कपडे व इतर तयारी
- कपडे :बाळंतपणाच्या वेळी साधे सूती व स्वच्छ कपडे असावेत. पुढच्या बाजूच्या बटणांचा सैलसा गाऊन असेल तर वेळोवेळी लागणारी तपासणी ही कमी त्रासाची होऊ शकते. नायलॉनचे, नवीन कपडे असतील तर त्यामुळे घाम, पाणी, रक्त शोषलं जात नाही. तसंच हे किमती कपडे डाग पडल्याने खराब होऊन जातात.
- पॅड्स :बाळंतपणात किंवा बाळंतपणानंतर घ्यावयाचं पॅड हे अत्यंत स्वच्छ असावं. घरातील जुनी व अस्वच्छ कपड्यांची घडी घेऊ नये. त्यामुळे निर्जंतुकता तसेच शोषणशक्ती या दोन्ही गोष्टी साधल्या जात नाहीत. बाजारात विकत मिळणारी पॅड्स थोडीफार महाग वाटत असतील तर ग्वॉसच्या कापडात कापूस गुंडाळून त्याचे पॅड करणे इष्ट होईल.
- स्वतःसाठी लागणाऱ्या रोजच्या वस्तू :ब्रश, टूथपेस्ट, पावडर, कुंकू, कंगवा, साबण, टॉवेल, इत्यादी.
- बाळासाठी लागणाऱ्या वस्तू :हे
कपडेसुद्धा स्वच्छ कपड्याचे धुतलेले (खळ नसलेले) सैलसर असावेत. बटणे,
पिना, हुक यांच्याऐवजी बंद असावेत.म्हणजे बाळाला बोचून इजा होणार नाही.
तसेच १० ते १२ स्वच्छ व जुन्या कपड्यांची दुपटी शिवून तयार ठेवावीत.
वरील सर्व सामान हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या आधीच एका बॅगमध्ये तयार ठेवावे.
Great information!!!!!Do check out my post for recent update
ReplyDeletehttps://aaipan.com/baby-mom-clothing/