नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Saturday, 21 October 2017

पाळीतील काही विकृती किंवा बदल

  • पोटात दुखणे
  • पाळी न येणे किंवा पाळी बंद होणे
  • पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणं
  • पाळी थांबतानाच्या विकृती
पोटात दुखणे:
 
हे पोटात दुखणे पाळीच्या आधी, पाळी चालू असताना किंवा पाळीनंतर असू शकतं. सर्वसामान्यपणे तरुण मुलीत पाळी चालू झाल्यानंतर ३ ते ६ महिन्यात हा पाळीच्या वेळचा पोटदुखीचा आजार आढळतो व त्याची तिव्रताही कमी जास्त असू शकते. जास्त प्रमाणातील पोटदुखी बरोबर, चक्कर येते किंवा उलटीसुद्धा होते. जास्त प्रमाणात पाळीच्या वेळी पोटदुखी असेल तर ऑस्पिरीन सारख्या वेदना कमी होण्याच्या गोळ्या सुरू करण्याआधी, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. पाळीच्यावेळी नेहमीचे व्हवहार चालू ठेवावेत. सामान्य पणे गोळ्या-औषधांवरच हा विकार बरा होतो-फारच क्वचित ऑपरेशनची गरज भासते. वयस्कर स्त्रियांच्यात जर पाळीच्या वेळी प्रथम पोटदुखी सुरू झाली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक ठरतं कारण गर्भाशयाच्या रोगामुळे ही पोटदुखी असल्याचा संभव असतो.

 पाळी न येणे किंवा पाळी बंद होणे:
 
वयाच्या १७ ते १८ वर्षांपर्यंत पाळी सुरू न झाल्यास त्यास प्राथमिक पाळी न येणं (Primary amenorrhoea) असं म्हणतात. ही अवस्था अगदीच अपरिचित नाही. परंतु तज्ज्ञ डॉक्टरांची तपासणी व सल्ला यासाठी आवश्यक ठरतो.पूर्वी पाळी सुरू होऊन जर परत पाळी येणेच बंद झाले असेल तर त्यास सेकंडरी अमेनोरिया किंवा दुय्यम पाळी न येणं असं म्हणतात ५ ते ६ महिन्यापर्यंत पाली न आल्यास डॉक्टरी सल्ला घेणं आवश्यक असतं अशी पाळी बंद होण्याचं कारन हे गर्भाशयाशी संबधित किंवा नलिका विरहित ग्रंथीशी संबंधित असतं या नलिकाविरहित ग्रंथीच वेळच्यावेळी पाळी येण्यासाठी कार्यक्षम असतात. जर पाळी बंद होण्याबरोबर व्यंधत्व (Sterility) असेल तर ताबडतोब डॉक्टरी सल्ला व तपासण्या करून घेणं आवश्यक ठरतं. वरून सशक्त वाटणाऱ्या व मुले असणाऱ्या स्त्रिया पाळीच्या वेळी अंगावरून कमि जातं किंवा पाळी उशिरा येते म्हणून खूपच घाबरून जातात, परंतु त्यांचा आहार सुधारल्यास व रक्तवर्धक औषधे दिल्यास नक्कीच गुण येतो.

पाळीच्या वेळी अंगावरून जास्त जाणं:
 
पाळी वेळच्यावेळी येऊनही अंगावरून जस्त जाऊ सकतं किंवा पाळी वेळच्यावेळी न येता जास्त जाणं ही सुद्धा विकृती आहे. अशा पाळीबरोबर पोटदुखी असू शकते. अशा तऱ्हेची विकृती कोणत्याही वयात होऊ शकते. परंतु सामान्यपणे पाळी सुरू झाल्यावर लगेच किंवा पाळी बंद होत असताना जास्त प्रमाणात आढळते. अशावेळी स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला येथे महत्त्वाच ठरतं. स्त्रीरोग तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नये. आतून तपासणी करून घेणं ही कारण हुडकण्यासाठी महत्त्वाची तपासणी आहे. सामान्यपणे अशा तऱ्हेची पाळीतील विकृती ही नलिका विरहीत ग्रंथीशी संबंधित किंवा गर्भाशय गर्भाशयाच्या नलिका किंवा स्त्रीबीज निमाण करणाऱ्या ग्रथींना होणाऱ्या ट्यूमरमुळे असू शकते. हे ट्यूमर साधे फायब्राइडसारके असू शकतात. किंवा कॅन्सरचेही असू शकतात. स्त्रीरोग तज्ज्ञ पिशवी धुणे, (क्यूरेटिंग), पेशींचा तुकड तपासणे अशा तऱ्हेच्या तपासण्यानंतर निश्चित निदान करू शकतो. जेव्हा स्त्रीला अशा तऱ्हेचं विशेषकरून अवेळी अंगावर जात असेल त्यावेळी त्याकडे दुर्लक्ष न करता ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.

पाळी थांबतानाच्या विकृती:
 
काही स्त्रियांच्यात पाळी ३० ते ३५ वयातच बंद होते, जर काही स्त्रियांची पाळी पन्नाशीच्या पुढेही चालू व काही विशेष तपासण्या करून येणं आवश्यक ठरते. पाळी जाताना पाळी अवेळी येते व नीट येत नाही, अशी एक समजूत आहे परंतु अशा तऱ्हेची वरचेवर किंवा अवेळी अंगावरून जानं ही विकृती समजावी व तपासणी करून घ्यावी. अशावेळी गर्भाशयाचा कॅन्सर नाही ना याची खात्री करून घ्यावी, कारण योग्य वेळीच व लवकर कॅन्सरच निदान झालं तर कॅन्सर पूर्ण बरा करता येतो. तसंच पाळी थांबल्यानंतर परत अंगावर जात असेल तर अजिबात दुर्लक्ष न करता तज्ज्ञ डॉक्टरचा सल्ला घ्यावा. वरील लेखाच तात्पर्य हेच की, स्वतः पेशंट स्त्री आणि डॉक्टर या दोघांनीही पाळीतील विकृती ही मोठ्या आजाराची नांदी असू शकते, हे विसरू नये, स्त्रीने लगेच तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून सल्ला घ्यावा. वरील प्रकारच्या विकृतीच्या दुष्ट चक्रातून सुटण्यासाठी प्रत्येक वर्षी स्त्रीने तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपासणी करून घेणं हे तिच्या आरोग्याच्या महत्त्वाचं पाऊल ठरेल.


No comments:

Post a Comment