोर बसतो...
मुंबईकर: तरीही उकडत असेल तर काय करता ?
पुणेकर: मग आम्ही कुलर चालु करतो...
No comments:
Post a Comment