नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday 28 December 2017

लग्न करताना कोणते प्रश्न विचारावे

लग्न हे माणसाच्या जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. आज लव्ह मॅरेज करतांना अनेकांना मुलींना काहीही अन्य प्रश्न विचारावे लागत नाहीत. पण जेव्हा गोष्ट अॅरेंज मॅरेजची असते तेव्हा प्रश्न विचारावा लागू शकतो. कारण ती व्यक्ती आपल्यासाठी अनोळखी असते.
मुलानेही मुलीला एकांतात जाऊन काही प्रश्न विचारायला सांगितले जातात. पण अशा वेळेस काय प्रश्न विचारावे हे कळत नाही. पण आम्ही तुम्हाला ते प्रश्न सांगणार आहोत.
तुम्ही जसे गोधळात आहात तशी मुलगीही गोंधळात असते. त्यामुळे तिला कोणतेही उलट प्रश्न विचारून नाराज करू नका. तिला तिच्या आवडी निवडी विचारा. ती जर खूपच लाजाळू असेल तर तिला स्वत: विषयी विचारा. तिला अगोदर विश्वासात घ्या. मग तिच्या विषयी तुम्हाला सगळ काही माहित होऊन जाईल.

१. मोकळ्या वेळेत काय करायला आवडते ?
जेव्हा मोकळा वेळ मिळतो त्यावेळेत तु काय करतेस असा प्रश्न विचारायला काहीच हरकत नाही. तिचे फ्रेंडसर्कल विषयी माहिती घ्या. तिला कसे मित्र आवडतात यावरून तुम्हा तिच्याविषयी आणखी गोष्टी जाणून घेऊ शकाल.

२. आई-वडिलांविषयी काय विचाक केला?
मुलीला आपल्या आई-वडिलांची खूप काळजी असते. त्यावेळेस तुम्ही हा प्रश्न विचारू शकता की लग्नानंतर तुझ्या आई-वडिलांकडे कोण लक्ष देईल. त्यांच्या विषयी काय विचार केला आहेस? तिच्या उत्तरावरून तुम्हाला तुमचं उत्तर मिळून जाईल.

३. कसे कपडे घालायला आवडतात ?
कपडे म्हणजे मुलीसाठी महत्त्वाचा विषय. तिला कोणते प्रकारचे कपडे घालण्यास आवडतात. तिला वेस्टर्न आवडत असतील आणि तुमच्या घरी ते नसेल चालणार तर समस्या होऊ शकते. त्यामुळे ते जाणून घ्या.

४. विवाहाविषय काय विचार करतेस
मुलीला तिच्या होणाऱ्या पतीकडून लग्नाविषयी सल्ला घेण्यास नक्कीच आवडेल. ती तुमच्या सोबत लग्नाबाबत काय विचार करते हे देखील तुम्हाला कळेल.

५. करिअरविषयी तु काय विचार करतेस ?
मुलींना त्यांच्या करिअर बाबत विचारल्यास त्यांना आनंद होतो. तुम्ही तुमच्या करिअर विषयी तिला सांगा. तुम्हीही तिच्या करिअर विषयी जाणून घ्या. ती करिअर विषयी काय विचार करते. त्यावरून तिची इच्छा, ध्येय. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन माहित पडेल.

No comments:

Post a Comment