नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

भोजनातील हानिकारक संयोग

दुधा सोबत : दही, मीठ, आंबट वस्तु, चिंच, डांगर, मुळा, मुळ्यांची पाने, दोडका, बेल, आंबट फळे, सातु हानिकारक असतात. दुधात गूळ टाकून सेवन करू नये. फणस किंवा तळलेले पदार्थ पण दुधासोबत हानिकारक आहेत.

दह्या सोबत : खीर, दुध, पनीर, गरम जेवण, केळी, डांगर (खरबूज), मूळा इत्यादि घेऊ नये.

तुपा सोबत : थंड दुध, थंड पाणी समप्रमाणात मद्य हानिकारक असते.

मधा सोबत : मूळ, खरबूज, समप्रमाणात तूप, द्राक्षे, पावसाचे पाणी व गरम पाणी हानिकारक असतात.

फणसा नंतर : पान खाणे हानिकारक असते.

मुळ्या सोबत : गुळ खाणे नुकसानदायक असते.

खीरी सोबत : खिचडी, आंबट पदार्थ, फणस व सातु घेऊ नये.

गरम पाण्याबरोबर : मध घेऊ नये

थंड पाण्याबरोबर : शेंगदाणे, तूप, तेल, खरबूज, पेरु, जांभळे, काकडी, गरम दुध किंवा गरम भोजन घेऊ नये.

कलिंगडा बरोबर : पुदीना किंवा थंड पाणी घेऊ नये.

चहा सोबत : काकडी, थंड फळे किंवा थंड पाणी घेऊ नये.

माशा सोबत : दुध, उसाचा रस, मध, पाण्याच्या काठावर राहणाऱ्या पक्ष्यांचे मांस खाऊ नये.

मांस बरोबर : मध किंवा पनीर घेतल्याने पोट खराब होते.

गरम जेवणा बरोबर : थंड जेवण, थंड पेय हानिकारक असतात.

खरबुजा बरोबर : लसूण, मुळा, मुळ्यांची पाने, दुध किंवा दही नुकसानकारक असते.

तांबे, पीतळ, किंवा काश्याच्या भांड्यात ठेवलेल्या वस्तु उदा. तूप, तेल, ताक, लोणी, रसदार, भाज्या, इत्यादि विषाक्त होतात. अशा भांड्यात बराच वेळ ठेवलेला पदार्थ खाऊ नयेत. अ‍ॅल्यूमिनियम आणि प्लस्टिकच्या भांड्यात पातळ पदार्थ ठेवल्याने, उकळल्याने किंवा खाल्याने अनेक प्रकारचे रोग होऊ शकतात.

Source: marathimati

No comments:

Post a Comment