नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

लैंगिक शिक्षण

वस्तुतः वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध होण्यात समाधानी लैंगिक जीवनाचा फार मोठा वाटा आहे. वैवाहिक जीवनात सुखदुःखाचा वाटा पतीपत्नीनी समानतेने उचलावा असं जर मानलं तर लैंगिक जीवनात मात्र ती भोगवस्तू म्हणून का ठरावी ? भावनेच्या भरात तिनं आपली इच्छा व्यक्त केली तर तिला वाईट चालीची, कामिनी मानावयाचे आणि क्वचित प्रसंगी तिनं नापसंती दर्शविली तरी ती धर्मपत्नी म्हणून तिच्यामनाविरुद्ध समागम करायचा, हा कुठला न्याय ? गर्भारपण-बाळंतपण ह्या सातत्याने येत राहणाऱ्या दिव्यातून ती आत्ता कुठं मोकळी होऊ पाहाते आहे आणि लैंगिक जीवनाचा मोकळेपणानं आनंद घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशावेळी तिच्या निरनिराळ्या वयातील भूमिकेनुरूप तिला लैंगिक ज्ञान मिळाले - मुलगी, तरुणी, नववधू, पत्नी आणि माता या सर्व अवस्थेत तिला योग्य मार्गदर्शन मिळालं तर लैंगिक शिक्षण हा सुखाचा मूलमंत्र ठरेल.

लैंगिक शिक्षण खरं म्हणजे आपल्याकडे नवीन नाही. ऋषिमुनींनी त्याचा शास्त्रीय बैठकीवर विचार करून ग्रंथरचानाही केली होती. त्यांनी त्याला असं अवास्तव महत्त्व दिलं नव्हतं. तसा तो विषय त्याज्यही मानला नव्हता. पुढे त्याला अनिष्ट वळण लागलं आणि त्याचा बाऊ करून तो विषय त्याज्य मानला गेला. औद्योगिकरण आणि शहरीकरणामुळे समाजजीवन झपाट्याने बदलत गेलं व स्त्री-पुरुष संमिश्र समाजपद्धती वाढत गेली. प्रौढ विवाहकडे तरुण वर्ग झुकू लागला. लैंगिक भावनेला खतपाणी घालून चेतविणारं हरतऱ्हेचे वाङ्मय, व्यावसायिक भडक जाहीरातबाजी व करमणूकीची साधने ह्यामुळे भोगवादी स्वैराचाराला उधाण आलं. त्यामुळं अवांच्छीत गर्भधारणा, गर्भपात, गुप्तरोग ह्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागलं. ह्या सर्व परिस्थिमुळे समाजशास्त्रज्ञांना, वैद्यकवर्गाला व शिक्षणतज्ज्ञांना निकोप व जबाबदार लैंगिक शिक्षण देण्याची गरज भासू लागली. लैंगिक शिक्षणात पुढील माहितीचा अंतर्भाव होण्याची आवश्यकता आहे.

No comments:

Post a Comment