नेहमी History Clear करा. Online Fraud पासून वाचण्याचा हा सर्वोत्तम उपाय आहे..

'वाचा आणि जिंका' या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपले नाव नोंदवा :

Breaking

Thursday, 19 October 2017

बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा

बाळाचं वात्सल्यानं संगोपन करा

सकस आहार बाळाला मिळाला की, त्याची सर्वांगीण वाढ होते, असं नाही बाळाला प्रेम, वात्सल्यही हवं असतं. आईवडीलांचं प्रेम त्याला मिळणं आवश्यक असतं. आपण एका कोवळ्या जिवाला वाढवितो आहोत. या दृष्टीनं हळुवार मनानं, हिडीसफिडीस न करता, न कुरकुरता, प्रेमानं त्या जिवाची काळजी घ्यायला हवी. दाया, नर्सेस यांच्यापेक्षा आईची माया त्याला मिळायला हवी.वयाची दोन ते पाच वर्षांचा काळ बाळाच्या वाढीच्या दृष्टीनं अत्यंत नाजूक असा असतो. आणि या वयोगटाच्या मुलांचं संगोपन जर नीट काळजीपूर्वक झालं नाही, तर पुढं पालकांच्या दृष्टीनं त्यांचं मूल म्हणजे एक समस्याच होऊन बसते. म्हणूनच या वयोगटातल्या मुलांकडे पालकांनी विशेषतः आईनं काही बाबतीत अत्यंत काळजी घ्यायला हवी ( बाळाचं आगमन स्त्रीच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा क्षण असतो. त्याच्या स्वागताची सर्वांगीण तयारी स्त्रीनं करावी.) ( अंगावरचं दून निर्जंतुक असतं. त्यात भरपूर प्रोटिन्स असतात अंगावरच्या दुधामुळं बाळाला संसर्गापासून दूर ठेवता येतं. ) या कालखंडात खालील महत्त्वाच्या गोष्टी बाळाच्या शरीरात घडत असतात.
  • वाढीचा वेग वाढतो आणि मंदावतो.
  • भाषा कळू लागते. बोलणं आणि समजणं हे या काळातच घडत असतं.
  • बुद्धीचा विकास होतो.
  • वागण्याच्या पद्धतीचा म्हणजे वर्तनाचा विकास होतो.
  • मज्जासंस्था स्नायू यांच्या परस्परसंबंधाचा विकास होतो.
  • मल आणि मूत्रावर नियंत्रण करता येऊ लागते.
बाळाच्या भवितव्यातील अत्यंत महत्त्वाच्या गोष्टींचा या कालखंडात विकास घडत असल्यामुळे आई-वडिलांवर त्यांच्या संगोपनाची यावेळी आणखीनच जबाबदारी येऊन पडत असते.
या वयोगटातील मुलांच्या बाबतीत निर्माण होणारे प्रश्न
  • नित्कृष्ट अपुरा आहार मिळाला तर मुलाची वाढ खुंटते.
  • संसर्गजन्य जंतूंची लागण होऊ शकते. क्षय, डांग्या खोकला, घटसर्प, पोलिओ, गोवर इत्यादी आजारांची लागण होण्याची शक्यता याच वयात होऊ शकते.
  • अंथरुणात लघवी होणं, अंगठा चोखणं, चिडचिडा स्वभाव बनणं, तोतरेपणा येणं, बद्धकोष्ठतेची सवय होणं अशा सवयी जडतात.
  • अपघात, विषबाधा होण्याची शक्यता दुर्लक्ष झाल्यामुळं होते.
आपल्या बाळानं भविष्यात मोठं व्हावं खूप शिकावं, सुशील असावं, जगातील अनेक बऱ्यावाईट गोष्टींना तोंड देण्यासाठी संकल्पना पेलण्यासाठी त्यानं धैर्यवान व्हावं, त्याचबरोबर त्यानं प्रेमळही असायला हवं आणि दणकट धडधाकट प्रकृतीचं राह्यला हवं, अशी प्रत्येक माता-पित्याची इच्छा असते. पण त्यासाठी पालकांनी विशेषतः आईनं ते जगात येण्यापूर्वीपासून ते त्याच्या वाढीच्या वयापर्यंत त्याची अतिशय काळजी घ्यायला हवी.

No comments:

Post a Comment